महत्वाच्या बातम्या
-
गल्ली ते दिल्ली सत्तेत सामील असलेल्या सेनेची 'हेच काय अच्छे दिन?' अशी पोश्टरबाजी
मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना तर बसणारच आहे, परंतु लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने त्याची झळ थेट सामन्यांना आणि एकूणच बाजापेठेला सुद्धा बसणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रसाद लाड म्हणतात नाणार प्रकल्प होणारच, पण कोकणी माणूस भाजपचे हे 'लाड' सहन करणार?
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी रत्नागिरी येथे भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले . दरम्यान, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाणार विषयावर बोलताना ‘नाणार प्रकल्प काही झाले, तरी आम्ही करणार’ असं धक्कादायक विधान केलं आणि त्यामुळे भाजप विरोधात कोकणात संतापाची लाट येण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
निसर्ग संपन्न केरळात जे शक्य झालं, ते कोकणात अनेक वर्ष का शक्य झालं नाही? राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकणातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईमध्ये पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी कोकणातील अनेक गंभीर विषयांना हात घातला. त्यावेळी त्यांनी कोकणच्या निसर्गाचा दाखला देताना केरळ राज्यातील पर्यटनाच उदाहरण समोर ठेवलं. जर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढीस लागलं, मग कोकणच्या निसर्गात अशी काय कमी होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
7 वर्षांपूर्वी -
तेलंगणात ९५ टक्के नोकऱ्या स्थानिकांना राखीव, तर महाराष्ट्र राज ठाकरेंना चुकीचे ठरविण्यात व्यस्त?
तेलंगणा सरकारच्या प्रस्तावाला नुकतीच राष्ट्रपतींकडून मान्यता मिळाल्याने तेलंगणनातील सर्व सरकारी तसेच निमसरकारी आस्थापनातील ९५ टक्के नोकऱ्या या केवळ स्थानिक लोकांनाच राखीव असतील. संपूर्ण अभ्यासाअंती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळाने नवीन झोनल प्रणालीचा प्रस्ताव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता. त्यांना अखेर कायद्याने मंजुरी मिळाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
धुळे महापालिका: गिरीश महाजणांविरोधात आमदार अनिल गोटे आणि सामान्य कार्यकर्ते दंड थोपटणार?
भाजपने सध्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्राचे सर्वेसेवा करण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. परंतु जे जळगाव महानगर पालिका निवडणुकीत झालं ते ते संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात होईल अशी भोळी अशा सध्या भाजप वरिष्ठांच्या मनात निर्माण झाली असावी. त्यामुळे आगामी धुळे महानगर पालिकेची जवाबदारी सुद्धा स्थानिक आमदार अनिल गोटे यांच्याकडून वर्ग करून ती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचा राम कदम म्हणजे 'हराम कदम', उद्धव ठाकरेंची सामना'तून बोचरी टीका
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना’मधून आज भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजप आमदार राम कदम यांच्यावर सडकून बोचरी टीका करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
परप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबई लोकल सेवेचा ताण वाढत आहे - मुंबई उच्च न्यायालय
परप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबई लोकल सेवेचा ताण वाढत आहे, मुंबई उच्च न्यायालयाने चिंता बोलून दाखवली. राज ठाकरेंच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला स्वतंत्र रेल्वे बोर्ड असावा ही मागणी रास्त नाही का? आपले मत नोंदवा.
7 वर्षांपूर्वी -
राम कदमांच्या विरोधात आरएसएस प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मैदानात
भाजपचे आमदार राम कदम यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आता खुद्द आरएसएस प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मैदानात उतरून घाटकोपरमध्येच आंदोलन करणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ व्हायरल: फसलेल्या नोटबंदीची राज ठाकरेंकडून पोलखोल, आरबीआय'चा अहवाल ते तत्पूर्वीचा घटनाक्रम केला प्रसिद्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फसलेल्या नोटबंदीवरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यासाठी त्यांनी आरबीआय’चा अहवाल ते तत्पूर्वीच्या घटनाक्रमाचा संपूर्ण माहितीपटच व्हिडीओ’द्वारे प्रसिद्ध केला आहे. देशभरातील सव्वाशे कोटी जनतेला याचा फटका बसला होता आणि यात बँकेच्या रांगेत अनेक निष्पापांचा जीव सुद्धा गेला होता. तसेच देशभर बँकांच्या आणि एटीएम’च्या बाहेर रांगेत उभं राहून हक्काच्या पैशासाठी पोलिसांचा लाठीमार सुद्धा सहन करावा लागला होता.
7 वर्षांपूर्वी -
खुलेआम उत्सवात महिलांचा अपमान करणाऱ्या राम कदमांची केवळ ट्विटर'वरून 'डिजिटल माफी'
भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत भर दहीहंडी उत्सवात विवादित वक्तव्य केलं होत. मात्र राज्यभर तीव्र पडसाद उमटल्यावर माताभगिनींची ट्विटर वरून टिवटिव करत ‘डिजिटल माफी’ माफी मागून वेळ मारून घेतली आहे. त्यामुळे भविष्यात काही करा आणि ट्विट करून विषय मिटवा, असा ट्रेंड राजकारणात सुरु झाल्यास नवल वाटायला नको.
7 वर्षांपूर्वी -
स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदमांविरोधात महिला आयोगाकडून स्युमोटो दाखल
दहीहंडी दरम्यान महिलांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांच्याविरोधात स्युमोटो दाखल करून घेतल्यानंतर त्यांना ८ दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेनेच्या राज्यात पेट्रोल दर सेंचुरीच्या दिशेने रवाना, सामान्यांचा खिसा महागाईने जळणार
मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांनाच बसणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
मंगलदास बांदल राज ठाकरेंची कृष्णकुंज'वर भेट घेणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर आले असता त्यांची कार्यक्रमादरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल याच्यासोबत भेट झाली होती. त्यावेळी पैलवान असून सुद्धा त्यांचे भाषण कौशल्य राज ठाकरेंना आवडले होते. त्यामुळे राज ठाकरेंना रमेश वांजळेंची आठवण तुम्ही करुन दिलीत. लोकसभेच्या उमेदवारीचं काय ते पुढं बघू. पण एकदा भेटा,` असं खुद्द राज ठाकरे यांनी हे निमंत्रण पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना दौऱ्यादरम्यान दिले होते, असं त्यांनी पत्रकारांना कळवलं.
7 वर्षांपूर्वी -
राम कदमांच्या विधानाचा फटका भाजप मंत्र्यांना
राम कदमांच्या विधानाचा फटका भाजप मंत्र्यांना
7 वर्षांपूर्वी -
ऑडिओ व्हायरल: राम कदमांना कॉल करून सुनावले, तुमचे आताचे गुरु एकदम घाणेरडे असल्याने विचार घाणेरडे झाले
भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच थरातून जोरदार टीका केली जात आहे. आमदार राम कदमांच्या विरोधात मनसेनेसुद्धा आघाडी उघडली असून, त्यांच्या विरोधात पोश्टरबाजी आणि त्यांना कॉल करून चांगलेच सुनावत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राम कदम माफी मागा नाहीतर, चपलेने हाणू - अॅड. स्वाती नखाते पाटील
राम कदम माफी मागा नाहीतर, चपलेने हाणू – अॅड. स्वाती नखाते पाटील
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची शिवसेनेकडून गंभीर दखल, सामाना'तून संकेत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची गंभीर दखल घेतल्याचे संकेत सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून दिले आहेत. त्यासाठी पक्षाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पक्षाच्या विश्वासातील सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
राम कदमांना आवाहन! मी मुंबईला येते, मला फक्त बोटाने स्पर्श करून दाखवा, उचलून घेऊन जाण्याची गोष्ट तर लांबच राहिली
भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर महिलावर्गाकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. राम कदमांनी महिलांप्रती केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणजे एका मराठा तरूणीने भाजप आमदार राम कदम यांना ओपन चॅलेंज दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुली पळविण्याचा कटात सामील आहे का भाजप सरकार? : राम कदमांविरोधात मनसेची पोश्टरबाजी
भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच थरातून जोरदार टीका केली जात आहे. आमदार राम कदमांच्या विरोधात मनसेनेसुद्धा आघाडी उघडली असून, त्यांच्या विरोधात पोश्टरबाजी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मुली पळवणं हे आमदाराच्या कार्यकक्षेत? आई-वडील म्हटले पसंत आहे तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार: राम कदम
काल झालेल्या दहीहंडी उत्सवात घाटकोपरमधील भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात उपस्थितांना स्वतःचा मोबाईल क्रमांक देताना त्यांनी धक्कादायक विधान केलं, ज्यामुळे समाज माध्यमांवर त्यांच्या या धक्कादायक विधानाचा समाचार घेण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी