महत्वाच्या बातम्या
-
पुणे - राममंदिर लवकर व्हावे, यासाठी सरसंघचालकांचा पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात संकल्प
पुणे – राममंदिर लवकर व्हावे, यासाठी सरसंघचालकांचा पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात संकल्प
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील तब्बल १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची प्राथमिक घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींची पंतप्रधान पदाची खुर्ची २०१९ मध्ये जाणार
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी २०१९ मधील निवडणुकीचे भाकीत केलं आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जशा प्रकारे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं, तशीच परिस्थिती २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्भवणार आहे असं ते म्हणाले. त्यावेळी निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील सर्व पक्ष मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ एकवटले होते आणि ते देशाचे पंतप्रधान झाले होते. त्याप्रमाणे २००४ मध्ये जशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती, अगदी त्याप्रमाणेच परिस्थिती २०१९ मध्ये सुद्धा येणार आहे असं पवार म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
युतीचा निर्णय लवकर कळवा नाहीतर विधानसभा आणि लोकसभा एकत्र सामोरे जा
शिवसेनेच्या एकाला चलोरेच्या भूमिकेमुळे भाजपने आता सेनेवर युतीबाबत दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. तसेच लवकरात लवकर युतीबाबत कळवलं नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना एकत्रच सामोरे जाण्यास तयार रहा असा अप्रत्यक्ष सज्जड दमच शिवसेना देण्यात आल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वतःच्याच सरकारला जुमलेबाज बोलणारा शिवसेना पक्ष हाच मोठा "जुमला" आहे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डीतील भाषणानंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली आहे. उद्धव ठाकरे गोंधळलेला माणूस असून त्यांना या वर्षीचा “मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अवॉर्ड” देण्यात यावा अशी बोचरी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही, पहिल्यांदा अापल्या वडीलांचं स्मारक बांधावं
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर राम मंदिरावरून बोचरी टीका केली आहे. मुंबईची सत्ता शिवसेनेच्या हातात असताना अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी पहिल्यांदा अापल्या जन्मदात्या वडीलांचं स्मारक बांधावं. त्यानंतर जनतेला त्यांच्याबद्दल खात्री पटेल. लाेकांना राम मंदिराच्या नावाने भावनिक आवाहन करून राजकरण करण्याचा खेळ सुरु आहे असं अजित पवार म्हणाले. शिवसेना पक्ष प्रमुखांमध्ये जर धमक असेल तर त्यांनी अयाेध्येला राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी, असे खुलं अाव्हानच अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! २००९ च्या निवडणुकीत राम मंदिर महत्वाचा मुद्दा नव्हता. महागाई वाढली व विकास फसल्याने पुन्हा राम मंदिर?
सावधान! २००९ च्या निवडणुकीत राम मंदिर महत्वाचा मुद्दा नव्हता. महागाई वाढली व विकास फसल्याने पुन्हा राम मंदिर?
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या स्वागताला वणी मतदारसंघात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
पोलखोल व्हिडिओ; २००९ मध्ये राम मंदिर मुद्दा महत्वाचा नव्हता, पण सत्तेत आल्यावर विकास फसताच राम मंदीर?
सध्या देशात भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत महागाईने शिखर गाठलं असताना शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार आणि शिवजल योजनांचं ग्रामीण भागाला मृगजळ दाखवून पुन्हा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची आलेली वेळ, पेट्रोल-डिझेलचे वाढणारे भाव, डॉलरच्या तुलनेत कोसळणारी रुपयाची किंमत या सर्व विषयांपासून सामान्य लोकांना विचलित करण्यासाठी सगळं ठरवून सुरु आहे अशी परिस्थिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
#MeToo: स्त्रिया अत्याचार होतो तेव्हाच आवाज का उठवत नाहीत? सिंधुताईंचा रोखठोक सवाल
‘मी-टू’ मोहिमेंतर्गत मागील काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यात अनेक कलाकार, राजकारणी आणि पत्रकारांची सुद्धा नाव पुढे आल्याने मोठी खळबळ माजली होती. दरम्यान १०-१५ वर्षांनी बाहेर येणारी ही प्रकरणं बघून अनेकांनी संशय सुद्धा व्यक्त केला होता. परंतु काही दिवसामध्ये या मोहिमेचा अतिरेक होत आहे असे वाटू लागल्याने ही मोहीम जास्त दिवस टिकणार असे एकूणच वातावरण झाले आहे. आता सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे सिंधुताईंनी सुद्धा या विषयावर मत व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
खोटे बोलण्यात ते पटाईत; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिर्डी येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला. माझ्या रक्तातच लाचारी नाही आणि मी सत्तालोलूप सुद्धा नाही, पण तुम्ही तर चक्क खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा औढा देशद्रोहच आहे, अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर प्रहार केले.
7 वर्षांपूर्वी -
राम मंदिर मुद्दा: २ निवडणुकीतील शिवसेनेची दुटप्पी भूमिका लवकरच उघड करणार
सध्या देशात भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत महागाईने शिखर गाठलं असताना शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार आणि शिवजल योजनांचं ग्रामीण भागाला मृगजळ दाखवून पुन्हा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची आलेली वेळ, पेट्रोल-डिझेलचे वाढणारे भाव, डॉलरच्या तुलनेत कोसळणारी रुपयाची किंमत या सर्व विषयांपासून सामान्य लोकांना विचलित करण्यासाठी सगळं ठरवून सुरु आहे अशी परिस्थिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
मेळघाट; चिलाटी या दुर्गम भागातील मैत्री या सेवाभावी संस्थेच्या केंद्राला राज ठाकरे यांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या १० दिवसांच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी मेळघाटातील कुपोषण आणि सार्वजनिक आरोग्य व ग्रामीण विकास या विषयांवर रचनात्मक कार्य करणाऱ्या मैत्री या सेवाभावी संस्थेच्या चिलाटी या दुर्गम भागातील केंद्राला राज ठाकरे यांनी भेट दिली. या संस्थेचं केंद्र चिखलदरा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे जवळपास ४० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे साई समाधीच्या दर्शनाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे साई समाधीच्या दर्शनाला
7 वर्षांपूर्वी -
विकास करण्यात फसले म्हणून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा धार्मिक राजकारण पेटवलं जाणार? - राज ठाकरेंचा ठोकताळा
विकास करण्यात फसले म्हणून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा धार्मिक राजकारण पेटवलं जाणार? – राज ठाकरेंचा ठोकताळा
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ पुरावे; अयोध्या तो बहाणा है? निवडणुकीपूर्वी इथल्या उत्तर भारतीयांच्या मतांसाठी राजकारण: सविस्तर
आज दरवर्षी प्रमाणे शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित झाला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नेमकी कोणती नवी घोषणा करणार याची उत्सुकता असली तरी त्यातून काही भरीव निष्पन्नं होईल असं राजकीय विश्लेषकांना अजिबात वाटत नव्हतं. कारण मागील ४ वर्षांपासून राजीनामा नाट्याचे इतके प्रयोग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून झाले आहेत की त्यात प्रसार माध्यमांना सुद्धा रस उरलेला नाही. त्यामुळे पुन्हा भाषणात सत्तेला लाथ किंवा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा झाली तरी त्याला कोणीही गांभीर्याने घेईल असे वाटत नव्हते, असच एकूण चित्र आहे. परंतु ठरल्याप्रमाणे विकासाचं राजकारण फसल्याने लोकांना सत्ताकाळात आम्ही काय केलं याचं उत्तर द्यावं लागेल म्हणून अखेर तेच राम मंदिराचं भावनिक शस्त्र अपेक्षेप्रमाणे उपसण्यात आलं आहे आणि २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांनी घेतलं शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन
पंतप्रधान मोदींनी अहमदनगरच्या विमानतळावर काही वेळापूर्वी आगमन झालं. काही वेळेपूर्वीच ते साई समाधी शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले आणि पूजन सुद्धा करण्यात आलं. याशिवाय आज त्यांच्या भेटीदरम्यान विविध कामांचं भूमीपूजनदेखील करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात येणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांच्या भेटीसाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना अटक
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. केरळमधील शबरीमाला मंदिर प्रकरणी आणि महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना सुद्धा महिलांना प्रवेश दिला जात नाही. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीला निघाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साईबाबा समाधी शताब्दी उत्सवासाठी नगरजिल्ह्यात म्हणजे शिर्डीला येणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूक, पश्चिम विदर्भातील वणी आणि हिंगणघाट मनसे जिंकण्याची शक्यता: सविस्तर
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांनी जोरदार धक्का दिला घेऊन स्थानिक कार्यकारिणी बरखास्त केली. याचवेळी शहर अध्यक्ष म्हणून पप्पू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहर कार्यकारिणी येत्या काही दिवसांनी घोषित करण्यात येईल असं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाना उद्दट वागतो, पण तो असं काही करेल हे मान्य नाही: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष सध्या १० दिवसांच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान काल त्यांची अमरावती येथे प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर ‘मी-टू’च्या माध्यमातून जे आरोप करण्यात आले त्यावर राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी उत्तर देताना म्हटलं की, नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असं काही करेल हे मान्य नाही असं म्हणत नाना पाटेकरांनी खंबीर पाठिंबा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी