महत्वाच्या बातम्या
-
ठाण्यात अनेक नगरसेवक उत्तर भारतीय, आम्ही युपी'वाल्यांच्या पाठीशी खंबीर: एकनाथ शिंदे
शिवसेनेचे ठाण्यातील आमदार तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उत्तर भारतीय समाजाचे गोडवे गाण्यास सुरवात केली आहे. मराठी माणसासाठी एकही उच्चार न करता त्यांनी केवळ उत्तर भारतीयांचे आणि शिवसेनेच्या अतूट नात्याचे दाखले नवी मुंबईतील आयोजित कार्यक्रमात दिले आहेत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही.
6 वर्षांपूर्वी -
पत्र मिळालं, आपणास शुभेच्छा; असं एका ओळीत उत्तर देत अण्णांची मोदींकडून हेटाळणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागील ५ वर्षांत तब्बल ३८ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्यावर अखेर त्यांनी प्रथमच अण्णांच्या पत्राला केवळ एका ओळीत उत्तर देत त्यांची अप्रत्यक्ष हेटाळणीच केल्याचे म्हटले जात आहे. त्यात अण्णांना उत्तर देताना म्हटलं आहे की, ‘तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा’ केवळ एवढाच एका ओळीचा उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आला आहे. परंतु, अण्णांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या, लोकपाल नियुक्ती तसेच प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे नरेंद्र मोदींनी स्पष्ट टाळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर भूकंप: एनडीआरएफची पथकं दाखल, स्थानिकांमध्ये जनजागृती करणार
पालघर जिल्ह्यात अजून वरचेवर भूकंपाचे धक्के बसने सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. कालच्या दिवसभरात भूकंपाचे ५ सौम्य धक्के जाणवले तसेच यामध्ये अनेक घरांना तडे गेल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण; आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांकडून अटक
भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे याला आज सकाळी स्थानिक पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. दरम्यान, पुण्यातील सत्र न्यायालयानं काल त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला अटक केली.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: प्रसिद्ध अमृततुल्यवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
मागील अनेक महिन्यात पुण्यात प्रचंड प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या आणि शहरातील काॅर्पाेरेट लुट असणाऱ्या अमृततुल्यावर राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली आहे. एकही परवाना न घेता तसेच विना नाेंदणी चहा विक्री करणाऱ्यांच्या विराेधात राज्य एफडीएकडून धडक कारवाई करण्याची जोरदार माेहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, या धडक कारवाईत बुधवार पेठेतील प्रसिद्ध येवले अमृततुल्य तसेच साईबा अमृततुल्यच्या विविध शाखांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते ४८ तास सावधान! या नियमाच्या आड कोणीही विजयी उमेदवारावर आधीच ट्रॅप लावू शकतो? सविस्तर
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक विजयी उमेदवार खोटे शिक्षणाचे दाखले, जातीचे दाखले तसेच संपत्तीबद्दलची खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिल्यामुळे, त्यांचं नगरसेवक पद रद्द होण्यापर्यंत विषय जाऊन पोहोचतो. परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा त्रास नसला तरी भविष्यात या नव्या नियमामुळे अनेक विजयी उमेदवार भविष्यात निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकून स्वतःची खासदारकी किंवा आमदारकी गमावून बसू शकतात. विशेष म्हणजे कोणीही राजकीय विरोधक प्रतिस्पर्धीना मतदानाच्या ४८ तास आधी शिस्तबद्ध अडकवू शकतात.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांचे वजन उपोषणाच्या चौथ्या दिवशी साडे तीन किलोने घटले
आज अण्णांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्याच्या वजनात तब्बल साडेतीन किलोची घट झाली आहे. अण्णांच्या वयाचा विचार करता ते त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं नाही असं डाक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, मोदी सरकार अण्णांच्या उपोषणाची जराही दखल घेत नसल्याची खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतल्याचे कळते.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यात हेल्मेट सक्ती; आंदोलनकर्त्यांनी भाजप आमदार मेधा कुलकर्णींना हुसकावून लावले
पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे शहरात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान, यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णी सुद्धा उपस्थित होत्या. काही वेळाने आंदोलनकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात करताच, उपस्थित आमदार मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री तुमच्या सोबत आहेत, असं आंदोलनकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या संवाद साधत असताना आंदोलनकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी मेधा कुलकर्णी थेट इथे दादागिरी करू नका, अशी घोषणाबाजी करत थेट हुसकावून लावले.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-ठाण्यात मराठी माणूस कोणासोबत? 'उत्तर भारतीय सन्मान' की 'मराठी आत्मसन्मान'? सविस्तर
आगामी निवडणुकीत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उफाळून येऊ शकतो. त्यात मुंबई आणि ठाण्यातील मागील काही वर्षात अनेक लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघात अमराठी मतदारांचे प्रमाण इतके वाढले की शिवसेनेसारख्या पक्ष सुद्धा मतांच्या लाचारीत मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर’सारख्या शहरांमध्ये ‘उत्तर भारतीय सन्मान’ मेळावे आयोजित करून मराठी अस्मिता खुलेआम वेशीवर टांगताना दिसत आहेत. किंबहुना मुंबई ठाण्यासारख्या शहरातील मराठी माणूस हा शिवसेनेसाठी केवळ मतांसाठीच राखीव असल्याचे सध्याचे चित्र आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठी माणसाच्या हक्कांसाठी जन्मलेली शिवसेना आज मराठी माणसाच्या विरोधात
राज्यात बाळासाहेबांच्या नैत्रुत्वात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना आज केवळ मराठी माणसाच्याच विरोधात काम करत आहे. त्यात व्यवसाय करण्यासाठी पुढे येणा-या मराठी तरूणांच्या आड येण्याचे कारनामे सुद्धा सध्या शिवसेनेवाले करत आहेत. मग अशावेळी मराठी माणसांनी मूग गिळून गप्प बसायचे का? अशावेळी मराठी तरूण-तरुणींनी रोजगार कोणाकडे मागायचा? यापुढे आम्ही असे अजिबात होऊ देणार नाही असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
सत्ता आल्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करणार: जयंत पाटील
देशात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केली. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूनंतर उलटसुलट चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली होती आणि त्यांची ईव्हीएममुळे हत्या झाली, असे हॅकरने म्हटल्यानंतर खळबळ उडाली होती.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांची लवकरच पुणे, बारामती, मावळ व शिरूर मतदारसंघासाठी आढावा बैठक
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुढील आठवड्यात पुणे दौ-यावर येत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ते पुणे, बारामती, मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेणार असल्याचे वृत्त आहे. तसेच संबंधित मतदारसंघातील बुथ प्रमुखांना ते मार्गदर्शन सुद्धा करणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांच्यामागे सुद्धा हजारो मतदार, सोबत आले तर फायदाच: भुजबळ
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु, स्वतः शरद पवार किंवा राज ठाकरे यांच्याकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सदर युतीबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता, ‘राज ठाकरे याच्याकडे सुद्धा हजारो मतदार असून ते आघाडीसोबत आले तर फायदाच होईल’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच एकप्रकारे राज ठाकरे आणि मनसेचे आगामी लोकसभा निवडणुकीतील महत्व अधोरेखित केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पहिली कोकणातील मंदिरं मग सरकार, रिफायनरी कक्षेतील ३२ प्रार्थना स्थळं पाडू देणार नाही: नितेश राणे
‘पहिली कोकणातील मंदिरं मग सरकार’ असा नारा देत आज नाणार रिफायनरीच्या कक्षेत येणा-या तब्बल ३२ प्रार्थना स्थळांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रदूषणकारी रिफायनरीमुळे कोकणच्या देवळातील मूर्ती तसेच मंदिरे आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा नारा आमदार नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. तसेच कोकणासाठी विनाशकारी असणाऱ्या नाणार रिफायनरीला कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही, अशी घोषणाच त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना केली.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात थंडीची हुडहुडी २ दिवसांत अजून वाढणार
राज्यभर सध्या थंडीची हुडहुडी भरली असता अजून एक वृत्त आले आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणार्या अतिथंड वार्यांच्या प्रवाहांमध्ये मोठी वाढ झाल्याने महाराष्ट्राच्या अनेक भागातील किमान तापमानात मोठी घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळेच थंडीच्या लाटेची तीव्रता अजून वाढल्याचे जाणवत आहे, तर पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणवर, मोदी सरकारची डोकेदुखी वाढली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा उपोषणच्या मार्गाने एल्गार पुकारला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सुद्धा राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, तत्पूर्वीच गिरीश महाजन राळेगणसिद्धीला येऊन काहीच फरक पडणार नसून अण्णा तरीदेखील उपोषणाला बसणारच आहेत असे सांगून त्यांना भेटण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
जॉर्ज यांनी कामगारांना अर्थवादात ओढले व कामगार चळवळीचे नुकसान झाले: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहत अत्यंत दुःख व्यक्त केले. त्यात त्यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, जॉर्ज फर्नांडिस यांचा स्वतःचा असा एक कालखंड होता. ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या काळात तळपत राहिले. परंतु हा तळपणारा तारा आता निखळला. तसेच आता राजकीय क्षितिजावरील एक धगधगती मशाल सुद्धा विझली आहे. इतिहासाच्या पानावर जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव कुणाला पुसता येणार नाही, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखात म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाना पाटेकर यांना मातृशोक, आई निर्मला पाटेकर यांचे वृद्धापकाळाने निधन
ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना मातृशोक झाला आहे. नाना पाटेकरांच्या आई निर्मला गजानन पाटेकर यांचे आज मुंबईतील राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९९ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर आज ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे
अमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे
6 वर्षांपूर्वी -
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज एनसीपी’त जाहीर प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात राहिलेल्या वाघेला यांनी आता एनसीपी’सोबत पुढचा राजकीय प्रवास सुरु करण्याची तयारी केली आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी तशी अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी