महत्वाच्या बातम्या
-
कै. रमेश वांजळेनंतर आता प. महाराष्ट्रात मनसेकडून पैलवान मंगलदास बांदल शिरूर लोकसभेसाठी इच्छुक?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष विस्ताराच्या निमित्त राज्याच्या दौऱ्यावर होते. काल त्यांच्या हस्ते मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी उभारलेल्या भव्य ‘माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याचे लोकार्पण करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र सैनिकांमध्ये चैतन्य संचारल्याचे चित्र त्यांच्या राजकीय दौऱ्यातून पाहायला मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसे आमदार शरद सोनावणेंच्या संकल्पनेतील भव्य कुस्ती आखाड्याचे राज ठाकरेंच्या हस्ते उदघाटन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पक्ष विस्ताराच्या निमित्त राज्याच्या दौऱ्यावर असून, आज त्यांच्या हस्ते मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी उभारलेल्या भव्य ‘माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याचे लोकार्पण करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र सैनिकांमध्ये चैतन्य संचारल्याचे चित्र त्यांच्या राजकीय दौऱ्यातून पाहायला मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे माजी खासदार दिवंगत राजाभाऊ गोडसेंच्या कुटुंबीयांच राज ठाकरें'कडून सांत्वन
शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मुत्रपिंड विकाराने १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पंचवटीतील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते . त्यांचं वय ५९ वर्षांचे होते. कट्टर शिवसैनिक म्ह्णून ओळख असलेले राजाराम परशराम गोडसे हे काही काळ मनसेमध्ये सुद्धा होते.
7 वर्षांपूर्वी -
एल्गार परिषद; प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद का घेतली? - हायकोर्ट
पुणे पोलिसांनी नक्षली समर्थकांवर केलेल्या कारवाईवरुन मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले असून, त्यांनी संपूर्ण प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असताना पत्रकार परिषद का घेतली, असा सवाल उपस्थित करत मुंबई पोलिसांना फटकारलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई-ठाणे आज दहीहंडी गोविंदा पथक गाजवणार
जन्माष्टमीची रात्र सरली असून आज सकाळपासून दहीहंडीचा जल्लोष मुंबई ठाण्यात जोरदार सुरु झाला आहे. मागील २ वर्षे सार्वजनिक दहिकाल्यावर न्यायालयाच्या नियमावली लागू झाल्याने अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली होती. असे असले तरी सुद्धा दहीहंडी उत्सवाचा आणि दहीहंडी पथकांचा आनंद कमी झालेला नाही.
7 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये आम्ही केलेला विकास भाजप स्मार्ट सिटीच्या नावाखाली दाखवत आहे : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी संबोधीत करताना शहरातील अनेक गंभीर विषयांना हात घातला.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने पडद्याआड गेम केला? हाजी अराफात शेख यांनी शिवसेनेचं शिवबंधन गुपचूप तोडलं
शिवसेनेचे उपनेते तसेच वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी काल गुपचूप शिवसेनेचं शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला. कारण भाजपने आधी त्यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली आणि शिवसेनेपुढे संभ्रम ठेऊन त्यांना एकारात्रीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: 'आम्हाला महामंडळच नको' ही भूमिका बदलत, संधी मिळताच सेनेने ५ मलईदार महामंडळ घेतली
मागील महिन्यातच म्हणजे जुन मध्ये युतीतील तेढ इतकं टोकाला गेलं होत की महामंडळांच्या नियुक्त्यांवरून शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ते अनिल देसाई यांनी थेट पक्ष प्रमुखांच नाव घेत, महामंडळावरील नियुक्त्यांवरून तीव्र मत प्रदर्शन करून उद्धव ठाकरेंची भूमिका प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केली होती.
7 वर्षांपूर्वी -
घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत धोरण नसल्याने अनेक राज्यात बांधकामांना स्थगिती
देशभरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. परंतु वाढत्या मनुष्यवस्तीतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण नसल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांना शुक्रवारी मोठा दणका दिला आहे. जोपर्यंत मनुष्यवस्तीतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आणणार नाही तोपर्यंत राज्यांत बांधकामे करता येणार नाहीत, असा महत्वाचा आदेशच न्यायालयाने दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
लवासा प्रकल्पाची राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका, दिवाळखोरीच्या वाटेवर?
लवासाला आर्थिक पुरवठा करणाऱ्यांनी ‘लवासा प्रकल्प’ कर्जबाजारी ठरवण्याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर एक याचिका केली होती. लवासा विरुद्धची ती याचिका लवादाने दाखल करून घेतल्यामुळे ‘एचसीसी’ने तशी माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे बीडला सुमंत धस यांच्या कार्यालयाच्या उदघाटनाला आले होते, पण तोबा गर्दीने संवादाच थेट सभेत रूपांतर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या बीडच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांशी संवाद तसेच पदाधिकारी मेळाव्यांवर त्यांचा विशेष भर आहे. परंतु बीडच्या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे बीड’चे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या केज तालुक्यातील नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी आले असता, त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
7 वर्षांपूर्वी -
त्या अटकेतील पाचही जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते
पोलिसांनी अटक केलेल्या वर्णन गोन्सालविस, वरावर राव, अरुण फरेरा, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंह यांनी म्हटलं असून त्यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
संधी द्या, स्वच्छ आणि सुरक्षित औरंगाबाद शहर देतो : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असता औरंगाबादमधील भेटीदरम्यान त्यांनी औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तीशी संवाद साधला. दरम्यान, उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी विकासासोबत औरंगाबाद शहर आणि राजकारणातील वास्तव सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला.
7 वर्षांपूर्वी -
नाशिककरांच्या तीव्र संतापापुढे भाजप नरमली, मुंढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या तीव्र संतापापुढे भाजप नरमली असल्याची चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद; शिवसेनेचे माजी महापौर सुदाम मामा सोनावणेंचा मनसेत प्रवेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्याचे औचित्य साधून अनेक पक्षतील नेते मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी उत्सूक असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याचा पहिला धक्का सेनेला बसला आहे, कारण औरंगाबादचे माजी महापौर राहिलेल्या एका दिग्गज नेत्याने त्यांच्या सर्व समर्थकांसोबत मनसे’मध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
दहीहंडीनिमित्त मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर
येत्या सोमवारी म्हणजे ३ सप्टेंबर रोजी गोपाळकाला दहीहंडीनिमित्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी तसेच निम सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच सामान्य प्रशासन विभाग एक परिपत्रक जाहीर करणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला राहुल जाणार नाहीत: काँग्रेस
आरएसएस’कडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले नाही आणि मिळाले असते तरी ते गेले नसते असं प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांपुढे स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसने या विषयावर आता पडदा टाकला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेना आमदार किणेकरांविरुद्ध अंबरनाथमध्ये संताप वाढत आहे? यापूर्वी सुद्धा त्यांना भीमनगर परिसरात महिलांनी घेरलं होत: VIDEO
शिवसेनेचे अंबरनाथमधील आमदार बालाजी किणेकरांविरुद्ध स्थानिकांमध्ये दिवसेंदिवस रोष वाढताना दिसत आहे. शहरातील खराब रस्त्यांना कंटाळल्यामुळे शहरात त्यांच्याविरुद्ध होर्डिंगबाजी सुरु झाली आहे. शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, त्याचा सामान्यांना प्रचंड त्रास होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम बंदीबाबत राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे आणि पवारांना पत्र
आगामी निवडणुकीआधी ईव्हीएम मशीन्स वरून राजकारण तापताना दिसत आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या गंभीर विषयावर आक्रमक झालेले दिसत असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणेज ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांना पत्र पाठवून ईव्हीएम’ला तीव्र विरोध करण्याचं आवाहन केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून ६ दिवसांच्या बीड, औरंगाबाद, धुळे आणि जुन्नरच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात औरंगाबाद पासून होणार असून तिथे निरनिराळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश, तसेच कार्यकर्त्यांशी परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
7 वर्षांपूर्वी