महत्वाच्या बातम्या
-
बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का जयदत्त क्षीरसागर मातोश्रीवर
बीडमधील एनसीपीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधु भारतभूषण क्षीरसागर देखील स्वतः उपस्थित होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान एनसीपीला मोठा राजकीय धक्का बसल्याच म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदींकडून हिटलरची कॉपी, राज ठाकरेंचा घणाघात
नरेंद्र मोदी हे एडॉल्फ हिटलरची कॉपी करत आहेत असा घणाघात राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केला. तसेच जर त्यांच्याविरोधात तोंड उघडलं की देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं ही हिटलरचीच मूळ संकल्पना आहे याची त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली. त्याचाच कित्ता सध्या नरेंद्र मोदी गिरवत आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच २०१४ देशाला दाखवलेली ‘अच्छे दिन’ ही मूळ संकल्पना अमेरिकेतील रूझवेल्ट यांच्या वडिलांची आहे ज्यांनी “Happy Days will come” असा नारा त्यावेळी दिला होता. आता नरेंद्र मोदींनी नेमकी त्यांचीच कॉपी केली आहे, असा आरोप राज ठाकरेंनी भर सभेत केला.
6 वर्षांपूर्वी -
त्या चुकीसाठी पार्थला फासावर लटकवणार का? अजित पवार
माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल. इतर तालुक्यांप्रमाणेच सांगोला तालुक्यातूनही संजय शिंदेंना आघाडी मिळाली पाहिजे, अन्यथा तुमच्या डोक्यावर उरलेले केसदेखील राहणार नाहीत असा सज्जड दम, एनसीपीचे नेते अजित पवार यांनी एनसीपीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांना भर सभेत दिला.
6 वर्षांपूर्वी -
आज मोदींची नांदेडमध्ये तर राज ठाकरेंची मुंबईत सभा
आज गुढीपाडव्याचा मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर तोफ धडाडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता आघाडीला मदत करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभूत करण्यासाठी रणशिंग फुंकणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील नांदेडमध्ये सभा असून भाजप देखील कामाला लागली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना मोदींच्या मुद्यावरून विचलित करण्याची राज्यातील नेत्यांची रणनीती?
मागील काही महिन्यापासून राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशपातळीवरील नेत्यांना लक्ष करण्याचं एकमेव ध्येय ठेवलं आहे. त्यात ते अनेक व्हिडिओ पुरावे दाखवून मोदींना लक्ष करत असल्याने मोदींच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत. त्याचा थेट परिणाम राज्यातील नेत्यांवर देखील होताना दिसत आहे. त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बारामतीचा पोपट असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे कार्यकर्त्यांना म्हणाले की त्यांच्या भाषणाने तुम्ही विचलित होऊ नका.
6 वर्षांपूर्वी -
विनायक राऊतांची वैभववाडीतील ही विराट प्रचार सभा त्यांचा निकाल सांगत आहे?
मागील ५ वर्षे मुंबईत राहून सिंधुदुर्ग-रत्नागिरीच राजकारण पाहणारे खासदार विनायक राऊत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात दिसू लागल्याने आधीच त्यांचा मार्ग कठीण असल्याचं प्राथमिक निष्कर्षात समोर आलं होतं. विकासाचा मुद्दा घेऊन निवडून आले आणि ५ वर्ष दिसेनासे झालेले विनायक राऊत शेवटच्या क्षणी नारळ फोडण्याची स्टंटबाजी करताना कोकणवासीयांना दिसले. मात्र त्याच कोकणवासीयांना आणि स्थानिक शिवसैनिकांनी देखील चांगलाच हिसका दाखवला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिक्षणमंत्र्यांचं गणित बघा; ७००० गुणिले १२ बरोबर ७२ हजार?
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे पुन्हा एकदा सामान्यांच्या टीकेचे लक्ष झाले आहेत. ययाधी ते त्यांच्या पदवीवरून तर कधी त्यांच्या शिवराळ भाषेवरून नेहमीच वादात अडकले आहेत. आज पुन्हा पालघरमध्ये काँग्रेसच्या न्याय योजनेचा गुणाकार उपस्थितांन समोर करत असताना स्वतःच गणित देखील कच्च असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यावरून उपस्थितांमध्ये तावडेंच्या शिक्षणावरून पुन्हा कुजबुज सुरु झाली होती.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: गोंदियात मोदींच्या सभेसाठी प्रति १००-१५० रुपये देऊन गर्दी जमवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल गोंदियात जाहीर सभा पार पडली. याआधी मेरठ आणि वर्धा येथील सभेत गर्दी न झाल्याने भारतीय जनता पक्ष आणि मोदींची मोठी नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र गोंदियात भारतीय जनता पक्षाने विशेष काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले, परंतु त्यातही ते पकडले गेले असंच म्हणावं लागेल. कारण लोकं मोदींना ऐकण्यासाठी स्वतःहून आले नाही तर ही गर्दी पैसे देऊन जमा करण्यात आल्याचे प्रसार माध्यमांच्या पाहणीतून रेकॉर्डवर आलं आहे. त्यामध्ये १०० रुपयांपासून ते प्रति गाडी ५०० रुपयांपर्यंत असं पैसे वाटप करून सभेसाठी लोकांनी आणण्यात आल्याचं स्वतः लोकांनीच कॅमेऱ्यावर मान्य केले.
6 वर्षांपूर्वी -
‘युवांचा आदित्य’मध्ये आदित्य ठाकरेंवर प्रश्नांचा भडीमार, पण टोलवायचं कसं ते मात्र शिकले?
जास्तीत जास्त तरुणांशी स्वतःला आणि पक्षाला जोडण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ‘युवांचा आदित्य’ या कार्यक्रमाच्या माध्यमांतून एक प्रयत्न केला. मात्र यावेळी अनेकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आणि भारताच्या राजकारणात वेळ मारून घेण्याची किंवा विषय टोलवण्याची कला अवगत असणारेच अधिक टिकतात हे सर्वश्रुत असल्याने आदित्य ठाकरेंची ती पोलिटिकल सायन्सची कला यावेळी पाहायला मिळाली. त्यामुळे खोलवर मूळ पोहोचलेला पक्ष आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आदित्य ठाकरे अधिक भक्कम करू पाहत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
पालकांसाठी बुरे दिन! यावर्षी स्कूल बसचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढणार
स्कूल बस मालक संघटनेने वाढलेल्या महागाईचे कारण पुढे करत स्कूल बसच्या दरात आगामी शैक्षणिक वर्षापासून दहा ते पंधरा टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मालक संघटनेने जाहीर केलेल्या धोरणातून ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, डिझेलसह बसचा विमा, कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचा देखभाल खर्च वाढला आहे असं स्पष्ट केलं. याशिवाय मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बस मालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने सुरक्षेच्या नावाखाली आणलेल्या नव्या नियमावलीमुळेही बस मालकांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, २०१९-२० या येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी दहा ते पंधरा टक्के दरवाढ केली जाईल.
