महत्वाच्या बातम्या
-
शिवराय लक्षात ठेवतील, कधी न येणा-या कावळ्यांना : नितेश राणे
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामनामाचा जप करण्यास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केल्याने त्यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला जाण्यापूर्वी माती कलश घेऊन जाण्यासाठी शिवनेरीवर दाखल झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकारविरोधात शेतकरी-आदिवासींचा एल्गार
राज्यातील दुष्काळ तसेच आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरातील बळीराजा आणि आदिवासींनी भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. भव्य लोकसंघर्ष मोर्चा मुंबईतील सोमय्या मैदानातून आता आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाला आहे. प्रलंबित वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि संपूर्ण कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा आणि आदिवासींनी हा भव्य मोर्चा काढला आहे.
7 वर्षांपूर्वी -
न्यायासाठी बळीराजाचा भाजप-शिवसेना सरकारविरोधात एल्गार; विधानसभेवर मोर्चा
आज सकाळी दहाच्या सुमारास ठाण्यातील आनंदनगरमधल्या चेकनाका इथून शेतकऱ्यांच्या भव्य मोर्च्याला सुरुवात झाली आहे. राज्यातील बळीराजा तसेच आदिवासी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी ठाणे शहर ते आझाद मैदान असे तब्बल ४५ किलोमीटरचे अंतर पार करून मुंबई विधानसभेवर धडक देणार आहेत. राज्यभरातील हजारो शेतकरी तीव्र दुष्काळ असताना दुष्काळाचे चटके सोसत एकत्र येत आहेत. आज सकाळपासूनच ह्या मोर्चाची सुरुवात “आनंद दिघे प्रवेशद्वार “येथील जुना चेकपोस्ट नाका येथून करण्यात आली. दरम्यान, यावेळी लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या मोर्चाचे प्रतिनिधित्व केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
दिग्गज नेते नारायण राणे व शरद पवार कोकणात राजकीय भूकंप करणार?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्यात राष्ट्रवादीची विशेष ताकद नसताना सुद्धा या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने आग्रह धरल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
कमिशन घेऊन सेटलमेंट केल्याने सेनेचा ‘समृद्धी’विरोध मावळला का? अशोक चव्हाण
सुरुवातीला समृद्धी मार्गाला तीव्र विरोध करणारी शिवसेना अचानक अशी काय नरमली अशी शंका व्यक्त करताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, “कमिशनचा हिस्सा मिळाल्यामुळेच शिवसेनेचा समृद्धी महामार्गाला असणारा विरोध मावळला काय’, असा सवाल उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
ठाण्याच्या कचऱ्यावरच सत्ताधारी शिवसेना पोसली जात आहे: आनंद परांजपे
एनसीपीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ठाणे शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनात प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून ठाण्याच्या कचऱ्यावरच सत्ताधारी शिवसेना पोसली जात असल्याचा गंभीर आरोप ठाणे महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि एनसीपीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात सुनावणी
मराठा आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सुद्धा याविषयाला अनुसरून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आपले म्हणणे न्यायालयात सविस्तर मांडावे, असे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणात नामांतराच्या टोप्या? भाजप-सेना केवळ 'S' व 'E' इकडे-तिकडे करून काय साधतंय? सविस्तर
मराठा आरक्षण सुद्धा केवळ नामांतर करून दाखवलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली असली अनेक गोष्टी आता उघड होऊ लागल्या आहेत. कारण मराठा समाजाला सामाजिक, एज्युकेशनल मागास प्रवर्ग अर्थात ‘SEBC’ म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारच्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु, एसइबीसी म्हणजे केवळ ‘याची टोपी कडून त्याच्या डोक्यावर घाल’ असं म्हणण्याची वेळ येऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
पुलगाव: शस्त्र भांडाराजवळ स्फोट; ६ ठार
येथील पुलगावमध्ये असणाऱ्या भारतीय लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ जुनी स्फोटकं निकामी करत असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात तब्बल ६ जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या भीषण स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये काही स्थानिक नागरिकांचा सुद्धा समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच जखमींचा आकडा अजून वाढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण स्फोटामुळे आसपासच्या परिसरात जोरदार हादरे बसल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान बंद दाराआड चर्चा
सरकारमध्ये सामील होऊन भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना संधी मिळताच भाजपच्या सोबत पडद्याआड चर्चासत्र भरवते हे नित्याचे पाहायला मिळते. परंतु, शिवसेनेची सध्याची अवस्था पाहता ‘तुझं माझं जमेना, आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी स्थिती झाली आहे. कारण स्वबळाचा नारा देणारे उद्धव ठाकरे नक्की काय करत आहेत हे शिवसैनिक सुद्धा सांगू शकत नाहीत. कारण उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
जनसागर: मनसेच्या महामोर्चानें विरोधकांना धडकी
जनसागर: मनसेच्या महामोर्चानें विरोधकांना धडकी
7 वर्षांपूर्वी -
युनिसेफकडून सुप्रिया सुळेंचा पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव
राष्ट्रवादीच्या खासदार तसेच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा युनिसेफ या जागतिक संघटनेने ‘पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेन’ने गौरव केला आहे. अनेक अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात भरपूर मदतकार्य सुप्रिया सुळे यांनी केल्याने त्यांच्या कामाची दखल युनिसेफने घेतली आहे. त्याच्या या कार्याची दखल खुद्द संयुक्त राष्ट्र संघाने घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी
मराठा आरक्षणावर येत्या बुधवारी म्हणजे २१ तारखेला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सुद्धा याविषयाला अनुसरून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आपले म्हणणे न्यायालयात सविस्तर मांडावे, असे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
ठाणे: आज भाजप-शिवसेना सरकार विरोधात मनसेचा महामोर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नैतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना सरकारविरोधात विविध विषयांच्या संदर्भात महामोर्चा काढला जाणार आहे. आज दुपारी एकच्या सुमारास तीन हात नाका ते जिल्ह्याधिकारी कार्यालय असा हा भव्य मोर्चा काढला जाणार असे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
आरक्षण ते दुष्काळ; सर्व काही परमेश्वरा भरोसे मग सरकार नक्की काय करत? सविस्तर
सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे आणि त्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्याने सरकार तसेच विरोधक सर्व महत्वाच्या मुद्यांवर समोरासमोर उभे ठाकणार हे नक्की आहे. राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातून (SEBC) स्वतंत्र आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केली.
7 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई: शिवसैनिकांचा शिवबंधन तोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश
शिवसेना जरी आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत असली तरी पक्ष नक्की सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे कार्यकर्त्यांना सुद्धा कळेनासे झाल्याने संभ्रमात असलेले अनेक शिवसैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहेत. त्याचाच प्रत्यय नवी मुंबईतील घणसोलीत आला आहे. शिवसेनेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
दुष्काळग्रस्त, तहानलेला महाराष्ट्र आणि अ'संवेदनशील' सरकार: व्यंगचित्र प्रसिद्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळाने निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर वास्तव मांडताना आजारी साखर कारखाने आणि त्यांना राज्य सरकारकडून देऊ केलेली आर्थिक मदत यावर भाष्य केले आहे. यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात नोव्हेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाई सुरु झाली आहे. असं असताना सुद्धा फडणवीस सरकार तहानलेल्या ग्रामीण महाराष्ट्राला मदतीचा हात पुढे करण्याऐवजी भ्रष्टाचाराने आजारी पडलेल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देत असून, साखर सम्राट आणि फडणवीस सरकारचं साटंलोटं असल्याचं व्यंगचित्रात दाखवले आहे.
7 वर्षांपूर्वी -
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र!' विरोधकांची पोस्टरबाजी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात विरोधकांनी पोस्टरबाजी सुरु केली आहे. विरोधकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी विरोधकांनी हटके पोस्टरबाजी केली आहे. “ठग्स ऑफ हिंदुस्थानच्या” धर्तीवर विरोधी पक्षांनी “ठग ऑफ महाराष्ट्र” असे नाव देऊन हे पोस्टर लावले आहे. त्यात अभिनेता आमीर खानच्या जागी फडणवीसांचा आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरेंच छायाचित्र लावण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पहिली केंद्रात-राज्यात सत्ता उपभोगून घेतली, निवडणुका येताच "पहिले मंदिर फिर सरकार"चा नारा?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानिमित्त पक्षाने सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे नेत्यांची सेनाभवन येथे तयारीचा आढावा आला, ज्याला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. दरम्यान, यावेळी पक्षाचे राज्यातील सर्व जिल्ह्याप्रमुख,संपर्कप्रमुख आणि विभागप्रमुख सुद्धा उपस्थित होते.
7 वर्षांपूर्वी -
कल्याण: ब्रिटीशकालीन व धोकादायक रेल्वे पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात
ब्रिटीशकालीन आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू लागलेला रेल्वे पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या पाडकामाची संपूर्ण तयारी झाली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या तोडकामासाठी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा तब्बल ६ तासांचा जम्बो ब्लॉक रेल्वे प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. दरम्यान. रेल्वे प्रशासनाने तब्बल ६ तसंच जम्बो ब्लॉक जाहीर केल्याने त्याचा संपूर्ण ताण रस्ते वाहतुकीवर पडण्याची शक्यता आहे. त्यानिमित्त आज सकाळपासूनच वाहतूक आणि शहर पोलीस, केडीएमटी आणि राज्य परिवहन या यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी