महत्वाच्या बातम्या
-
मराठवाड्यासाठी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले.
सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आज अखेर मराठवाड्यासाठी विविध धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणातून सकाळी ८.४० च्या सुमारास जायकवाडी धरणासाठी ४२५० क्युसेक्स इतके पाणी सोडण्यात आले आहे. तर मुळा धरणातून ६,००० क्युसेक्सक इतके पाणी सोडण्यात आले असे प्रश्नाने कळवले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या भीतीने भाजपवर पगारी कॉपीकॅट व्यंगचित्रकार दत्तक घेण्याची वेळ? सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विशिष्ठ विषयाला अनुसरून आणि अचूक संदर्भ जोडून सत्ताधाऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवरून हैराण करून सोडलं आहे. विशेष म्हणजे प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमांवर त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने सत्ताधारी भाजपची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यात मोदी आणि अमित शहा व्यंगचित्रात नेहमीच केंद्रस्थानी असल्याने समाज माध्यमांवर चांगलाच धुरळा उडत आहे. परंतु, राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राला व्यंगचित्राच्याच माध्यमातून प्रतिउत्तर देताना भाजपच्या पगारी कॉपीकॅट व्यंगचित्रकारांना विषय आणि संदर्भ याचं प्राथमिक ज्ञान नसल्याचं दिसत असून, त्यात भाजपचीच फजिती होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतमजुराच्या मुलीची सी.ए. होण्याची इच्छा, मनसे करणार तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौऱ्यादरम्यान धामणगाव गढी (ता. अचलपूर, जि. अमरावती) येथील कु.एेश्वर्या तोटे या विद्यार्थीनीची कैफियत ऐकून घेतली होती. एेश्वर्या तोटे ही सध्या बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे, परंतु शेतमजूर असलेल्या आई-वडिलांची मुलगी असलेल्या या मुलीची सी.ए. होण्याची तीव्र इच्छा आहे. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ती तीच सी.ए. होण्याचं पुढचं स्वप्नं पूर्ण करून शकत नाही, हे राज ठाकरेंना तिच्याशी संवाद साधताना ध्यानात आहे.
7 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ संगीतकार व गीतकार यशवंत देव यांचे दीर्घ आजाराने निधन
मराठी संगीत जगतावर अनेक वर्ष आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज इस्पितळात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. आज सायंकाळीच चार वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्मारकावर २,२९० कोटी खर्च करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना! राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या “पुतळा” राजकारणावर व्यंगचित्रातून तोफ डागली आहे. ‘तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना’ असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे. गुजरातमधील नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यासाठी तब्बल २,२९० कोटी रुपये इतका प्रचंड खर्च करण्यात आल्याने ते खुद्द वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, असा रोखठोक सवाल मनसे अध्यक्षांनी विचारला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पवारांची अमित शहांवर टीका, न्यायालयाचे निर्णय सुद्धा तुम्हाला मान्य नाहीत
पुण्यात एनसीपीच्या संविधान बचाव यात्रेची समारोप सभा आज पार पडली. दरम्यान, या कार्यक्रला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा सुद्धा भाषणादरम्यान समाचार घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, उद्धवला सांभाळा! त्याचा अर्थ काल समजला: रोहित पवार
राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याची अजून एक नवी समोर येत आहे. होय! एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार आता सामनातील टीकेला उत्तर देण्यासाठी आणि काकाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार हे राजकारणातील टाकाऊ माल आहेत, अशी हलक्या भाषेतील टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंना रोखठोक प्रतिउत्तर दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष
दुष्काळजन्य परिस्थिती ओढावल्याने नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. नाशिक जिल्ह्यांमधील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून अहमदनगर – नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष सध्या सुरू आहे. अहमदनगर – नाशिकमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे जायकवाडीला पाणी देण्यास स्थानिक प्रतिनिधींचा आणि लोकांचा तीव्र विरोध होत आहे. परंतु, राज्य पाटबंधारे विभागाच्यावतीने धरणात पाणी सोडण्याची तयारी सुरू झाली आहे असे वृत्त आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांची अकरा वाजता बैठक घेण्यात आहे. त्यामुळे या बैठकीनंतर पाणी सोडण्यात येणार का? यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
तब्बल ७९ कोटींचा GST बुडवल्याप्रकरणी मुंबईतून व्यापाऱ्याला अटक
पुणे स्थित व्यापाऱ्याने ७९ कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आलं आहे. सदर कारवाई जीएसटी कायद्यांतर्गत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यातील मोदसिंग पद्मसिंह सोढा नामक व्यापाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. तब्बल ७९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी सोढा यांना मुंबईतून शुक्रवारी २६ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळांना जीवे मारण्याचं धमकी पत्र
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त आहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आम्ही तुमचा सुद्धा दाभोलकर, पानसरे करु असे धमकी पत्र भुजबळांना आल्याची बातमी आहे. भुजबळांच्या नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, एनसीपीच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवणार असल्याची माहिती दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांची चेष्टा; फडणवीस सरकारकडून बॅटरीच्या प्रकाशात शेताचे दाखले व पीकाचा सर्वे
सध्या ग्रामीण महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. त्यात सरकारने सध्या केवळ ‘दुष्काळ सदृश्य’ परिस्थिती असा उल्लेख केल्याने विरोधकांनी रोष व्यक्त केला असताना फडणवीस सरकारचा शेताचे दाखले आणि पीकाचा दिखाऊ सर्वे समोर येत आहे. कारण, सध्या महाराष्ट्र सरकारकडून दुष्काळी ग्रामीण भागाची पाहणी सुरु आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे राज्य मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बीडमध्ये रात्रीच्या वेळेला चक्क बॅटरीच्या प्रकाशात पीक पाहणी केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. पुढे असेच दिखाऊ प्रकार आणि सर्वे अनेक भागात होऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
सीबीआय प्रकरण; राज ठाकरेंचं मोदींच्या 'वर्मा'वर बोट: व्यंगचित्र प्रसिद्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या देशभर खळबळ माजविणाऱ्या सीबीआय मधील घडामोडींवरून मोदींच्या “वर्मावर” नेमकं बोट ठेवलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर या व्यंगचित्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. आज राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवरून प्रसिद्ध करण्यात आलेलं हे व्यंगचित्र मोदी सरकारच्या सुद्धा “वर्मावर” लागण्याची चिन्ह आहेत.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचं स्मारक ५ वर्षे का रेंगाळले या प्रश्नामुळे उद्धव यांना मिरची झोंबली: अजित पवार
सामनातून झालेल्या टीकेतून शिवसेनेकडून तीच भाषा अपेक्षित होती. परंतु उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अजित पवार या गटारी किड्याला आम्ही किंमत देत नाही: शिवसेना
एनसीपीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेने सामना उभा मुखपत्रातून जहरी टीका केली आहे. अजित पवार टीका करताना उद्धव ठाकरे यांना म्हणाले होते की, यांच्या काय तर म्हणे २५ तारखेला अयोध्येला जाणार. काय तिथं दिवा लावणार तिथे! अरे तुला सत्ता असताना तुझ्या बापाचं स्मारक ५ वर्षात करता आलं नाही. आणि तिथं अयोध्येला जाऊन काय करणार आहे?, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. दरम्यान, अजित पवारांची ती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागल्याचे जाणवते आहे.
7 वर्षांपूर्वी -
पवार-राज भेटीची चर्चा, पण त्यांना तर सेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर सुद्धा भेटले होते
प्रसार माध्यमांवर सध्या चर्चा रंगली आहे ती राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील एकाच हॉटेलातील वास्तव्याची आणि एकाच विमानाने मुंबईच्या दिशेने केलेल्या प्रवासाची. परंतु या दोन्ही नेत्यांची भेट शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सुद्धा घेतल्याचे समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भविष्यात सुद्धा ब्राह्मण समाज देशाचे नेतृत्व करत राहील
सध्या आपल्या समाजात असमानता निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. परंतु, देशात ही असमानता निर्माण करणाऱ्या बारामतीकरांच्या हे ध्यानात येत नाही की यापूर्वी सुद्धा ब्राह्मण समाजाने आपल्या देशाचे नेतृत्व केले होते आणि त्याप्रमाणेच भविष्यात सुद्धा करतच राहील, असे सांगत पुण्याच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी कुठं गेले ? अजित पवार
महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाच भयंकर संकट ओढवलं असून त्याला अनुसरून आज एनसीपी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, जर आज राज्यावर दुष्काळ ओढवला असेल तर जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी नेमके गेले कुठं? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवस्मारक बांधकाम सुरु होण्याआधीच चौकशीच्या फेऱ्यात? विनायक मेटेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी फडणवीसांकडे शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची लेखी मागणी केल्याचे वृत्त आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनाच अंधारात ठेवून संबंधित कंत्राटदार आणि शिवस्मारकाच्या सल्लागारांनी स्मारकाच्या मूळ रचनेत हवेतसे बदल केले आहेत, असा गंभीर आरोप मेटेंनी लेखी पत्रातून केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात थेट हक्कभंग आणण्याचा इशारा मेटेंनी दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांनी घेतली शहीद जवान सुनील ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून पक्ष विस्तारासोबत ते अनेक समाजसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर सुद्धा भर देत आहेत. दरम्यान, काल त्यांनी शहीद जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच ढोपे कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या.
7 वर्षांपूर्वी -
आज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली - जाहिरातबाज २०१४
आज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली. वास्तविक सर्वच ग्रामीण महाराष्ट्र भयानक दुष्काळाला सामोरे जाईल अशी परिस्थिती आहे. परंतु याच काँग्रेस – राष्ट्रवादीचे वाभाडे कडून सत्तेत आलेल्या भाजप आणि शिवसेनेने सामान्यांना अशी जाहिरातबाजीने आश्वासन दिली होती.
7 वर्षांपूर्वी