6 वर्षांपूर्वी -
महाड तालुका पाणी टंचाईच्या विळख्यात, स्थानिक नेतेमंडळी प्रचारात दंग
मार्च महिना ओलांडताच उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु आता पाणी स्त्रोतांंवर त्याचा परिणाम होत असून पाण्याची पातळी देखील खाली जाऊ लागल्याने महाड तालुक्यावर प्रचंड पाणी टंचाईचे सावट पसरू लागले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत स्थानिक नेत्यांना सामान्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नाही आणि त्यामुळे नागरिक देखील हवालदिल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ते भगवं-पांढरं राहू दे! उद्धव ठाकरेंनी सेनेच्या डझनभर मंत्र्यांच्या कामाचा हिशेब द्यावा: समाज माध्यमं
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात वायफळ मुद्यांना विशेष महत्व देत असून, त्याच मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी केलेला विकास शून्य कारभार आणि राजीनामा नाट्याचे प्रयोग याशिवाय दुसरं काहीच केलं नसल्याने, शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या डझनभर मंत्र्यांच्या ५ वर्षातील कारभाराचा हिशेब सामान्य जनतेला द्यावा असे आवाहन समाज माध्यमं करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत तब्बल २८ कंपन्यांमध्ये भागीदारी - नारायण राणे
कोकणात देखील लोकसभेची धामधूम सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता, पण आज मराठी माणूस केवळ १८ टक्के शिल्लक आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यातून मोहन जोशींना काॅंग्रेसकडून उमेदवारी
अखेर पुण्यातून काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स संपवत माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काल रात्री उशिरा मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी नुकतेच पक्षात दाखल झालेले प्रवीण गायकवाड इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे आढळराव पाटील मदतीसाठी मनसेच्या कार्यालयात? वसंत मोरे म्हणतात 'शेवटी आदेश राजसाहेबांचा
शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये विळा-भोपळ्याचे नाते असले तरी उमेदवार मदतीची चाचपणी करण्याचे सर्व प्रकार अजमावून बघतात आणि तसाच काहीसा प्रकार शिरूर मतदारसंघात येणाऱ्या हडपसर विधानसभा क्षेत्रात घडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभा क्षेत्रात चांगलीच मोर्चे बांधणी केली आहे. त्याचाच प्रत्यय याभेटीनंतर आला आहे असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
‘काँग्रेसमुक्त भारत’ ही भाजपाची फालतू कल्पना: उद्धव ठाकरे
देशातील लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतील आहे. यावेळी उद्धव विविध विषयांना हात घालत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सेना-भारतीय जनता पक्षाची युती, प्रलंबित राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे. परंतु, याच मुलाखतीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनेक मतांशी सहमती दर्शवली मात्र अनेक विषयांशी असहमती देखील दर्शवली.
6 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकरांकडून भिडेंच्या धारक-याला उमेदवारी, गोपीचंद पडळकरांचे फोटो उघड
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, आता पडळकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असल्याची छायाचित्रे सार्वजनिक झाल्याने प्रकाश आंबेडकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. एवढेच नाही तर, पडळकर यांनी भिडे यांना तब्बल अकरा लाख रुपयांची मदत केल्याचा संदेश सुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यामुळे पडळकर अडचणीत येण्याची शक्यता दाट शक्यता निर्माण झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
खंबाटातील ४०० कोटींच्या भ्रष्टाचारात विनायक राऊतांचा हात
बहुचर्चित तब्बल ४०० कोटींचा भ्रष्टाचार करून एका रात्रीत सर्वाधिक म्हणजे एकूण २७६३ कामगार तसेच त्यांच्या तब्बल दहा ते अकरा हजार कुटूंबियांना रस्त्यावर आणणा-या खंबाटा एव्हिएशन कंपनीतील घोटाळय़ाचा खरा सूत्रधार, या कंपनीचा निरव मोदी हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत असून बहुतांश कोकणातील कामगार असलेल्या या खंबाटातील भ्रष्टाचारातुन विनायक राऊत यांनी कोकणी माणसाचीच फसवणूक केली आहे असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला.
6 वर्षांपूर्वी -
खान डौलत डुलत आला, सैय्यद बंडा त्याच्या संगतीला: राष्ट्रवादीकडून व्हिडिओ प्रसिद्ध
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एनसीपीने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अफझल खानाच्या फौजेत फितूर वाघ’ अशी जहरी टीका एनसीपीने केली आहे. त्याचवेळी पाच वर्ष अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज थेट त्यांच्याच छावणीत. हेच का शिवरायांचे मावळे?? यांनी शिवरायांच्या नावाने मते मागणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही अफझल खानाच्या फौजेत जाऊन सेनेच्या सेनापतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगर गाठले, असे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केलीआहे.
6 वर्षांपूर्वी -
राऊतांची शिष्टाई कामी नाही आली, जगताप - बारणेंतील वाद मिटेना, पार्थ पवारांना फायदा
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यादरम्यान समझोता करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही शिष्टाई कामी आली नसल्याचे वृत्त आहे. लक्ष्मण जगताप यांनी खासदार बारणेंचे काम करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे कळते. त्यामुळे मावळातील शिवसेनेचा उमेदवार धोक्यात तर एनसीपीचे उमेदवार पार्थ पवार यांचा मात्र फायदा होणार आहे.
6 वर्षांपूर्वी