महत्वाच्या बातम्या
-
मनसे शेतकरी महामोर्चा! सरकारचा जीआर; शेतकऱ्यांनो शेतमाल आता थेट पालिका-नगरपालिका क्षेत्रात विका
मागील महिन्यात ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एका आंबे विक्रेत्या शेतकऱ्याचा स्टॉल स्थानिक भाजपने हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या समर्थनार्थ ठाण्यातील मनसे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नैतृत्वाखाली आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आणि स्थानिक भाजप नगरसेवकांपासून सर्वानाच चोप देण्यात आला. मात्र त्यानंतर विषय एवढ्यावरच न थांबता मनसेने अजून एक लोकशाही मार्गाने पवित्रा घेत १७ मे रोजी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना नगरपालिका तसेच पालिका हद्दीत थेट मालाची विक्री करता यावी यासाठी सरकारवर कायद्यात तरदूत करण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने शेतकरी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. पायल तडवी आत्महत्या: तिन्ही डॉक्टर आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
नायर रुग्णालयाच्या एमबीबीएस डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणाने आता संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा यांना कोर्टाने ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. त्यांची ही शिक्षा वाढविण्यात आली असून १० जूनपर्यंत त्यांना कोर्टाच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तसेच हे आत्महत्येचेच प्रकरण असून ही हत्या नसल्याचे कोर्टाने आधीच स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेकडे सोपविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत.
6 वर्षांपूर्वी -
त्र्यंबकेश्वर: जलयुक्त शिवार योजना निष्प्रभ, गावं जलमुक्त होण्याच्या मार्गावर
तालुक्यात मागील ४ वर्षांत जलयुक्त शिवारची कामे झाली, परंतु आज तालुकाच जलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. भूजल पातळी खोल गेली असून, गेल्या वर्षापेक्षा यावर्षी आणखी ७० ते ८० फुटांनी पाणी खाली गेले आहे. तालुक्यातील विहिरींनी कधीच तळ गाठला असून, आता हातपंपदेखील हतबल झालेले दिसत आहेत. तालुक्यात आठ शासकीय टँकर ३२ वस्त्यांना पाणीपुरवठा करीत आहेत. याशिवाय सामाजिक संस्थादेखील पाणीपुरवठा करीत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा २०१९: राज ठाकरे त्यांच्या राजकीय रणनीतीत बदल करतील का? सविस्तर
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यात भाजपने देशभर मुसंडी घेत बहुमताने सत्ता काबीज केली. मात्र राज्यात बोलायचे झाल्यास इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तगडे विरोधी पक्ष असताना देखील, भाजप आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींनी प्रत्यक्ष निवडणूक निकाल लागताच मनसेवरच शेरेबाजी करत प्रतिक्रिया दिली आणि हाच मनसेचा विरोधी पक्ष म्हणून नैतिक विजय आहे. वास्तविक भाजपाला मिळालेलं यश हे देशभरातील सर्वच विरोधी पक्षांच्या विरोधातील आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर ‘लाव रे तो व्हिडिओ’ असा प्रयोग कोणत्याही विरोधी पक्षाने केला नव्हता. मात्र राज ठाकरे यांच्या सभांमुळे काँग्रेस उमेदवारांच्या २०१४ मधील मतांच्या तुलनेत मोठी वाढ झाली, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीने दुसऱ्याबाजूने काँग्रेसची मतं खाल्ली आणि तिथेच काँग्रेस राष्ट्रवादीचं गणित बिघडल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
लाव रे ती फुसकी लवंगी! सेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग खातं आल्याने समाज माध्यमांवर खिल्ली
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवजड मालिका! सेनेच्या वाट्याला पुन्हा सामान्यांशी काहीच संबंध नसलेलं अवजड उद्योग खातं
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शहांना संरक्षण खातं दिलं तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल: उद्धव ठाकरे
काल नरेंद्र मोदी यांच्या बहुमतातील सरकारचा दिल्लीत शपथविधी समारोह पार पडला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीय मधून मोदींवर पुन्हा स्थुतीसुमनांचा पाऊस पडला आहे. सामनात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, ‘देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत, मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही, मोदी-२ सरकारचा चेहरा मोदी हाच आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून निक्षून सांगितलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच. अमित शहा यांच्या येण्याने नरेंद्र मोदी सरकारला बळ मिळेल असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कृष्णकुंजवर भेटीगाठी सुरु
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः शरद पवार प्रयत्नशील असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी त्याला तीव्र विरोध केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी थेट कृष्णकुंज गाठायला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी भेट घेतली.
6 वर्षांपूर्वी -
वैद्यकीय शिक्षण: भाजप-सेनेमुळे मराठा विद्यार्थ्यांचं आयुष्य उध्वस्त? आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण नाही
देशातील आरक्षण नसलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारने गेल्या फेब्रुवारीमध्ये निर्णय घेतला होता. यावर महाराष्ट्र सरकारने केलेल्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एकाबाजूला निवडणुकीत मतांसाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा कांगावा केला आणि नव्या लोकसभेच्या प्रचारापासून या विद्यार्थ्यांकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्यांचे शैक्षणिक आयुष्य पणाला लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बारावी निकालात मुलींची बाजी, कोकण टॉप, सरासरी निकाल ८५.८८ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. विभागनिहाय आकडेवारीत कोकण अव्वल स्थानी आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्यातील एकूणच निकालाची टक्केवारी ८५.८८ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील.
6 वर्षांपूर्वी -
आज राष्ट्रवादी-कॉंग्रेसची मुंबईत आढावा बैठक; तत्पूर्वी राजू शेट्टीं व राज ठाकरे यांची भेट
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मंगळवारी मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीनेते धनंजय मुंडे यांच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींसह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ते दरवर्षी स्वा. सावकारांना अभिवादन करतात, पण काही माध्यमं अभिवादन लोकसभेशी जोडत आहेत?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १३६ वी जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. वास्तविक मनसे अध्यक्ष दरवर्षी अशा थोर व्यक्तींना न चुकता अभिवादन करत असतात. मात्र आज काही प्रसार माध्यमांनी त्याचा थेट संबंध कोणताही विषय नसताना लोकसभेशी जोडत म्हटलं आहे, ‘राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आपल्यावरील ठपका पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राज ठाकरेंची भेट
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप बहुमताने पुन्हा देशात सत्तेत आली आहे. त्यात राज्यात भल्या भल्या दिग्गजांचे पराभव झाले आहेत. मात्र असेच पराभव देशभरातील दिग्गज नेत्यांचे झाल्याचे देखील सिद्ध झाले आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाळा संपताच विधानसभा निवडणुका लागणार असल्याने विरोधी पक्षांकडे फारच कमी वेळ असणार आहे. त्यामुळे आतापासूनच अनेकांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
वरळी विधानसभा लढाई; रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त जनता विरुद्ध नाईट लाईफ अशी असेल
शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेनेतच जोर धरू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची पूर्ण चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून या विषयाची माहिती सार्वजनिक केली. संबंधित पोस्टमध्ये लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढवण्याची शक्यता
शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेनेतच जोर धरू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची पूर्ण चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून या विषयाची माहिती सार्वजनिक केली. संबंधित पोस्टमध्ये लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.
6 वर्षांपूर्वी -
कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण: राष्ट्रवादीचा आरोप
खाजगी कोचिंग क्लासेसचे मालक आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असून देखील तो मंत्रालयात केवळ धूळखात पडून असल्याचा थेट आरोप एनसीपीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला आहे. तसेस याकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी देखील अनिल देशमुख यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर, भावेने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास केली मदत
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शनिवारी अटक करण्यात आलेले ‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन. सोनवणे यांनी १ जूनपर्यंत CBI कोठडी सुनावली आहे. दरम्यान हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास पुनाळेकरने मदत केली, तर भावे याने दाभोलकरांच्या घराची रेकी केली, असा सीबीआयचा आरोप आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं: शिवाजी आढळराव-पाटील
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्र्वादीने दुग्गज नेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांना धूळ चारली आणि अमोल कोल्हे खासदार होऊन थेट संसदेत गेले. शिरूर जागा ही शिवसेनेसाठी शंभर टक्के विजयाची खात्री देणारी होती. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघात घड्याळाचं अजिबात कर्तृत्व दिसलं नाही तर या मतदार संघात लोकांनी प्रचारात जातीचं राजकारण केलं आणि भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं, असं माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवाचं विश्लेषण करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर कठोर शब्दात निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात राष्ट्रवादीला दुसरा सहकारी शोधण्याची गरज; अन्यथा काँग्रेससोबत स्वतःही?
लोकसभेचे निकाल लागले आणि पुन्हा मोदी सरकार सत्तेत आले, मात्र काँग्रेस देशात जवळपास भुईसपाट झाली. अगदी देशाच्या संसदेत विरोधी पक्ष नेत्याचं पद देखील अशक्य झालं आहे. देशभरातील तब्बल ८ राज्य काँग्रेसमुक्त झाली आहेत. मात्र महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर इथे देखील राज्य काँग्रेसमुक्त होण्यापासून थोडक्यात वाचलं. परंतु ते देखील लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर काही दिवसांनी आयत्यावेळी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये आले आणि चंद्रपूर लोकसभेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि त्यामुळे काँग्रेस ९ राज्यात भुईसपाट होण्यापासून थोडक्यात वाचली.
6 वर्षांपूर्वी -
शिरूर'मध्ये आढळराव-पाटील पराभूत झाल्याने आ. सोनावणेंची डोकेदुखी वाढली
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेच मोठ्या थाटामाटात शिनबंधन बांधून घेणारे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांची विधानसभेत डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील दिग्गज आणि बलाढ्य नेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मानहानीकारक पराभव केल्याने या मतदार संघात येणाऱ्या जुन्नर विधानसभा क्षेत्रात सध्या शिवसेनेत असलेले आमदार शरद सोनावणे यांची डोकेदुखी वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी