महत्वाच्या बातम्या
-
ठाण्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मनसेने भर पत्रकार परिषदेत तुडवलं
ठाण्यात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर पत्रकार परिषदेत तुडवून पोलिसांच्या हवाली केले आहे. गुजरातमध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. पण किती दिवस या असल्या लोकांना सहन करायचे ?. जर हे असले विकृत प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू, असा थेट इशाराच मनसेने दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधूनच मुंबईत रोज घाण येते आहे, अशा शब्दात मनसेने उत्तर भारतीयांवर टीका केली.
7 वर्षांपूर्वी -
भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित
शिवसेनेच्या स्वबळाचा नारा आणि त्यामुळे भाजपची झालेली राजकीय गोची आता स्पष्ट दिसू लागली आहे. भाजपा शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही पक्षांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा आघाडीला होईल. त्यामुळे भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांचा आगामी निवडणुकीत पराभव होऊ शकतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारत-बंद वेळी स्वतःचा मतदारसंघ ठप्प करू न शकणाऱ्या निरुपमांची महाराष्ट्र-ठप्प करण्याची भाषा
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात रान पेटलेल असताना, त्याला संधी म्हणून निरुपम पाहत असावेत म्हणून नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलण्याची संधी मिळताच संजय निरुपम यांनी महाराष्ट्रात प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या मतदार संघात उत्तर भारतीयांनी साडेतीन लाखापेक्षा अधिक मतांनी नाकारलेले संजय निरुपम सध्या स्वतःची मतपेटी वाढविण्यासाठी आणि उत्तर भारतीयांचा मसीहा असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी मिळताच केविलवाणे प्रयत्नं करत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
गुजरातींना धमकी? गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे, मोदींनाही वाराणसीला जायचे आहे
चिमुकलीवर गुजरातमध्ये झालेल्या बलात्कारानंतर सध्या उत्तर भारतीयांना गुजरातमधून मारहाण करून हुसकावून लावण्यात येत आहे. अगदी गुजरात मध्ये पोलिसांना फ्लॅगमार्च करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या संजय निरुपम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसेच गुजराती समाजाला अप्रत्यक्ष धमकावत आहेत अशी चर्चा राजकीय निरुपम यांच्या नागपूरमधील वक्तव्यावरून रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात हुक्का बंदी लागू करून अधिसूचना जारी
महाराष्ट्र सरकारने हुक्का पार्लरवर बंदी लागू केली आहे. तसेच याबाबतची अधिसूचना सुद्धा राज्याच्या गृहविभागाने जारी केली आहे. सिगरेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम २००३ कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या आढाव्याबाबत खासदारांनी मौन बाळगलं?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोतोश्रीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीला अनेक खासदारांनी हजेरी लावली खरी, परंतु त्याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे पक्ष प्रत्येक खासदाराच्या मतदार संघाचा आढावा घेतल्या शिवाय स्वबळ की एकत्रित निवडणुका याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आढावा बैठकीला येणारे खासदार कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
पीडिते महिलेच्या संदर्भात आणि शिवसेना आ. उदय सामंतविरोधात पत्रकार परिषद घेणार: निलेश राणे
सध्या कोकणातील वातावरण महिलांसंबंधित गुन्ह्यांवरून तापताना दिसत आहे. काही दिवसांपूवी सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये मुलीवर बलात्काराची घटना समोर आली होती आणि त्यात शिवसेनेच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची नाव त्या हॉटेलच्या मालकीवरून समोर आली होती. त्यात आता कोकणातील अजून प्रकरण आमदार नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचे सूतोवाच देण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
जो संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काय काम नसते, मग महागाई काय समजणार?
जो स्वतः संसार करत नाही, मग अशा माणसाला महागाई काय समजणार अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. देशात प्रचंड महागाई वाढली आहे आणि जो स्वतः संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काही काम नसते असं अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांना हसू आवारता आलं नाही.
7 वर्षांपूर्वी -
ब्राह्मणांनी राजकारणात यावं आणि आरक्षण मागावं: महादेव जाणकार
पुण्यात आज ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता दुग्धविकास मंत्री महादेव जाणकार यांनी अनेक वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस चांगलं काम करत असून ते भविष्यात पंतप्रधान होतील असं वक्तव्य केलं आहे. ब्राह्मणांमुळे चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी राजकारणात यावं आणि आरक्षण मागावं असं आवाहन जानकरांनी ब्राह्मण समाजाला केलं.
7 वर्षांपूर्वी -
अनधिकृत होर्डिंग कोसळून पुण्यात दोघांचा मृत्यू तर ८ जखमी
रेल्वेच्या जागेवरील अनधिकृतपणे होर्डिंग्ज काढत असताना एक मोठे लोखंडी होर्डिंग दुपारी कोसळले आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला असून तब्बल ८ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, म्हणून आश्वासनं देत सुटलो: नितीन गडकरी
आम्हाला २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्याची खात्री नसल्याने काही जणांनी मतदाराला आश्वासने द्यायला सांगितली. त्यानंतर आम्ही इतकी आश्वासने दिली लोकांना की ती आता आठवत सुद्धा नाहीत अशी कबुली खुद्द केंद्रीय दळणवळन मंत्री नितीन गडकरी यांनी मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमा दरम्यान दिली. परंतु, त्यांच्या या विधानाने भाजपच्या अडचणी वाढणार असून गडकरींच्या या कबुलीने भाजपची एक प्रकारे पोलखोल झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पवारांची तिसरी पिढी राजकारणात? पार्थ अजित पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार?
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीत अनेक राजकीय दिग्गज त्यांची पुढची पिढी राजकारणाच्या आखाड्यात उतरविण्याची शक्यता आहे. त्यात ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य घटक हे सर्वश्रुत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे याआधीच सक्रिय राजकारणात आहेत, तर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
लोकशाहीत थापा मारून निवडणूक जिंकणं हा एक मार्ग बनला आहे: उद्धव ठाकरे
निवडणुकीत थापा मारण्याच्या भाजपच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून तोंडसुख घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष केलं आहे. तसेच निवडणुकांतील आश्वासने पूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी जाहीर केली होती. मात्र निवडणूक आयोगाची ही घोषणा त्यांच्या मागील घोषणांप्रमाणे केवळ पोकळ आश्वासन ठरु नये, अशी टीका करत अप्रत्यक्षरित्या भाजपच्या खोट्या आश्वासनांना उजाळा देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रपूर - काँग्रेसच्या नगरसेवकाला भाजपच्या नगरसेवकांकडून मारहाण
चंद्रपूर – काँग्रेसच्या नगरसेवकाला भाजपच्या नगरसेवकांकडून मारहाण
7 वर्षांपूर्वी -
हायअलर्ट! बायोमेड कंपनीची लस महाराष्ट्र व यूपी'मध्ये वापरल्याने पोलिओचा धोका
भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असला तरी बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरसचे अस्तित्त्व असल्याचं निष्पन्न झाल्याने संपूर्ण देशात आणि विशेष करून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात याच बायोमेड कंपनीची लस वापरल्याचे समोर आल्याने या दोन राज्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाणांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात आणि फोटोसेशन
याआधी दलितांची तुलना डुकरासोबत करणारे भाजपचे विवादित आमदार तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण पुन्हा त्यांच्या अशाच विवादित कृत्यामुळे प्रकाशझोतात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि समाज माध्यमांवर त्यांच्या विरुद्ध संतापाची लाट आली आहे. यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटोशूट केले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाईंचा राजीनामा, केंद्रीय मंत्री अनंत गीतेंवर नाराज?
शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी तडकाफडकी आपला राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. प्रकाश देसाई केंद्रीय मंत्री अनंत गीतेंवर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा स्थानिक शिवसैनिकांमध्ये रंगली आहे. जिल्ह्यात उद्योग असून सुद्धा स्थानिक शिवसैनिक उपेक्षित असल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्ष केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गितेंना निवडणुकीच्या तोंडावर लक्ष केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचे ज्येष्ठ नेते व म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते व म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाणांवर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमीष देत तब्बल १४ वर्षे एका महिलेची शारीरिक आणि मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र टोल मुक्त कधी होणार?
व्हिडिओ: २०१४ मध्ये जाहीर केलेल्या वचननाम्यात शिवसेना आणि भाजपने महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे वचनच दिले होते, परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला. मुंबई प्रवेशद्वारांवर असलेले टोलनाके म्हणजे ट्रॅफिक आणि प्रदूषण समस्या निर्माण करणारे मूळ होय.
7 वर्षांपूर्वी -
महापालिकेच्या आरोग्य खात्याचे गुजरातीमधून प्रशिक्षण
महापालिकेच्या आरोग्य खात्याचे गुजरातीमधून प्रशिक्षण
7 वर्षांपूर्वी