महत्वाच्या बातम्या
-
‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइमटाइम द्या.....अन्यथा!, मनसे मैदानात
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या दिमाखात प्रदर्शित झालेल्या “आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर”या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात सलग सुट्ट्यांमुळे ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपटट पाहण्यासाठी कल्याणमधील सिनेमॅक्स येथे गेलेल्या प्रेक्षकांचा पूर्ण हिरमोड झाला आहे. दरम्यान, उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या या चित्रपटाला कल्याणमधील सिनेमॅक्समध्ये दिवसभरात केवळ एकच शो देण्यात आला आहे. आणि तो सुद्धा भर दुपारी ३ वाजताचा. परंतु, प्रेक्षकांचा पूर्ण भ्रमनिरास करणारा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे सिनेमॅक्समध्ये शो जास्त ठेवण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळामुळे निधन
पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवरील एक ‘बंडखोर’अभिनेत्री’ म्हणून त्या सर्वश्रुत होत्या. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात जन्म झाला होता.
7 वर्षांपूर्वी -
अखेर आज मराठा समाजाच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना
पाडव्याच्या मुहूर्तावर आज ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या नव्या मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याचं सुद्धा ते म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
अवनी'च्या हत्येनंतर? नाही! राज ठाकरेंची ती तळमळ जुनी आहे: सविस्तर
अवनी वाघिणीला नरभक्षक ठरवून तिला ठार मारण्यात आल्याने देशभर संतापाची लाट उसळली असताना अनेक स्तरावरून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मनुष्य प्राणी स्वतःच्या सीमारेषा ओलांडून जंगलांपर्यंत वास्तव्य पसरवू लागल्याने मनुष्यावर प्राणी असे हल्ले करतंच राहतील हे सत्य आहे. त्यासाठी यवतमाळचं जंगल कशाला अगदी मुंबईसारख्या शहरातील संजय गांधी नॅशनल पार्कच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले झालेले पाहायला मिळत आहे. परंतु, त्यात प्राण्यांनाच नरभक्षक ठरवून ठार केले जाते. परंतु, तस्करीसाठी मनुष्य प्राणी सुद्धा अधिकाऱ्यांच्या संगनमताने जंगलात शिरून याच वाघांची हत्या करून त्यांची कातडी आणि नखे लाखो-करोडो रुपयांना विकून स्वतःचे खिसे भरतात हे सुद्धा वास्तव आहे. परिणामी देशात वाघांची संख्या झपाटूणे कमी होत असून तो देशातील एक दुर्मिळ प्राणी होईल अशी परिस्थिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकरी जोडपं...एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून तर याद राखा: व्यंगचित्र
राज्यातील बळीराजाची घोर फसवणूक करून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील युती सरकारला दमडीची सुद्धा ओवाळणी देऊ नये असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीतले त्यांचे ५वे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना साडी नेसलेल्या स्वरूपात दाखविले आहे.
7 वर्षांपूर्वी -
त्या जमिनीसाठी अवनीची हत्या? अनिल अंबानींसाठी देश विकायला काढला आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळ येथे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन फडणवीस सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अवनी वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार करण्याचा निर्णय योग्य नव्हता असं म्हटलं आहे. केवळ पुतळे उभारुन देशभरात वाघांचं संवर्धन होऊ शकत नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
यांच्या फेकलेल्या हजारो-लाखो कोटींच्या आकड्यांनी लक्ष्मी सुद्धा थक्क: व्यंगचित्र प्रसिद्ध
भारतीय जनता पक्षाला मनसे अध्यक्षांनी व्यंगचित्रांची मालिका प्रसिद्ध करून हैराण करून सोडले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा चार साडेचार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘फेकलेले’ हजारो, लाखो कोटींचे आकडे आकडे पाहून लक्ष्मी सुद्धा थक्क झाल्याचे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
अभ्यंगस्नान, साहेब! अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला आहे पाठवू का?
आज नरकचतुर्दशी म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ. आज प्रथेनुसार या दिवशी केलं घरोघरी अभ्यंगस्नान केलं जातं. नेमका याच अभ्यंगस्नानाचा संदर्भ घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. सध्या राज्यात महागाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा एक ना अनेक विषयांवरून राज्य सरकारवर सामान्य जनता प्रचंड नाराज आहे आणि त्याचा सुद्धा अप्रत्यक्ष संदर्भ यात आहे.
7 वर्षांपूर्वी -
....मग या सरकारवर पण गोळ्या झाडा: संजय राऊत
शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याने टीकेची झोड उठवली आहे. तसेच मागील ४ वर्षांत कित्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या, तर राज्यातील सरकारवर (राज्यात भाजप-सेनेचं युती सरकार आहे) सुद्धा गोळ्या झाडायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
देशाला राष्ट्रवाद शिकवणाऱ्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना 'राष्ट्रगीत' माहित नाही.
