महत्वाच्या बातम्या
-
इम्रान खान आणि मोदींचे फिक्सिंग : प्रकाश आंबेडकर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपसात फिक्सिंग आहे असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आयसिसचा काही संबंध आहे का? ते मोहन भागवतांनी सांगावं असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आरएसएस’वर कठोर शब्दात निशाणा साधला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, या भेटीमागे दुसरे कोणतेही अर्थ काढू नका भेट कारण सहजच घेतली भेट होती आणि त्यामागे कोणतंही राजकारण नव्हतं असंही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
लातूरच्या शेतकरी कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या कंपनीने ३ लाख परत केले
सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघाला असताना, शेतीत होणाऱ्या नुकसानीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यात अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्त दुसऱ्या नोकरीच्या शोधात देखील भटकत आहेत. त्यात कमी शिक्षणाअभावी आणि पूर्व अनुभव नसल्यामुळे शहरांमध्ये नोकरी मिळणे देखील अतिशय कठीण असल्याचे अनुभव त्यांना येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या सभांनी राज्यातील भाजप विचलित झाली हे नक्की
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत केवळ २ सभा घेतल्या असून त्यातील पहिली सालाबादाप्रमाणे आयोजित होणारी गुडीपावडव्याची सभा आणि दुसरी नांदेडमध्ये झालेली विराट सभा. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणात केंद्रस्थानी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनच नेते विशेषकरून लक्ष होत आहेत. ज्यांच्यानावावर भाजप राज्यात मत मागत आहेत तेच पुराव्यानिशी उघडे पडत असल्याने राज्य भाजप पूर्ण विचलित झाल्याचं पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेला राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते : शरद पवार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, एनसीपीच्या आघाडीला अनुकूल वातावरण दिसत आहे. आपण अनेक लोकसभा निवडणुका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर २-३ दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते, यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे सूचक विधान एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
6 वर्षांपूर्वी -
पालघर लोकसभा: बहुजन विकास आघाडीचा 'रिक्षा' चिन्हावर स्वार होत प्रचार?
बहुजन विकास आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला असला तरी त्याचा दुसराच अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता आहे, ज्याचा कोणी विचार सुद्धा केला नसावा. बहुजन विकास आघाडीचं ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने जरी गोठवलं असलं तरी, त्यांना देण्यात आलेलं ‘रिक्षा’ चिन्ह त्यांना अधिक फायदा देईल अशी शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
ताडोबा वाघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या खातोडा गेट परिसरात वाघाचा मृत्यू झाला आहे. वाघच्या मृत्यूची माहिती कळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. वाघाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, चंद्रपूरचे तापमान दिवसागणिक वाढत आहे. दुपारी रस्तेही ओस पडत आहेत, मात्र पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. उष्माघातामुळे वाघच्या मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते म्हणाले 'आता बॉम्बस्फोट होत नाहीत'; मोदींना पुलवामात काय झालं ते अजून माहित नाही?
आता बाँबस्फोट होत नाहीत. कारण दहशतवाद्यांना माहीत आहे चौकीदार त्यांना कोठुनही शोधून काढील आणि शिक्षा करेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये केले. काँग्रेस – एनसीपीच्या काळात दहशतवाद वाढला होता. देशात दररोज कुठे ना कुठे बाँबस्फोट होत होते. त्यात सामान्य लोकांचे बळी पडत होते.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्षांत अच्छे दिन आले का? नारायण राणेंचा सवाल
मागील ५ वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का? असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सरकारसह शिवसेना, उद्धव ठाकरे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर प्रचारसभेत तुफान टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाकादेवी येथे जाहीर सभा झाली, यावेळी ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
उद्या राज ठाकरे यांची नांदेडमध्ये जाहीर सभा, पुन्हा मोदी-शहा लक्ष
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात न उतरता भाजपच्या अडचणी राज्यभर सभा घेऊन वाढवत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर जाहीर सभा घेऊन एकप्रकारे विधानसभेची तयारीच सुरु केल्याचे म्हटले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती
VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती
6 वर्षांपूर्वी -
अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात
अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या राड्याची सुरुवात
6 वर्षांपूर्वी -
भाजप आमदाराने विंग कमांडर अभिनंदन यांना दिली चंदन तस्कराची उपमा
लोकसभा निवडणुकीचा आखाडा प्रचार सभांनी तापला असताना आरोप प्रत्यारोपाच्या फैरीदेखील एकमेकांवर झाडल्या जात आहेत. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी मात्र विकासापेक्षा भारतीय सैनिकांच्या शौर्याचा अधिक वापर करून मतांचा जोगवा मागितला जात आहे. परंतु त्या नादात भाजपची नेते मंडळी सैनिकांचाच अपमान वारंवार करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही: उद्धव ठाकरे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी गरीबी हटावची घोषणा करताहेत. खरंतर याआधी त्यांच्या आजीबाईंनी याची सुरूवात केली होती. त्यांची गरीबी हटली, परंतु लोकांची नाही. काँग्रेस देशद्रोहाचे कलम हटवू पाहत आहे. हाच सर्वात मोठा देशद्रोह आहे. हे कलम काढल्यास दाऊद येऊन काँग्रेसचा नेता बनेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची धाकधुक वाढली! अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत येऊन जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे खंबाटा ऐअरलाईन्स मुद्द्यावरून कोकणातील राजकारण प्रचंड तापण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ल्यात जवान शहिद झाले; त्यांना श्रद्धांजली म्हणून मत भाजपला समर्पित करा: मोदी
लातूर येथील औसा येथे मंगळवारी महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान नवमतदारांना मत देण्याचे आवाहन करताना पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या नावाचा वापर केला. दरम्यान नवमतदारांना आवाहन करताना मोदी म्हणाले, तुम्ही तुमचे मत देताना प्रथम देशाचा विचार करा, मत देताना कोणतीही चूक करू नका, तुमचे पहिले मत हे पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना समर्पित करा, शहिदांचे बलिदान लक्षात ठेऊन मत द्या’ असे मोदी यावेळी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
अध्यक्ष महोदय! तुम्ही तर DJP पार्टीवाले, 'दुसऱ्यांची जाळ्यात पकडा'
काल एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करताना, लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेच्या निर्णयावर मनसेचा उल्लेख ‘उनसे’ म्हणजे ‘उमेदवार नसलेला पक्ष’ असा केला आहे. त्यावरून महाराष्ट्र सैनिकांनी देखील देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच लक्ष केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज भाजपाला विकासावर प्रश्न विचारला तर अटक, उद्या फासावर लटकवणार? नेटकरी संतापले
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारसभेदरम्यान एक विचित्र प्रकार शनिवारी अमरावती येथील जरुडमधील प्रचारसभेत घडला. वर्धा लोकसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या तडस यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपा आमदार अनिल बोंडे सभेत भाषण देत होते. त्याचवेळी एका तरुणाने मध्येच उभं राहून बोंडे यांना विकासकामांसंदर्भात प्रश्न विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. पण बोंडेंसहीत इतर नेत्यांनी आपली भाषण सुरु ठेवत वेळ मारुन नेली. मात्र नंतर या प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त अनेक प्रसार माध्यमांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा: शरद पवार
लोकसभा निवडणुकीत जातीसाठी नाही तर आपल्या मातीसाठी मतदान करा, असं म्हणत एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना साथ देण्याचं जाहीर आवाहन मतदाराला केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या या विधानातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देखील अप्रत्यक्षरित्या टोला हणाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात शिवसेना-भाजप खासदारांची संपत्ती ६० टक्क्यांनी वाढली
भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १०६ टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली होती. पण, आता शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे समजते. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी ३.२० कोटींची वाढ झाली आहे. ADRच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१४ आणि २०१९ मधील आकड्यांची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
अभिजित भुर्के यांचा 'राजकारणाच्या फडा'वरून थेट 'मनसे' राजकारणात प्रवेश
आज मुंबईमध्ये मनसेचा शिवतीर्थावर भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला. तुफान गर्दी उसळलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. सध्या समाज माध्यमांच्या आधारे देखील सुशिक्षित तरुणांना मनसे सारख्या आक्रमक आणि रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या पक्षात प्रवेश करावासा वाटत आहे, ही पक्षासाठी जमेची बाजू आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे ‘राजकारणाचा फड’ या फेसबुक ग्रुपचे मॉडरेटर अभिजित भुर्के यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
6 वर्षांपूर्वी