महत्वाच्या बातम्या
-
मोदी लाटेतील शिवसेना खासदार विनायक राऊतांना २०१९ ची लोकसभा अवघड?
एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दरम्यान कणकवली येथे दीर्घकाळ चर्चा झाली. दरम्यान, सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये ‘तुझ्यागळा माझ्यागळा’ सुरु झाल्याने नारायण राणे यांना युती होणार असल्याची खात्री आहे. तसे झाल्यास रत्नागिरी मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश यांनी हे या मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने लोकसभा लढवणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्यांना राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा द्यावा आणि त्या मोबदल्यात निलेश राणे केंद्रात राष्ट्रवादीला सर्मथन करून त्यांच्या समर्थक खासदारांच्या संख्येमध्ये भर टाकतील असा समझोता झाल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण कायद्यात टिकणे अवघड, स्वतंत्र आरक्षण केवळ शब्दखेळ : माजी न्या. पी. बी. सावंत
समस्त मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर ठाम पणे टिकण्यासाठी ते ओबीसीमध्येच नवा प्रवर्ग करून देणे गरजेचे होते. तसेच त्यासाठी ओबीसींच्या एकूण राखीव कोटय़ामध्येच वाढ करून, त्यासाठी भारताच्या संसदेत अधिकृतपणे कायदा करणे गरजेचे होते, असे प्रामाणिक मत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण : महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
महाराष्ट्रात समस्त मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याच्या निर्णयाची घोषणा झाली आहे. त्यानंतर अधिकृतपणे त्याचे विधेयक आणि अधिसूचना सुद्धा राज्य सरकारकडून काढली गेली आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा केला असताना देखील त्याविरुद्ध काही लोकं व संस्था करतात आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करू लागले आहेत. त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागं झालं असून महाराष्ट्र सरकारकडून आज सुप्रीम कोर्टात रीतसर कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या 'पंचायतीतील' कट्टर मराठी बाण्यामुळे शिवसेनेची मराठी मंतांची पंचायत?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. भाषणातील मराठीचा हिंदीत अनुवाद करताना चुकीची माहिती हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे त्यांनी हा संवाद देशभर समजावा म्हणून हिंदीत भाषण केले.
7 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीय पंचायत: राज ठाकरे दिसत होते त्यापेक्षाही खूप कट्टर मराठी असल्याचे सिद्ध झाले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. भाषणातील मराठीचा हिंदीत अनुवाद करताना चुकीची माहिती हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे त्यांनी हा संवाद देशभर समजावा म्हणून हिंदीत भाषण केले.
7 वर्षांपूर्वी -
मंदिर बांधण्यापेक्षा गरीबाच्या तोंडात दोन घास गेले तर मला आवडेल : नाना पाटेकर
राज्याचा ग्रामीण भाग सध्या प्रचंड दुष्काळाने ग्रासला आहे आणि मराठवाड्यात तर परिस्थिती फारच कठीण आहे. त्यामुळे मराठवाड्यात जर एक मूठ धान्य व एक पेंडी चारा सर्वांनी दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि होरपळणाऱ्या माणसांना मोठा हातभार लागेल. केवळ नाइलाजास्तव ग्रामीण भागातील लोकं आज मोठ्याप्रमाणावर शहरात येत आहेत, ती काही भिकारी नाहीत. त्यामुळे त्यांना भिक्षुकांसारखी वागणूक अजिबात देऊ नका, असे जाहीर आवाहन नाना पाटेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले.
7 वर्षांपूर्वी -
घोषणाबाज युती सरकारला शिर्डी संस्थानकडून बिनव्याजी कर्ज घेण्याची वेळ
नुकत्याच आलेल्या या बातमीने सरकार किती आर्थिक संकटात आहे याची चुणूक लागली आहे. कारण आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने शिर्डीतील साई संस्थानकडून तब्बल ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतलं आहे. दरम्यान, हा निधी राज्य सरकार तर्फे अपूर्ण असलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
फेक इन इंडिया? सवलत सोडून उलट उद्योगांची वीज १५-२० टक्क्यांनी महागली
केंद्र आणि राज्य सरकारने मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया यांसारख्या योजनांचा कितीही गाजावाजा केला तरी वास्तव मात्र वेगळंच समोर येत आहे . सरकारच्या नव्या नियमानुसार राज्यातील उद्योगांवर वीज कोसळली आहे. कारण विजेचे दर तीन ते सात टक्क्यांनी वाढविल्याचे राज्य महावितरणकडून भासविले जात असले तरी सादर विषयाला अनुसरून बदल करताना औद्योगिक वीज ग्राहकांना मिळणारा ‘पॉवर फॅक्टर इन्सेन्टिव्ह’ सरकारने हुशारीने हिसकावून घेतला असून, उलटपक्षी ‘पॉवर फॅक्टर पेनल्टी’ लादल्याने उद्योगांची वीज तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांनी महागली आहे असं सत्य समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
कांद्याला एक-दीड रुपया भाव, शेतकऱ्याने तो विकून सगळे पैसे मोदींना 'मनीऑर्डर' केले
या सिजनमध्ये कांद्याला अवघा एक-दीड रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय काल नाशिक मध्ये आला आहे. २०१४ मध्ये “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींची या शेतकऱ्याने चांगलीच कोंडी केली आहे. एकूण सात क्विंटल ५० किलो कांदा विकून मिळालेले १,०६४ रुपये संजय साठे या शेतकऱ्याने थेट मोदींना मनिऑर्डर करून पाठवले आणि ‘ठेवा तुम्हालाच’ असा थेट संदेश पंतप्रधांना दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठवाडा: दुष्काळाचा पहिला बळी; गळणारे पाणी भरताना महिलेचा टँकरखाली मृत्यू
राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे आणि संपूर्ण ग्रामीण भाग त्यात संकटात सापडला आहे. त्यात मराठवाड्यात परिस्थिती अतिशय भीषण असून अनेक गावांमध्ये तब्बल १५ ते २० दिवसांनी पाण्याचा टँकर येत असल्याने अनेक दुर्घटना घडण्यास सुरुवात झाली आहे. गावात पाण्याचा टँकर आला की, पाणी स्थानिकांची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते आणि त्यातून भांडणण आणि मारामाऱ्या होण्याइतपत परिस्थिती भयाण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: अखेर राणे समितीच्या 'त्या' अभ्यासापूर्ण निष्कर्षामुळेच आरक्षण : सविस्तर
मराठा समाजातील आंदोलकांचे लाखोंचे मोर्चे, १४,६०० मराठा तरुणांवर अनेक खटले आणि दुःखाची बाब म्हणजे त्यासाठी ४२ तरुणांच्या प्राणाचे बलिदान असा दीर्घ मन हेलावणारा प्रवास केल्यानंतर अखेर शुक्रवारी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. आज भाजप आणि शिवसेना स्वतःची पाठ थोपटून किती ही मार्केटिंग करत असले तरी साडेचार वर्षापूर्वी आघाडी सरकारच्या राजवटीत नारायण राणे समितीने सखोल अभ्यासाद्वारे हे निष्कर्ष मांडले होते, ज्याद्वारे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते, वास्तविक त्याच धर्तीवर मागासवर्ग आयोगाने १६ टक्केच आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने केवळ कॉपीपेस्ट एकदाच काय तो ४ वर्ष रखडवलेला अहवाल निवडणुकीच्या तोंडावर शब्दांचा खेळ करत स्वीकारला.
7 वर्षांपूर्वी -
गृहमंत्री पद (राज्य) शिवसेनेकडे असून उद्धव ठाकरेंची गृहखात्यावर टीका
केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील असलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपवर गृहखात्याच्या निष्क्रियतेवरून सामना मुखपत्रातून निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे कोकणातील आमदार दीपक केसरकर यांच्याकडे गृह राज्यमंत्री पद आहे याचा सुद्धा त्यांना विसर पडल्याचे दिसत आहे. गृहखात्याच्या कारभारावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की,’राज्यात २०१४ पासून पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे’, असे म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार'वर यूएईच्या राजदूतांचं वक्तव्य; भाजप-शिवसेना सरकारकडून दगा फटक्याची शक्यता?
निसर्गरम्य कोकणातील रत्नागिरीयेथील बहुचर्चित नाणारच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाला कालच महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना प्रणित युती सरकारने स्थगिती दिली आहे. तशी अधिकृत घोषणा फडणवीसांनी बुधवारी विधिमंडळात केली होती. परंतु, धक्कादायक म्हणजे या घोषणेला अवघे २४ तास सुद्धा उलटत नाहीत तोपर्यंत, सदर प्रकल्पासाठी पुढच्या काही आठवड्यातच आम्हाला (अॅडनॉक कंपनी) महाराष्ट्र सरकारकडून जमीन मिळणार दिली जाणार आहे, असे यूएई अर्थात दुबईच्या राजदूतांनी राजधानी नवी दिल्लीत गुरुवारी स्पष्ट केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
विधानसभा उपाध्यक्ष: डिसेंबरमध्ये सत्ता सोडणार होते, पण नोव्हेंबरमध्ये अजून एका पदावर दावा
दसरा-दिवाळी असे महत्वाचे सण संपताच म्हणजे डिसेंबरमध्ये शिवसेना सत्ता सोडणार असे खासदार विनायक राऊत काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. तसेच आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार आणि भाजप सोबत युती नाही म्हणजे नाही, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेने डिसेंबर सुरु होण्याच्या एक दिवस आधी विधानसभेच्या उपाध्यक्ष जागेसाठी अर्ज दाखल केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण विधेयक; आज एटीआर विधिमंडळात
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक तसेच मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील महाराष्ट्र सरकारचा कृती अहवाल, आज विधिमंडळात मांडण्यात येणार असा;असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ युपी २०१६; रामलीला'मध्ये नवाजुद्दीन मुस्लिम असल्याने शिवसेनेने विरोध केलेला, आज?
सध्या शिवसेनेने अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी निवडणुकीच्या तोंडावर राजकारण सुरु केलं असलं तरी त्यांचा खरा मुखवटा अनेक विषयांवरून समोर येताना दिसत आहे. शिवसेना नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करते असे सांगत असताना, दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करते असे भाषणात नेहमीच कानावर पडते. शिवसेना केवळ पाकिस्तान आणि बांगलादेश धार्जिण्या मुस्लिमांच्या विरोधात आहे, असं ठासून सांगत असते. परंतु, उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर यथे २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रामलीला’मध्ये मारीच’ची भूमिका करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीला शिवसेनेने केवळ तो मुस्लिम असल्याने रामलीला’मध्ये भूमिका करण्यास तीव्र विरोध केला होता.
7 वर्षांपूर्वी -
स्वतः दिलेल्या आश्वासनांचं काय ते न सांगता, उद्धव ठाकरेंची पुन्हा भाजपच्या आश्वासनांवर आगपाखड
राज्यात मागील ४ वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची सत्ता असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रमुख घटक असलेली शिवसेना मागील साडेचार वर्षांपासून केंद्रात सुद्धा भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत आहे. वास्तविक सामान्य लोकांना भाजप आणि शिवसेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष उत्तर देण्यास बांधील असताना शिवसेना सामान्यांना केवळ भाजपच्या आश्वासनांची आठवण करून देण्यात व्यस्त आहे असे दिसते.
7 वर्षांपूर्वी -
सिंचन घोटाळा; माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास : अजित पवार
महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकण विभागातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारास संबंधित खात्याचे मंत्री म्हणून तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार हेच पूर्णपणे जबाबदार आहेत, असे प्रतिज्ञापत्र अँटी करप्शन विभागाने हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी रीतसर दाखल करण्यात आले आहे. त्यावर प्रसार माध्यमांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न केला असता माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: युती सरकारविरोधात महाराष्ट्र सैनिक व शेतकऱ्यांचा महासागर लोटला, महिलांचा मोठा सहभाग
राज्यातील ग्रामीण भागात बळीराजा दुष्काळाच्या झळा सोसत असताना भाजप आणि शिवसेना धार्मिक व जातीय मुद्दयांमध्ये मश्गुल झाली आहे. दरम्यान, दुष्काळासारख्या गंभीर मुद्यांवर झोपलेल्या भाजप – शिवसेना सरकारला जागं करण्यासाठी मनसेचा महाराष्ट्र सैनिक आणि मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसेच्या दंडुका मार्चला अफाट जनसागर लोटला
मनसेच्या दंडुका मार्चला अफाट जनसागर लोटला
7 वर्षांपूर्वी