महत्वाच्या बातम्या
-
काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण; प्रेस नोटवरून आदित्य ठाकरेंची प्रसार माध्यमांवर आगपाखड
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेत आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. गुरूवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने तंबी देताच ते काश्मिरी तरुण सभ्य झाले, काल जय जयकार केलेल्या युवासैनिकांची हकालपट्टी
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेत आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. गुरूवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आघाडीसोबतचे तर्क केवळ माध्यमांमध्ये, पण राज ठाकरेंची वेगळीच रणनीती आहे?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती आणि त्यानंतर माध्यमांमध्ये या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. त्यात राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, तत्पूर्वी एक घटना दिल्लीत घडली होती आणि ती म्हणजे स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांसमोरच एकमेकांना भिडले
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केलेली असताना, माढा मतदार संघात येणाऱ्या फलटण तालुक्यात एनसीपीमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान, आज स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासमोरच शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे कार्यक्रमात गोंधळ आणि तुफान घोषणाबाजी सुरू झाली, त्यामुळे पवारांना देखील आपले भाषण काहीवेळ थांबवावे लागले.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो सावध आणि सतर्क राहा! लाइफलाइनवर दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट
मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी ३ महिन्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्या धर्तीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा जारी केला आहे. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी अरबी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची विश्वसनीय माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.
6 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळ यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण
छगन भुजबळ यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण
6 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण!
धनंजय मुंडे यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण!
6 वर्षांपूर्वी -
युती झाल्याने नगरमध्ये शिवसेनेचे घनश्याम शेलार यांनी शिवबंधन तोडलं
भाजप बरोबर युतीच निर्णय जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत नाराजांची संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे. त्याचाच प्रत्यय नगर जिल्ह्यात आला आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीगोंद्यात सेनेला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
6 वर्षांपूर्वी -
मराठी कुटुंबाला त्यांचं घर मिळवून दिलं, आनंद दिघेंचा आदर्श तुलसी जोशी आजही जपत आहेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलत नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. त्यापैकीच अजून एक मदतीचं प्रकरण विरार येथून समोर आलं आहे. मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा सदर मराठी कुटुंबाने विरार येथे घर घेण्यासाठी खर्ची घातला होता.
6 वर्षांपूर्वी -
किसान सभेचा भव्य लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. परंतु, ही चर्चा पूर्णतः निष्फळ ठरली आहे. कारण या चर्चेतून लॉंग मार्च रोखण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तोडगा निघू शकलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव यांनी भाषणात 'चौकीदार चोर हैं' म्हटलं होतं, आता 'चौकीदार थोर आहेत' बोलण्याची शक्यता?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्ष झपाटून कामाला लागले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणजे सत्तेत राहून तब्बल साडेचार वर्ष मोदींवर आणि भाजपवर वारंवार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यावरून पलटले आहेत. अगदी विरोधकांच्या सुरात सुर मिळवून राफेल लढाऊ विमानांच्या कारणावरून देखील मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
राणे फडणवीस भेट! नारायण राणे शिवसेने विरोधात ५ जागांवर तगडे उमेदवार देणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील जोरदार पणे कामाला लागला आहे. भाजप-शिवसेना युती झाली तरी देखील खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष राज्यातील ५ मतदारसंघांमध्ये तगडे उमेदवार उभे करणार आहेत. हे पाचही महत्वाचे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. सध्या शिवसेनेत अनेक वरिष्ठ पदाधिकारी युती केल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे कदाचित अशांनाच आर्थिक रसद पुरवून शिवसेनेविरुद्ध तगडं आवाहन उभं केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेचे नितीन नांदगावकरांच्या तडिपारीमागे आकृती बिल्डर?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी आकृती बिल्डरच्या सायन प्रतीक्षा नगर येथील SRA ट्रान्झिट कॅम्पची दयनीय अवस्था आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या तब्बल १३७ मराठी कुटुंबीयांचं वास्तव समोर आणलं. त्यात कहर म्हणजे या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या १३७ कुटुंबियांच्या घरातील वीज आणि पाणीपुरवठा देखील सदर बिल्डरने काढून घेतला आहे. संबंधित मराठी कुटुंबीय अपात्र आहेत किंवा नाही याचा कोणताही अधिकृत निकाल लागण्यापूर्वीच त्यांना मूलभूत सुविधांपासून दूर करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नितीन नांदगावकर यांनी सामान्य मराठी माणसाच्या हक्कांसाठी आकृती बिल्डरला धडा शिकवण्याचा मानस केला होता.
6 वर्षांपूर्वी -
हफ्ते बंद झाले म्हणून कारवाई? नितीन नांदगावकर आणि सामांन्यांची मुंबई पोलिसांवर टीका.
हफ्ते बंद झाले म्हणून कारवाई? नितीन नांदगावकर आणि सामांन्यांची मुंबई पोलिसांवर टीका.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांसमोर गप्प! आता म्हणतात भाजपा नव्हे ‘NDA’ ठरवेल आगामी पंतप्रधान
२०१४ मधील निवडणुकीपेक्षा यंदा भारतीय जनता पक्षाने शंभर जागा कमी जिंकल्यास, आगामी पंतप्रधान भारतीय जनता पक्ष नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए ठरवणार, असे सूचक विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. विशेष म्हणजे हेच बोलण्याची संधी त्यांना अमित शहा एकाच पत्रकार परिषदेत उपस्थित असताना सुचले नाही हे विशेष.
6 वर्षांपूर्वी -
नक्की भीती कोणाला वाटतेय? सर्वसामान्यांना की कायदा मोडणाऱ्यांना? की लाचखोरांना?
नक्की भीती कोणाला वाटतेय? सर्वसामान्यांना की कायदा मोडणाऱ्यांना? की लाचखोरांना?
6 वर्षांपूर्वी -
स्वबळाचं वचन मोडणारे उद्धव ठाकरे म्हणतात, 'आमच्या पाठीत वार स्वकीयांनीच केले'
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीनंतर टीका करणाऱ्यांवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. दरम्यान, शिवसैनिकांकडून हात वर करून स्वबळाचं वचन घेऊन देखील स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच ते पायदळी तुडवलं. त्यानंतर सामान्य मराठी माणसापासून ते विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. साडेचार वर्षानंतर अचानक भाजप आपल्याला पोषक भूमिका घेत असल्याचा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना निवडणुकीला महिना शिल्लक असताना झाला.
6 वर्षांपूर्वी -
राज संधी साधू नाहीत, सेनेने केवळ ३ पेंग्विन व शिववडा दिल्याचं मराठी माणसाला माहित आहे
शिवसेनेने केवळ स्वार्थी आणि संधीसाधू राजकारण केलं आहे. जेव्हा २०१४ मध्ये देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट होती, तेव्हा शिवसेनेने केवळ स्वतःचा फायदा करुन घेतला. परंतु, जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत बनत गेलं तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली, अशा शब्दात काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेवर प्रचंड संतापलेला मराठी माणूस राज ठाकरेंसोबत एकवटू शकतो: सविस्तर
काल भाजप शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आणि त्यानंतर मराठी जनमानसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांच्या बद्दल प्रचंड संतापाची भावना निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील साडेचार वर्षांपासून स्वबळ आणि स्वाभिमानाच्या बाता मारणारे उद्धव ठाकरे किती ठाम मताचे आहेत हेच यातून अधोरेखित झालं आहे. केवळ आगामी निवडणुकीत स्वतःची जास्त जागांची सुप्त इच्छा पूर्ण कारण्यासाठीच त्यांनी सामान्य मराठी मतदाराला अक्षरशः मूर्ख बनवलं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला मराठी मताच्या जबर फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सत्ताकाळात डझनभर मंत्र्यांनी विकासाची काहीच कामं केली नाहीत म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हिंदुत्व आणि राम मंदिर असे भावनिक मुद्दे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेर काढले. परंतु, शिवसैनिकांकडून स्वबळाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःच शपथ मोडून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्याचा देखील त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
युतीच्या काही दिवस आधी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा केलेला शाब्दिक सम्मान - युतीया
युतीच्या काही दिवस आधी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा केलेला शाब्दिक सम्मान – युतीया
6 वर्षांपूर्वी