महत्वाच्या बातम्या
-
विवाह इच्छुक वधूंना हवा स्वतःचा फ्लॅट असणारा नवरा, लग्न जुळणं कठीण? सविस्तर
पूर्वी तंत्रज्ञनाचा सुळसुळाट नसल्याने समाज हा एकमेकांशी थेट जोडलेला होता. त्यामुळे नातेवाईक आणि मित्र मंडळी सुद्धा एकमेकांच्या परिवारांसोबत जोडले गेले होते. अशा परिस्थितीत विवाह जुळवणे आणि लग्नासाठी इच्छुक स्थळ शोधणे सोपं होतं. त्याचं मुख्य कारण होतं ते समाज एकमेकांच्या थेट संपर्कात असायचा. तसेच गरजा मर्यादित असल्याने काही ठराविक गोष्टी इच्छेनुसार असतील तर विवाह सुद्धा लवकर जुळणं सोपं असायचं. परंतु, आज परिस्थिती फार कठीण होताना दिसत आहे. त्यामुळे एकूणच बदलेल्या परिस्थितीमुळे विवाह व्यवस्था सुद्धा फार कठीण गोष्ट होऊन बसली आहे.
6 वर्षांपूर्वी -
विमा कंपन्या व बँकांच्या संगणमताने शेतकऱ्यांची लुबाडनूक
विमा कंपन्या व बँकांच्या संगणमताने शेतकऱ्यांची लुबाडनूक
6 वर्षांपूर्वी -
मराठी सिनेमे ‘नशिबवान’ नाहीत; भाऊ कदमची पोस्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची गळचेपी झाल्याचं उदाहरण समोर आलं आहे. विशेष करून हिंदी भाषिक सिनेमांमुळे मराठी चित्रपटांची होणारी गळचेपी रोजचीच झाली आहे .कारण ‘आणि…डॉ काशिनाथ घाणेकर’, भाई, लव्ह यू जिंदगी या चित्रपटानंतर आता भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला ‘नशिबवान’ या चित्रपटाला शो मिळणे सुद्धा फार कठीण झाले आहे. त्यामुळे भाऊने कदमने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्वतःच्या भावना आणि चीड व्यक्त केली आहे. ‘नशिबवान’ हा चित्रपट मागील शुक्रवारी म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला धक्का; डान्स बार'मधली छमछम सुरु होणार
राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने डान्स बारसाठी घालून दिलेली नियमावली सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालात रद्द केले आहे. त्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा डान्स बारमधील छमछम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमांविरोधात अनेक डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
मतांसाठी वाट्टेल ते? प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय: पूनम महाजन
उत्तर भारतीय समाज म्हणजे मुंबईचा कणा असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांनी एका कार्यक्रमात विधान केला आहे. युपीच्या लोकांनी पुढे जाण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. तसेच या समाजानं मुंबईच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्याही विकासात मोलाचं आणि भरीव योगदान दिलं आहे, असं सुद्धा त्या उपस्थित उत्तर भारतीयांना संबोधित करताना म्हणाल्या. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे भाष्य केलं.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उत्तर मध्य मुंबईची आगामी लोकसभा निवडणूक प्रिया दत्त लढणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, त्यांच्या जागी आता स्वच्छ प्रतिमेचे राज्याचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी ही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
वाळलेल्या कापसाला 'कापूस सुकून गेलाय' असं आदित्य म्हणाले, अन शेतकरी सुद्धा हसले
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ते दुष्काळग्रस्त भागांना भेटी देत आहेत. काल नांदेडपासून सुरु झालेला त्यांचा दौरा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील साळवा गावाला भेट देण्यापर्यंत झाला.
6 वर्षांपूर्वी -
शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्याचे कोर्टाचे आदेश
राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणारे भव्य शिवस्मारक. परंतु, आता त्याच शिवस्मारकाचे काम थांबवण्यात यावे असे थेट आदेश महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
#BreakingNews - भाजप डोंबिवली शहर उपाध्यक्षाच्या दुकानातून १७० प्राणघातक शस्त्रे जप्त
डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने तब्बल १७० प्राणघातक शस्त्रे जप्त केल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे. धनंजय कुलकर्णी या भाजप कार्यकर्त्यांचं वय वय ४९ वर्षे असून, त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
नेतृत्वाला खुश करण्यासाठी विनायक राऊत करत असलेली वायफळ भाषणबाजी पक्षाच्या अंगलट?
आधीच खंबाटा आणि नाणार सारखया विषयांवरून पक्षाला अडचणीत आणणारे खासदार विनायक राऊत सध्या त्यांच्या कोकणातील वायफळ भाषांबाजीतून स्वतःच्या पक्ष नैतृत्वाला खुश करण्याचे केविलवाणे प्रयत्न सातत्याने करत आहेत. मोदीलाटेत लोकसभेला रत्नागिरी मतदारसंघातून निवडून आलेले खासदार विनायक राऊत यांचा राणे कुटुंबियांवर आरोप करून आणि खालच्या भाषेतील शब्द वापरून पक्ष नैतृत्वाला खुश करणे हा एकमेव कार्यक्रम सुरु आहे. मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले की विकासाचा मुद्दा राहिला लांब आणि केवळ राणे कुटुंबीय हेच त्यांचं एकमेव लक्ष असायचं स्थानिक प्रसार माध्यमांच्या सुद्धा निदर्शनास येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
आनंद दिघेंच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला होता; नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले
शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. परंतु, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन आणि आदेशाप्रमाणे त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सामान्यांना भासवण्यात आले, असा धक्कादायक आणि अति गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. तसेच हा प्रकार ज्या २ शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना देखील संपवण्याचे आदेश बाळासाहेबांनी दिल्याचा आरोप सुद्धा यावेळी निलेश राणे यांनी केला आहे. एका मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अहो मोठा-भाऊ लहान-भाऊ नाही, ते प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे: प्रकाश आंबेडकर
शिवसेना आणि भाभारतीय जनता पक्ष यांच्यातील भांडण हे पती पत्नीचं नाही तर प्रियकर प्रेयसीचं यांच्यातील आहे अशी बोचणारी प्रतिक्रिया भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत दिली आहे. नाशिकला बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: 'बाबा किती खायचे ओ?' नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर टीका
आमदार नितेश राणे यांनी चक्क व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंवर बेस्ट संपाच्या विषयाला अनुसरून जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सलग ७व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. त्यावरुन, नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजकारण्यांनी कोणत्याही सांस्कृतिक संस्थामध्ये हस्तक्षेप करू नये : गडकरी
आधीच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नंतर रद्द केल्यामुळे वादात अडकलेल्या यवतमाळ येथील ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात राज्य सरकारचे चांगलेच खडे बोल सुनावले आणि राजकारण्यांना दोन मोलाचे सल्ले दिले.
6 वर्षांपूर्वी -
‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सीबीआय संचालक आलोक वर्मा प्रकरणी मोदी सरकारवर व्यंगचित्रातून बोचरी टीका केली आहे. व्यंगचित्रामध्ये एका बाजूला पंतप्रधान मोदी खड्डा खोदताना रेखाटले आहेत. या भागाला त्यांनी ‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ असे नाव दिले आहे. तसेच यात वर्मा प्रकरण मृतदेहाप्रमाणे दाखवले आहे. त्यामुळे वर्मा प्रकरण खड्यात गाडून संपवून टाकण्याचे मोदींचे प्रयत्न व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
१० टक्के सवर्ण आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकेल का? पवार साशंक
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना मोदी सरकारनं दिलेलं एकूण १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, याबद्दल एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला असता ही शंका त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारकडून सदर निर्णय नेमका कोणासाठी घेण्यात आला आहे?, असा प्रश्न विचारत हे आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचं मत अनेक प्रसिद्ध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी मोदींवर सुद्धा जोरदार निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागात आले की 'युती गेली खड्ड्यात' अन मुंबईत गुपचूप युतीची बोलणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा राज्याच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर गेले की, ‘युती गेली खड्ड्यात’, अशा घोषणा देतात. त्यानंतर मुंबईत पोहोचले की पाठच्या दाराने गुपचूप मुख्यमंत्र्यांसोबत निवडणुकसंदर्भात युतीची चर्चा सुरु करतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भर सभेत केली.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन
मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर प्रधान यांचे आज वयाच्या ८३ व्हा वर्षी निधन झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुढील जन्मी अदानी-अंबानी होईन असे वाटल्याने पतीची आत्महत्या, या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज यवतमाळ येथे सुरुवात झाली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या अर्धांगिनी असलेल्या वैशाली येडे यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आज त्यांनी उपस्थितांशी आणि समस्त महाराष्ट्राशी भावनिक संवाद साधला आणि व्यवस्थेचे वास्तव प्रत्येकासमोर ठेवले असेच म्हणावे लागेल.
6 वर्षांपूर्वी -
सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही: वैशाली येडे
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज यवतमाळ येथे सुरुवात झाली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या अर्धांगिनी असलेल्या वैशाली येडे यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आज त्यांनी उपस्थितांशी आणि समस्त महाराष्ट्राशी भावनिक संवाद साधला आणि व्यवस्थेचे वास्तव प्रत्येकासमोर ठेवले असेच म्हणावे लागेल.
6 वर्षांपूर्वी