महत्वाच्या बातम्या
-
तर सर्वच पक्षांना धडकी भरेल..प्रकाश आंबेडकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी राजकीय उलथापालट होण्याची शक्यता आहे. दरम्यान जर अशी युती सत्यात उतरल्यास प्रचंड वलय असलेले दोन नेते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास राज्यातील समीकरणं बदलतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तविली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व पक्षांसोबत राहावे अशी इच्छा असून आपण त्यासाठी प्रयत्न देखील करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी यावेळी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
युतीत पुन्हा रुसवे फुगवे! राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार १४ जून म्हणेजच उद्या होणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारावरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत सध्या मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरु आहे. त्यामुळे, हा मंत्रिमंडळ आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे यंदाची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. तसा आग्रहच पक्षाच्या अनेक नेत्यांकडून आणि आमदारांकडून केला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
मैत्री करताना आपण लिंगाचा विचार करत नाही: दिशा पटानी
बॉलिवूडमधील कलाकरांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकंच त्यांना समाज माध्यमांवरील ट्रोलिंगला देखील मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागतं. नुकतंच अभिनेत्री दिशा पटानीला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत पाहण्यात आले होते. दरम्यान या गोष्टीमुळे दिशाला समाज माध्यमांवर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगमध्ये मुख्यतः बॉलिवूड कलाकार टायगर श्रॉफचा उल्लेख होता. ‘एक था टायगर’पासून ते ‘टायगर जिंदा है’ अशा अनेक कंमेंट्स नेटकाऱ्यांनी केल्या आणि दिशा पटानीला हैराण करून सोडले होते. या सगळ्या ट्रोलिंगला दिशाने देखील प्रतिउत्तर दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार: निलेश राणे
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतात शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसविण्याचे भाष्य केले होते. त्याला अनुसरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस आघाडीबरोबर येण्याची वंचितची मानसिकता नाही: अजित पवार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र घेत भारतीय जनता पक्षाच्या युतीला शह देण्याचा चंग कॉंग्रेस आघाडीने बांधला आहे. त्यादृष्टीने कॉंग्रेस आणि एनसीपीने इतर पक्षांशी आघाडी बाबत चर्चा सुरु केल्या आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीची कॉंग्रेस आघाडी बरोबर येण्याची मानसिकता नसल्याची माहिती एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीतून आलेल्या जयदत्त क्षीरसागरांना मंत्रीपद? जुन्या शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड नाराजी
बहुप्रतीक्षित महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार १४ जून रोजी पार पडण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने शिवसेनेतील आमदारांनी लॉबिंग केले होते मात्र लोकसभा निवडणुकीत बाहेरून आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेनेच्या कोट्यातील आणि मंत्रीपदे भारतीय जनता पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेकडून मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं बोलले जात आहे. परंतु बाहेरून आलेल्या नेत्याला मंत्रीपद दिल जाणार असल्याने शिवसेनेतील आमदारांमध्ये मोठ्याप्रमाणावर धूसफूस सुरु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
खासदार अमोल कोल्हे थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आणि जाईंट किलर ठरलेले शिरूरचे खासदार तसेच अभिनेते अमोल कोल्हे आज ‘कृष्णकुंज’वर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी ११.३० वाजता ही भेट होणार असल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी दमदार कामगिरी केली होती.
6 वर्षांपूर्वी -
EVM बाबत तंत्रज्ञांशी चर्चा करून व विरोधकांना एकत्र घेऊन प्रकरणाच्या खोलात जाणार
ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा दावा करणारे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची देखील धाकधूक वाढणार आहे. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये अडचण नसून निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड होत असल्याचा संशय पवार यांनी कार्यकर्त्यांना संवाद साधताना व्यक्त केला. एनसीपीच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंना परदेश दौरा संपल्यावर शेतकऱ्यांची आठवण: अजित पवार
महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली असून, आतापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहे. त्यातच, परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण येत असल्याची टीका, एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. एनसीपी पक्षाचा आज २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री फक्त भाजपाचाच असेल; बैठकीत निर्णय
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मित्रपक्षांशी युती होईलच पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
इंद्रायणी नदीत प्रदूषणाने हजारो मासे मृत अवस्थेत; रिव्हर अँथम वैयक्तिक चोचल्यांसाठी
संत तुकोबांच्या देहूतील इंद्रायणी नदीत प्रदूषणामुळे हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. केवळ १५ दिवसांवर आषाढी वारी आली असताना असे प्रकार घडू लागले आहेत. अशातच एवढ्या मोठ्याप्रमाणात मृत मासे आढळल्याने स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि निसर्ग प्रेमिंनीसुद्धा नद्यांच्या प्रदूषणावर संताप व्यक्त केला आहे. ‘रान जाई’ या समाजसेवी संस्थेचे सदस्य रविवारी सकाळी ७ वाजता जलपर्णी काढण्यासाठी आले असता, त्यांना हे मृत मासे आढळून आले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मृत मासे काढण्याच काम सुरू होते.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणुक: दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्य भाजपची बैठक
लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात बैठकांचे जोरदार सत्र सुरु झाले असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विशेष उपस्थितीत महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली. सदर बैठक भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
खैरेंचा पराभव हा माझा पराभव; पण शिरूर व रायगडचा उद्धव ठाकरेंकडून उल्लेख नाही
शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचा मानहानीकारक पराभव झाला. दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना दौऱ्यावर आलेले असताना दिली. मात्र शिरूर लोकसभा आणि रायगड लोकसभा मतदार संघातील अनुक्रमे शिवाजी आढळराव-पाटील आणि अनंत गीते यांच्या बद्दल कोणतेही भाष्य केले नाही. कारण हे दोन नेते देखील पक्षाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्ष संपली, विधानसभा आल्या; आता मुख्यमंत्र्यांकडून मराठवाडा दुष्काळमुक्तीची भाषा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभा दौरे सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. कारण सत्तेचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून आणि ३-४ महिन्यांवर विधानसभा निवडणूक आल्याने त्यांच्याकडून पुन्हा मतदाराला आणि विशेष करून दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या मराठवाड्याला पुन्हा मृगजळ दाखविण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी ते म्हणाले ‘सध्याच्या पिढीने मराठवाड्यात बाराही महिने दुष्काळचं पाहिला आहे, परंतु आता पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करु. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदार सो रहा हैं! चीनच्या दोन बोटी परवानगी नसताना दाभोळ खाडीत
भारताचा सागरी किनारा किती असुरक्षित आहे त्याचा अजून एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. अरबी समुद्रच्या मार्गे कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी करणाऱ्या बोटी आढळून आल्या आहेत. संबंधित बोटींवर तब्बल ३७ खलाशी असल्याचं वृत्त आहे. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला आहे. परंतु या बोटींकडे कुठलीही परवानगी नाही अशी महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते स्वतःच निवडून येण्याची शास्वती नाही; त्यांच्या भरोसे स्वबळावर ही राजकीय आत्महत्या?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रापासून ते संपूर्ण देशभर सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरदार बैठका सुरु आहेत. त्यात आगामी विधानसभा निवडणुक राष्ट्रवादीला वगळून स्वबळावर किंवा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढवावी अशी मागणी पुढे आली आहे. मात्र काँग्रेसकडे आजच्या घडीला राज्य पातळीवरील चेहराच शिल्लक नसल्याने ते असं धाडस नेमकं कोणत्या आधारावर करत आहेत ते समजायला मार्ग नाही.
6 वर्षांपूर्वी -
उशीरच झाला! जमिनीवरील नेते शरद पवार आता डिजिटल तंत्राचा वापर करणार
मागील काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही समाज माध्यमांचं महत्त्व वाढलं आहे. याद्वारे नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोडले जातात. याच विषयाला नुसरून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता शरद पवारां त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर LIVE असणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
१० वी चा यशाचा टक्का घसरला, फक्त ७७.१० टक्के विद्यार्थी पास
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे २०१९ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. मागील वर्षी म्हणजे २०१८ मध्ये दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशाचा निकाल ८९.४१ टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या १२.३१ टक्क्यांनी कमी झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे 10 वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १६ जुन २०१९ रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत, तसेच याची अधिकृत माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलर वरून दिली आहे. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे १८ नवनिर्वाचित खासदार देखील असतील. मात्र उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या आधीच केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी १ वादग्रस्त विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेपूर्वी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी फडणवीसांकडून फोन: अशोक चव्हाण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपात प्रवेश करण्याच्या ऑफर्स देत आहेत असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सतत आमच्या आमदारांना फोन करत आहेत. त्यासोबतच भाजप मधले काही नेते देखील काँग्रेसच्या काही आमदारांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी