महत्वाच्या बातम्या
-
प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला पुणेकरांचा अल्पप्रतिसाद
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांचा सभांचा धडाका सुरु असून वंचित बहुजन आघाडीचा देखील प्रचार जोमात सुरु आहे. परंतु, पुण्यात शनिवारी सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला लोकच जमली नाहीत. यासभेला फारशी गर्दी झाली नव्हती. मैदानातील खुर्च्या मोठ्या प्रमाणावर रिकाम्याच होत्या. संध्याकाळी याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी सभा होणार असून या सभेला तरी पुणेकर येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल, अशी व्यंगात्मक टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली. शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी आयोजित सभेत आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई ते पालघर; शिवसेना महाराष्ट्रात निवडणूक लढवत आहे की गुजरातमध्ये?
सध्या लोकसभा प्रचाराचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला असताना सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठी प्रचाराचे नवं नवे फंडे वापरण्यात येत आहेत. परंतु शिवसेनेचा मुंबई ते पालघर पर्यंतचा प्रचार हा मुख्यत्वे गुजराती भाषेत होताना दिसत आहे. भाजपसोबत युती करण्याचा शिवसेनेचा मूळ उद्देश केवळ गुजराती मतदार तर नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
कड्डक ट्विट! तुलसी जोशींच्या 'त्या' फाईल चोर व्हिडिओने महाराष्ट्र भाजप तोंडघशी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या तडाख्याने राज्यातील भाजप पूर्ण विचलित झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा करत राज ठाकरे भाजपाला आणि मोदी-शहा या जोडीला व्हिडिओ पुराव्यानिशी कात्रीत पकडत आहेत. परंतु, राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचं उत्तर न देता महाराष्ट्र भाजप ‘लाव रे तो व्हिडिओ’ या नावाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याचे व्हिडिओ ट्विट करून त्यात राज ठाकरेंना मेन्शन करून टोला लगावत आहेत. वास्तविक ज्यांचा साडी चोरतानाचा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपने ट्विट केला आहे, त्या महिला कार्यकर्त्यांची त्याच दिवशी अधिकृतरित्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: स्वर्गीय. बाळासाहेबांनंतर शिवसेनेवर सभेसाठी भाडोत्री गर्दी जमविण्याची वेळ
शिवसेनेच्या कणकवलीतील सभेला मुंबईवरून भाडोत्री अमराठी माणसे आणल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या संबंधित त्यांनी पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील ट्विटर अकाऊंटवर प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी बांधलं 'शिवबंधन'
काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन जाहीर प्रवेश केला. गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून शिवसेनेचे ‘शिवबंधन’ हाती बांधले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भांडूप, शिवडी, पनवेलमध्येही राज ठाकरेंच्या सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील विविध भागातील सभांचा झंजावात सुरू झाला आहे. आतापर्यंत नांदेड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी सभा झाल्या असून आज पुण्यात तर उद्या रायगड येथे सभा होणार आहे. ‘मोदी मुक्त देश’ असा आक्रमक पवित्रा घेतलेले राज त्यांच्या प्रत्येक सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पक्षाची पोलखोल करत आहे. महाराष्ट्रातील हा सभांचा झंजावात संपाल्यावर राज त्यांच्या सभांचा मोर्चा भांडूप, शिवडी, पनवेलमध्ये वळवणार असल्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्तेत असून सेनेने भाजपाला साथ दिली नाही, मग जनतेला कशी देतील? आ. नितेश राणे
युतीच्या सत्तेत असताना भारतीय जनता पक्षासोबत राहू शकली नाही ती शिवसेना जनतेच्या हितासाठी कशी राहील? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी नेरूर येथील जाहीर सभेत उपस्थित करून शिवसेनेच्या थापांना मतदारांनो आता तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
6 वर्षांपूर्वी -
बविआ'चे उमेदवार बळीराम जाधव आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्छाडो यांच्या भेटीला
सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यानिमित्ताने बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्छाडो यांची सदीच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबलं तरी मत भाजपला - प्रकाश आंबेडकरांचा आरोप
सोलापूर: सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील १० लोकसभा मतदारसंघांसाठी मतदार प्रक्रिया सुरु आहे. याच निवडणूक प्रक्रिये दरम्यान महाराष्ट्रात कित्तेक ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान नोंदवण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांमध्ये सोलापूरचा देखील समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
विनोद तावडेंचे राज ठाकरेंना चॅलेंज, 'कट-पेस्ट' चं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्यावी
मुंबई: साऱ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगभरातील मराठी माणसांना आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध करणाऱ्या राज ठाकरेंना विनोद तावडेंनी खास टोला लगावला आहे. विनोद तावडेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान देत ‘कट-पेस्ट’ चं राजकारण सोडून काहीतरी ठोस भूमिका घ्या असं म्हटलं आहे. तसंच पुढे ते म्हणाले राज ठाकरेंनी त्यांचा माणूस आमच्या सोबत पाठवावा मग आम्ही त्यांना गावाची दुसरी बाजू दाखवू.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात ई.व्ही.एम. मध्ये बिघाड, सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान
आज महाराष्ट्रात १० लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. परंतु बऱ्याच ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाडीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि पर्यायी लोकांना तासंतास रांगेत उभे रहावे लागले. बरेच लोक रांगा पाहून पुन्हा मतदान न करता घराकडे वळाले आणि याचा एकंदरीत परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आला.
6 वर्षांपूर्वी -
बोलायला मुद्दे नाहीत म्हणून जातीचे कार्ड खेळताय मोदी : अजित पवार
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचं सांगितले. यावर अजित पवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बोलायला मुद्दे नाहीत म्हणून नरेंद्र मोदी जातीचे कार्ड खेळताय आशी टीका एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी केली आहे. आयोजीत प्रचार सभेत त्यांनी प्रसार माध्यमांसमोर मत व्यक्त केलं.
6 वर्षांपूर्वी -
हे काय? चक्क कट्टर हिंदुत्ववादी व एमआयएम एकाच खोलीत, स्क्रिप्ट देताना?
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात जोरदार प्रचार सुरु केला आहे. संपूर्ण प्रचारात व्हिडिओ पुराव्यानिशी नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पोलखोल होत असल्याने भाजपचे नेते देखील राज ठाकरे यांना वेगवेगळ्या मार्गाने लक्ष करत आहेत. त्यात राज ठाकरे हे बारामतीच्या काकांच्या सांगण्यावरून सर्वकाही करत आहेत आणि त्यांची स्क्रिप्ट बारामतीवरून येते असा खोचक टोला देखील लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाहीतर आत्महत्याग्रस्त शेतकरी भावाच्या अस्थी ‘मातोश्री’वर पाठवणार: शेतकरी कुटुंबीय
भावाने आत्महत्या करुन ४ दिवस झाले. मात्र अजून देखील पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देऊन आलो. परंतु, सगळ्यांना लोकसभा निवडणूक महत्वाची वाटते. जर सदर प्रकरणी पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही, तर भावाच्या अस्थी थेट मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार, असा गर्भित इशाराच उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
देशभरात आज आगामी लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील १३ राज्यांतील ९७ जांगावर १८ एप्रिलला मतदान होत आहे. महाराष्ट्रात बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपला इशारा! मी अस्मितेचा प्रश्न करणार नाही, माझे कार्यकर्ते करतील: हितेंद्र ठाकूर
पालघर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी दरम्यान जोरदार लढाई होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपने आयत्यावेळी निवडणूक चिन्हावरून केलेल्या राजकारणाला अनुसरून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून विरोधकांना इशाराच दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्यांनी मनसेची चड्डी काढण्याची भाषा केली; राज ठाकरेंनी भाजपचीच चड्डी भर सभेत काढली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींनी जाहीर केलेल्या डिजिटल गावाची पोलखोल काल सोलापूरच्या जाहीर सभेत केली. या संदर्भातला व्हिडिओ काल राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जनतेसमोर सादर केला. दरम्यान, सरकारच्या या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केलेला तरूणच राज ठाकरेंनी मनसेच्या मंचावर आणला. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या एका मुलाखतीतील हरिसाल आणि राज ठाकरे यांच्याबद्दलची क्लिप लोकांना ऐकवली होती. संबंधित तरूणाला भारतीय जनता पक्षातील कार्येकर्ते शोधत आहेत. त्याला सांगत आहेत झालं-गेलं विसरून जा, परत ये.
6 वर्षांपूर्वी -
दोनवेळा मतदान करण्याचे आवाहन; भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा
लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रचंड मेहनत करायची आहे. अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा धक्कादायक सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दिला आहे. याविरोधात मंदा म्हात्रे यांच्याविरुद्ध निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवेदन असं उभं राहून स्वीकारतात? तावडेंचा 'स्टॅन्ड अप कॉमेडी' विनोदी फोटो व्हायरल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहेत असं म्हणत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. शुक्रवारी नांदेडमध्ये शो पार पडला आता लवकरच महाराष्ट्रात आणखी काही ठिकाणी त्यांचे स्टँड अप कॉमेडी शो पार पडणार आहेत, असं विधान देखील तावडे यांनी उपरोधाने म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी