महत्वाच्या बातम्या
-
बुडत्या जहाजाची जाणीव? खासदार कपिल पाटील भाजपला रामराम करत काँग्रेसवासी होणार?
ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. ठाणे भिवंडी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील हे सध्या ठाणे जिल्ह्यात भाजपचे एकमेव खासदार आहेत. त्यात स्वतः कपिल पाटील यांनीच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस प्रवेशबाबत तब्बल ३ वेळा भेट घेऊन चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देणार: मुख्यमंत्री
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रसार माध्यमांनी या टीकेला अनुसरून प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरेंच्या त्या टीकेला आम्ही योग्य वेळ आल्यावर योग्य पद्धतीने प्रतिउत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजमार्ग: गांडूळवाड एक दुर्गम आदिवासी गाव आणि अमित ठाकरेंचा दौरा : सविस्तर
राज्यातील अनुभवी आणि वरिष्ठ नेत्यांचा म्हणजे शरद पवार असो किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी मैलोंमैल पायपीट करून आधी महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा समजून घेतला होता. राज्यात राजकारणात जर भविष्य घडवायचं असेल तर आधी ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांना भेटी देऊन तो समजून घ्यावा लागतो. राज ठाकरे यांनी सुद्धा तो मार्ग स्वीकारला होता आणि अनेक वर्षांपासून अशा दुर्गम भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथल्या मूळ अडचणी समजून घेत आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग झेडपी: विषय समिती सभापती निवडणुकीत नितेश राणेंचा काँग्रेस, सेना-भाजपला दणका
काँग्रेसने जारी केलेला व्हीप तसेच सेना आणि भाजप युतीची योजना आमदार नितेश राणे यांनी चाणाक्षपणे हाताळून या तिन्ही पक्षांना धक्का दिला आहे. नितेश राणे यांच्या राजकीय कौशल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एकहाती वर्चस्व मिळवले आहे.
6 वर्षांपूर्वी -
अन्यथा पेटलेला हिंदू सोडणार नाही : उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे जाहीर सभा घेतली. पंढरपूरच्या या मैदानात सभा घेण्याचं धाडस आज शिवसेनेनं दाखवल आहे, असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूकपूर्व देवदर्शन? आज उद्धव ठाकरे पंढरपूर दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर असून ते निवडणूकपूर्व देवदर्शनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी आम्ही टाकू इच्छितो असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा सत्ताकाळात विकास कामं दाखविण्यापेक्षा ते देवाच्या नावाने दौरे करून निवडणूकपूर्व तयारी करत आहेत अशी राजकीय चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी -
एकवेळ हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होत नाहीत: गडकरींचं विधान
सध्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार अशी चर्चा रंगली असताना गडकरी मात्र रोज नवनवीन विधानं करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू मांडली आणि अडचणी मांडल्या होत्या. परंतु प्रसार माध्यमांनी टीका करताच पुन्हा घुमजाव केले होते. त्यात आता पुन्हा त्यांनी सांगली येथील कार्यक्रमात धक्कादायक वक्तव्य केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंना खुलं पत्र; ३ दशकं सत्ता, तरी औरंगाबादचे नाव 'कचराबाद' असे झाले आहे?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्यावतीने अनेक विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये हजर झाले आहेत. त्यामुळे एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत एका खुल्या पत्राद्वारे सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
हे काय सुरु आहे? मुंबई-ठाण्यात स्थानिक मराठी माणूस बेघर केला जातो आहे?
हे काय सुरु आहे? मुंबई-ठाण्यात स्थानिक मराठी माणूस बेघर केला जातो आहे. तर युपी-बिहारींना शिवसेनेकडून थेट बिल्डिंग’मध्ये फुकट घरांच्या चाव्या. उघड्या डोळ्याने मराठी माणूस हे केवळ पाहू शकतो, पण काही करू शकतो का?
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी लोकांच्या घरात डोकावल्यावर त्यांना कळेल की लोकं त्यांना शिव्या घालतात
मोदी सरकारची आता तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके हालचालींवर बारीक नजर असणार आहे. कारण, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील तब्बल १० मोठ्या एजन्सींना तुमच्या खासगी कम्प्युटरवर थेट नजर ठेवण्यासाठी परवानगी बहाल करण्यात आली आहे. या सर्व संबंधित १० एजन्सी एकप्रकारे तुमच्यासाठी गुप्तहेराचेच काम करणार असून त्या केव्हाही तुमच्या खासगी कम्प्युटरमधील माहिती तपासू शकतात.
6 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपच्या सभांची गर्दी आटनं हे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाल्याचं लक्षण
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह ५ राज्यांमध्ये झालेला भारतीय जनता पशाचा पराभव हा सामान्य जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राग आहे असं मत महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. कारण लोकांचा तो रागच मतांमधून व्यक्त झाला आणि भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असं राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
माहुल प्रकल्पबाधित; फडणवीसांनी समिती स्थापल्याने माहुलकर नाराज
मागील जवळपास ५५ दिवस आंदोलन करणाऱ्या माहुलकरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या. परंतु, या भेटीत प्रकल्पबाधितांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे आदेश फडणवीसांनी प्रशासनाला दिले आहेत. परंतु, त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या मनात वेगळीच शंका निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक आंदोलकांना वाटतं आहे की, केवळ आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वेळ मारून नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच काही दिवसांनी हि समिती अहवाल तयार करेल तोपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागेल आणि अखेर हा विषय असाच रेंगाळत राहील असं त्यांचं मत आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकरी कर्जमाफीसाठी भाजप-सेना सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही: SBI आर्थिक संशोधन विभाग
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सरकारला ग्रामीण भागातून मोठा फटका बसल्याचं समोर आलं. त्यामध्ये शेतकऱ्यांची नाराजी विशेष भोवळल्याचे सत्य समोर आल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर न झाल्यास महाराष्ट्रातील विद्यमान भाजप-शिवसेना सरकारला फटका बसेल अशी, शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांआधी कर्जमाफीद्वारे शेतकऱ्यांची मते मिळविण्याचा विचार विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विचाराधीन असला तरी, त्यासाठी महाराष्ट्रातील भाजप – शिवसेना सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षमच नाही असं समोर येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसोबत युती केली तरी लोकसभा निवडणुकीत अपयश: भाजपचा अंतर्गत सर्वे
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली तरी महाराष्ट्रात २०१४ प्रमाणे यश प्राप्त होणार नाही, असा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती झाली तरी युतीला ३० ते ३४ जागांवर समाधान मानावे लागेल, असे या सर्वेक्षणात पुढे आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेनचा वसई-विरार शहराला उपयोग नाही, बविआ'चा तीव्र विरोध
वसई-विरार शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला नव्याने निर्माण झालेल्या महापालिकेने तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर विषयाला अनुसरून बुलेट ट्रेनसाठी महापालिकेकडे संरेखन करण्याचा प्रस्ताव आणि विकास हस्तांतर देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असता पालिकेने तो फेटाळून लावला आहे. त्यांच्यानुसार बुलेट ट्रेनचा वसई-विरार शहराला काहीसुद्धा उपयोग नाही, त्यामुळे केवळ स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होणार आहे अशी भूमिका सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडचे सत्य सांगून शिवसेनेचे करून दाखवलेचे पितळ उघडे पडले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडचे सत्य सांगून शिवसेनेचे करून दाखवलेचे पितळ उघडे पडले
6 वर्षांपूर्वी -
मनसे कार्यकर्त्यामुळे ७ वर्षांनी बीडचा गणेश डाके कुटुंबियांना सापडला
पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि कट्टर राज ठाकरे समर्थक तुलसी जोशी यांच्या पुढाकाराने गणेश पुष्कर डाके हा तरुण तब्बल ७ वर्षांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटला आहे. गणेश डाके मूळचा बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातील डाळी पिंपरीचा रहिवासी असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून पिककर्ज वसुलीला स्थगिती
राज्यातील ग्रामीण भागात मोठा दुष्काळ असल्याने बळीराजा हैराण झाला आहे. त्यात गुरांना चारा सुद्धा मिळत नसल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांनी सुद्धा या मुद्यावरून राज्य सरकारला फैलावर घेतलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे पेठ तालुक्यात कार्यकर्त्यांना भेटण्यास गेले, पण सभाच भरली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी नाशिक ग्रामीणकडे मोर्चा वळवल्याचे निदर्शनास येते आहे. त्यानिमित्त दिंडोरीत त्यांनी अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या आहेत. आज ते पेठ तालुक्यात कार्यकर्त्यांना भेटण्यास गेले होते, परंतु कार्यकर्त्यांसोबत स्थानिक शेतकऱ्यांनी सुद्धा तोबा गर्दी केल्याने भेटीचं रूपांतर थेट सभेत झालं.
6 वर्षांपूर्वी -
नाशिक: शेतकरी काका भावुक झाले, म्हणाले राजसाहेब तुम्हीच या महाराष्ट्राला दिशा देऊ शकता
नाशिक: शेतकरी काका भावुक झाले, म्हणाले राजसाहेब तुम्हीच या महाराष्ट्राला दिशा देऊ शकता
6 वर्षांपूर्वी