व्हिडिओ पहा: देशाला राष्ट्रवाद शिकवणाऱ्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रगीत’ सुद्धा माहित नाही. सध्या राज्यातील विविध शहरांमध्ये भाजपच्या युवामोर्चातर्फे ‘सीएम चषक’ भरविण्यात आला आहे. त्यादरम्यान घडलेला हा प्रकार आहे.
7 वर्षांपूर्वी -
अवनीला भेकडासारखे मारले, शिवसेनेचं टीकास्त्र
दोन दिवसांपूर्वी अवनी या टी-१ वाघिणीला महाराष्ट्र वन खात्याने विशेष मोहीम राबवून ठार केल्यानंतर संपूर्ण देशात टीकेचा सूर उमटला आहे. अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याने संपूर्ण देशभर पडसाद उमटत आहेत. आता शिवसेनेने सुद्धा अवनीवरून भाजप आणि वनखात्याविरोधात विरोधात आवाज उठवला आहे. ‘ज्या महाराष्ट्रात माणसं सुद्धा नीट जगू शकत नाहीत, त्याच राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? पण अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात उंदरांना सुद्धा वाघाचे बळ येते’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजपवर आणि वन खात्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
देश ‘आयसीयू’त, पण निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा मोदी सरकारच्या मागील चार साडेचार वर्षाच्या कार्यकालावर व्यंगचित्रातून टीका केली आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच्या त्यांनी भारतात काय परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्यामुळे भारत देशच सध्या आयसीयूमध्ये गेला आहे असं म्हटलं आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल’, अशी टीका व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
दिवाळीचं औचित्य साधून मी व्यंगचित्रांची एक मालिका घेऊन येत आहे: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे या दिवाळीत व्यंगचित्रांची एक मालिकाच घेऊन येत आहेत. राज ठाकरे यांनीच स्वतः त्याबाबतची अधिकृत माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुका आल्यावर भाजप - शिवसेनेला राम आठवतो
निवडणुका जवळ आल्या की भाजप आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींना लगेच राम आठवतो, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा युतीबाबत कोणताही निर्णय झाला तरी काँग्रेस आणि एनसीपी’ची आघाडी होणारच आहे, असे सुद्धा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज-पवारांच्या विमान प्रवासावर टीका, आज उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील एकाच गाडीने प्रवास
शिवसेना दिल्ली ते गल्ली भाजपसोबत सत्तेत बसून राज्यात तब्बल १२ मंत्रिपद उपभोगत आहे आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद आहे. परंतु, स्वबळाचा नारा देताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांवर टीका आणि आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी चक्क महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर सुद्धा गाडीत होते.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात दंगली उसळतील: आमदार बच्चू कडू
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकार जर असंच असंवेदनशील राहिल्यास दंगली उसळतील असा सज्जड इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या मुक्काम मोर्चादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आमदार बच्चू यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू, अशी धमकी सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नरभक्षक टी-१ वाघीण ‘अव्नी’ अखेर ठार
कोणताही ठोस पुरावा नसताना थेट ‘नरभक्षक’ ठरवून टी-१ ‘अव्नी’ वाघिणीला शोधपथकाने अखेर ठार मारले आहे. या टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी मागील ४७ दिवसांपासून वनविभागाची शोध मोहीम सुरू होती. काल रात्री वाघिणीचा शोध घेणाऱ्या पथकावर हल्ला केल्याच्या बहाण्याने तिला गोळी झाडून ठार करण्यात आले असा आरोप प्राणिमित्रांनी केला आहे. बोराटीच्या जंगलातील नाल्यालागत राळेगण परिसरात हे हत्याकांड घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
कंपनी मालकांनी दिवाळीत दगा दिला, अविनाश जाधवांनी कामगारांना केलं खिशातून २५ लाख पगाराचं वाटप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा मोठा दिलदारपणा समोर आला आहे. नवी मुंबईमधील शर्ट कंपनीच्या कामगारांना थकीत पगार दिवाळीपूर्वी मिळवून देणार असं आश्वासन अविनाश जाधव यांनी कामगारांना दिलं होतं. परंतु नेमकं दिवाळीच्या तोंडावर कंपनी मालकाने दगा दिला आणि अजून थोडा वेळ द्या असा रेटा कामगारांकडे आणि मनसेच्या शिष्टमंडळाकडे पुढे केला. परंतु मालकाच्या या वागण्यामुळे शेकडो कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचे पडलेले चेहरे उपस्थितांना जाणवत होते. कारण भर दिवाळीत पगारा अभावी रिकामा खिसा अशी कामगारांची अवस्था अविनाश जाधवांच्या नजरेस पडली आणि कामगारांनी ती कुरबुर कंपनीच्या मालकांसमोर सुद्धा व्यक्त केली.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस आणि एनसीपी'ची लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्थानी आज सकाळी ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु, जवळपास अर्ध्या जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये जवळपास सहमती झाली असली तरी सुद्धा काही महत्वाच्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे असं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
संजय तुर्डेच्या समर्थनार्थ BMC एल विभाग कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा
संजय तुर्डेच्या समर्थनार्थ BMC एल विभाग कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा
7 वर्षांपूर्वी