महत्वाच्या बातम्या
-
सावित्रीबाई फुले विद्यापीठ; पदवीदान समारंभात ‘पगडी’वरून गोंधळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात पगडीवरून प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पदवी प्रदान समारंभातील पुणेरी पगडीला उपस्थित विद्यार्थी संघटनांनी मोठा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण, विद्यापीठाच्या आजच्या पूर्वनियोजित पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेसकोड बदलून त्यात पेशवाईच्या काळातील ड्रेसकोड जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करीत विद्यार्थी संघटनांकडून समारंभात मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
यांची डिग्री फेलं, लग्न फेल, चाय फेल, नोटाबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, आता रा'फेल'
एनसीपीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला आज सुरुवात झाली आहे. दरम्यान, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन एनसीपीने भारतीय जनता पक्ष आणि युती सरकारच्या विरोधातजोरदार आघाडी उघडली आहे. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी युती सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ते नरेंद्र मोदींवर बोचऱ्या शब्दात टीका केली.
6 वर्षांपूर्वी -
अविनाश जाधव व MMRDA अतिरिक्त आयुक्तांची भेट, रखडलेल्या रांजणोली व मानकली उड्डाणपुलांचे काम सुरू होणार
MMRDA च्या माध्यमातून प्रस्तावित आणि मागील ५ वर्षांपासून रखडलेल्या रांजणोली-मानकोली या दोन उड्डाणपुलांचे काम या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार असल्याचे आश्वासन MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. मनसे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेतली आणि बैठकीत सर्व विषय तसेच अडचणीचा पाढा वाचला.
6 वर्षांपूर्वी -
सोलापूरला निवडणूकपूर्व स्मार्ट गाजर? लोकार्पणाच्या नावाने पुन्हा मोदी-मोदी-मोदी इव्हेंट?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते सोलापुरातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी सोलापुरात भाजपने एखाद्या पूर्वनियोजित इव्हेंटप्रमाणे तयारी केल्याचे निदर्शनास येत होतं. तसेच, सोलापुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून, अनेक ठिकाणी पंतप्रधानांच्या मोठ्या स्वागतासाठी पोस्टर्स आणि होर्डिंग्सचा सुळसुळाट करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: नाशिकरांची २०४१ पर्यंत तहान भागवणार; 'राज' स्वप्नं म्हणजे मुकणे पाणीपुरवठा योजना लवकरच सज्ज
नाशिकमधील मनसेच्या सत्ताकाळातील अजून एक महत्वपूर्ण योजना पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण झाली आहे. नाशिक शहरासाठी महत्वाचा आणि २०४१ पर्यंत नाशिक शहराची तहान भागवेल अशी मुकणे पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. सत्ताकाळात राज ठाकरे यांनी या योजनेचे जनतेला जाहीर सादरीकरण सुद्धा केलं होतं. आता त्याच महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
होय जाणारच अमितच्या लग्नाला, त्यात राजकारण नाही! आदित्य ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेचं लग्न येत्या २७ जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिकाही मातोश्रीवर नेऊन दिली, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला लग्नाचे निमंत्रण दिले. परंतु, पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना लग्नाला जाणार का असा गमतीने प्रश्न विचारला.
6 वर्षांपूर्वी -
पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना आम्ही घाबरत नाही: संजय राऊत
‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लातूर येथे दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात शाब्दिक हमरीतुमरीला सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना उत्तर देताना असल्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे असे म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेचे नाव पुढे करून आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? असीम सरोदे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या स्थानिक शाखेने इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध केल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले असे आयोजक कारणं देते आहे.
6 वर्षांपूर्वी -
आमदारकीचा कार्यकाळ संपल्याने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा
शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा म्हणजे विधानपरिषद आमदारकीचा कालावधी आज संपणार आहे. दरम्यान, मी पक्षावर नाराज नाही, परंतु शिवसेनेत मला एखादी नवीन जबाबदारी दिली जाईल अशी आशा आहे, असं त्यांनी प्रसार माध्यमांकडे मत व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरूर यावं : राज ठाकरे
प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. त्यानंतर बरेच वादळ निर्माण झाले होते. साहित्यावर नितांत प्रेम करणारे राज ठाकरे यांच्या पक्षाकडून तशी मागणी झाल्याच्या बातम्या पुढे आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. परंतु, त्याबरोबर अनेकांनी वेगळीच शंका सुद्धा व्यक्त केली होती आणि ती म्हणजे मनसेच्या नावाने दुसरंच कोणी तरी हे करत आहे का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना-भाजपामध्ये जागावाटप आणि युतीच्या गुप्त चर्चा सुरू, ४ बैठका झाल्या
आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस-एनसीपीदरम्यानचे जागावाटप पूर्णत्वाला आली असताना आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची सुद्धा गुप्तपणे चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत एकूण ४ बैठका मुंबईतच पार पडल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रतिष्ठित वकील उज्ज्वल निकम राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या आखाड्यात ? 'पॉवरफुल्ल युक्ति'(वाद)
महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि वजनदार वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे पॉवरफुल्ल युक्ति'(वाद) सुरू असल्याचं वृत्त आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये कायदेतज्ज्ञाना मोठं महत्व प्राप्त झालं आहे. मजीद मेमन यांच्यानंतर आणि त्याहूनही मोठं नाव म्हणजे उज्वल निकम. देशातील तसेच राज्यातील अनेक महत्वाचे खटले त्यांनी लढवले आहेत आणि हिंमतीने जवाबदारी पार पाडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वाच्या नावावर असा खेळखंडोबा काँग्रेसच्या काळात सुद्धा झाला नव्हता: उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उफाळलेला केरळमधील शबरीमला मंदिराचा वाद आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींनी मांडलेली भूमिका या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेने मोदी सरकार आणि आरएसएस’वर सामनामधून बोचरी टीका केली आहे. ‘हिंदुत्वाच्या नावावर देशात सध्या जो खेळखंडोबा सुरू आहे तसा तर काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा झाला नव्हता असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सामनामधून केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुंतवणुकदारांचे पैसे थकवले, भाजपचे मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल'ची खाती सेबीकडून सील
गुंतवणुकदारांचे तब्बल ७४ कोटी रुपये परत करण्याचे सेबीचे आदेश धुडकावल्याने राज्याचे सहकारमंत्री सुभास देशमुख यांना ‘सेबी’ अर्थात सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने जोरदार दणका दिला आहे. मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’चे म्युच्युअल फंड आणि डी-मॅट खात्यांना सेबीकडून सील ठोकण्यात आले आहे. तसंच ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मंत्री सुभाष देशमुख यांना नोटीस सुद्धा धाडण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेलार मामा, हे बघा! भागवतांना सुद्धा चौकीदारची मूलाखत समजली नाही: गजानन काळे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आणि ते भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचे दिसले. त्या व्यंगचित्रात स्वतः मोदी हेच मोदी यांना प्रश्न विचारत असल्याची मार्मिक टिप्पणी केली होती. त्यावर चवताळलेले भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी लगेच ट्विट करत, ‘राज ठाकेर यांना ही मुलाखत समजणं अवघड असून त्यांनी चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम बघावा’, असा खोचक टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
आता पहिली जमीन कोण विकणार? जमीन इका, पन पक्षाचं ऑफिस काढा: जानकर
रासप पक्षाची औकात शून्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो चौकाचौकात पक्षाची औकात निर्माण करा. आणि तशीच वेळ पडल्यास स्वतःची जमीन विका, पण पक्षाचं ऑफिस काढाच, असा धक्कादायक आणि अजब सल्ला राज्याचे पशु संवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी रासपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिला आहे. ते सांगलीत एका पक्ष कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकणात सेनेला गळती, असंख्य शिवसैनिकांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश
लोकसभा निवडणुकीआधी कोकणात शिवसेनेला सोडचिट्ठी देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सत्तेत विराजमान असलेल्या शिवसेनेबद्दल कोकणात विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाला आहे. त्याचा फटका शिवसेनेला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसायची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचा अपवाद वगळता, एकाही मराठी नेत्याला मराठी सिनेमाबाबत कळकळ नाही: मांजरेकर
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण? हा प्रश्न विचारला तर अर्थात समोर नाव येते ते पुलंचेच. होय! पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या नावाची काय जादू आहे हे महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक आज सुद्धा जाणतो. लवकरच म्हणजे अगदी शुक्रवारी त्यांच्या आयुष्यावर ‘भाई’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. परंतु, दुर्दैव हे की अशा महान व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित सिनेमासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्वाच्या थिएटर्समध्ये स्क्रीन आणि प्राइमटाइमच उपलब्ध नाही.
6 वर्षांपूर्वी -
‘बोला काय विचारू?’, ‘मोदीमय’ मुलाखतीची राज ठाकरेंकडून खिल्ली
पंतप्रधानांच्या त्या मुलाखतीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. मोदींची ती मुलाखत म्हणजे स्वतःच स्वतःला प्रश्न विचारल्यासारखं होतं, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधानांना लगावला आहे. व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी हे स्वतःच स्वत:ची मुलाखत घेत असून यावेळी “बोला काय विचारु ?” असं प्रश्न ते स्वतःलाच दुसऱ्या बाजूने करत आहेत असं दाखवलं आहे. त्या मुलाखतीचा एक ‘मनमोकळी’ मुलाखत ! असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला असून, ती ठरवून केलेली मुलाखत होती असं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची मुलाखत म्हणजे चहाच्या पेल्यातले वादळ : उद्धव ठाकरे
पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले आणि मोदी हे केवळ बचावात्मक पवित्र्यात दिसले तसेच २०१९ ची चिंता त्यांच्या हावभावात स्पष्ट दिसत होती, अशा बोचरी टीका सामनामधून मोदींच्या मुलाखतीवर करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी