महत्वाच्या बातम्या
-
मराठा आरक्षणसाठी आज पुण्यात चक्काजाम
मराठा आरक्षणावरून राज्यभर हिंसाचार सुरु झाल्यावर राज्य सरकार खडबडून जाग झालं असलं तरी मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलन आणि चक्काजाम थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आज मराठा आरक्षणसाठी पुण्यात चक्काजाम करण्यात आल्याने अनेक भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट जाणवत होता.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही: नारायण राणे
मराठा समाजाच्या आरक्षनांच्या विविध मागण्यांवर आज मुख्यमत्री आणि मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्याची बैठक होणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्या मध्यस्थीमुळे ही चर्चा होणार आहे. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही. असे ते म्हणाले. घटना दुरुस्ती प्रक्रियेला वेळ लागेल. यामुळे मागास अनुकल नसेल तर या प्रस्तावाला मंत्रीमंडळात मंजुरी घ्यावी, असेही राणे म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
पोलादपूर घाटात बस खोल दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू
पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस ८०० फूट खोल दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मुत्यू झालेले सर्वजण दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते.
7 वर्षांपूर्वी -
मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांचं राज ठाकरेंच्या अजान'च्या वक्तव्यावर परखड मत, वक्तव्याचा विपर्यास!
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यात पदाधिकारी मेळाव्या आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना जैन, राम मंदिर तसेच मुस्लिम समजासंबंधित रोखठोक मत व्यक्त केलं आहे. परंतु त्यात त्यांनी अजान’च्या संबंधित वक्तव्य केलं, तेच केवळ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध केलं गेलं आणि मूळ विषयाला बगल देऊन राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं परखड मत मनसेचे इरफान शेख यांनी व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे बालिश असून त्यांना ती काय चिक्कीची फाईल वाटली का? : आंबेडकर
जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर आली असती तर क्षणाचा सुद्धा विलंब न लावता मी मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही केली असती या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाचा सर्वच थरातून समाचार घेतला आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंकजांना एका तासासाठी मुख्यमंत्री करावं: शिवसेना
जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर आली असती तर क्षणाचा सुद्धा विलंब न लावता मी मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही केली असती या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाचा सर्वच थरातून समाचार घेतला आहे. त्यात आता शिवसेनेसुद्धा संधी न घालवता सामना वृत्तपत्रातून पंकजा मुंडे आणि अप्रत्यक्ष रित्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी 'वारीत साप' सोडण्याचं विधान केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले
राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच वारीत साप सोडण्याचं विधान केलं आणि त्यामुळेच मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले होते. नाहीतर मराठा आरक्षणच आंदोलन शांततेत चाललेलं, पण सत्ताधाऱ्यांनीच आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि आंदोलन चिघळलं,’ अशा तिखट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
आज मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणावर तोडगा याच मूळ चर्चेचा विषय असणार आहे असं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
पोटात आमच्या पाप नाही अन महाराष्ट्रात मनसेला रोखायची कोणाच्या बापाची टाप नाही: शरद सोनवणे
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील पदाधिकारी मेळाव्या निमित्त मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे सुद्धा मंचावर उपस्थित होते. अनेक दिवसानंतर ते आज मनसेच्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित सुद्धा केलं. त्यांच्या रोखठोक भाषणातून त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा जागविण्याचे काम केले.
7 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं कधी लोकांना मारत नसतात
छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं कधी लोकांना मारत नसतात.
7 वर्षांपूर्वी
एका मुस्लिम कुटुंबाने मराठा आंदोलना दरम्यान रेल रोको वर आपल्या लहान मुलांना आश्वस्त केले
हीच आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि ती विसरता कामा नये हीच अपेक्षा -
आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर अनेक प्रश्न सुटतील: राज ठाकरे
सध्या मराठा आरक्षणाचा विषय राज्यात पेटला असताना सर्वच पक्षांकडून बचावात्मक प्रतिक्रिया येत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोख ठोक भूमिका घेतली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील पदाधिकारी मेळाव्या निमित्त ते पुण्यात आले असता त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना त्यांचं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
१४ ऑगस्टला मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, पण राज्य मागास आयोगाचा अहवाल?
सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या आक्रमक आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे सरकार सुद्धा खडबडून जाग झालं आहे आणि सर्व संबंधित विषयांना वेग आल्याचे चित्र आहे. सरकारी पातळीवर या हालचाली सुरु असल्या तरी १४ ऑगस्टला मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. परंतु तत्पूर्वी राज्य मागास आयोगाचा अहवाल येण्यास आणखी ४ महिन्यांच्या कालावधी लागणार समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
ठाण्यात मराठा आंदोलनातील हिंसाचारात शिवसेना माजी नगरसेवक आणि शाखाप्रमुखाचा समावेश
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन व बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर सुद्धा ठाण्यात नितिन कंपनी येथे रस्ता रोको आंदोलन करणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केले होती. परंतु त्यानंतर सुद्धा हिंसाचार भडकून दंगल सद्रुश्य परिस्थिती झाली होती. पुराव्याअंती याप्रकरणात इतर ३८ जणांना अटक तर झालीच परंतु त्या व्यतिरिक्त शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे आणि अशोक कदम हे सुद्धा त्या हिंसाचारात सामील असल्याच सीसीटीव्ही फुटेज वरून समोर आल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मूळ आरक्षणाचा विषय सरकारच्या हातात राहिलेला नाही, शिवसेना आमदार व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधींकडून निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. त्यात आता शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुद्धा राज्यातील स्थितीवर आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नेते मंडळी काय बोलत आहेत? मराठा आरक्षण ग्रामविकास किंवा महिला व बालविकास मंत्रालय कस देऊ शकत? तिथे का फाईल जाईल?
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं की, ‘माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते’. परंतु मराठा आरक्षणाची फाईल ग्रामविकास मंत्रालय किंवा महिला व बालविकास मंत्रालयात का जाईल आणि ग्रामविकास विकास मंत्र्यांनी फाईल वर सही केली असती तर मराठा समाजाला आरक्षण लागू झालं असतं? अशी विधानं का केली जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची मराठी तरुणांना हात जोडून विनंती, आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी जीव गमावू नका, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनाला अनुसरून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या आंदोलनादरम्यान तरुणानांचे नाहक बळी जात असल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे आणि मराठी तरुणांना भावनिक आवाहन सुद्धा केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाभारतात 'संजय'चा रोल फक्त कॉमेंट्री करायचा असतो: भाजपचा राऊतांना टोला
शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्यावर भाजपने संजय राऊत यांच्यावर ही झोंबणारी टीका केली आहे. भाजपच्या राज्य आयटी सेल ने ट्विट करून संजय राऊतांना टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं भाकीत खरं ठरतंय? विकास फसल्याने सेना-भाजपला 'राम मंदिरा'चा आधार? आपलं मत नोंदवा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या भेटी मागे हिंदुत्वाचा मुद्दा आणि भाजपला शह अशी कारणं पुढे केली जात असली तरी वास्तव हे दुसरंच असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. राज्य सरकारमध्ये तसेच केंद्रात १२-१३ मंत्रिपद उपभोगणाऱ्या शिवसेनेची नेहमीच एक बोंब राहिली आहे की, आमच्या मंत्र्यांची तसेच आमदारांची कामं मार्गी लावली जात नाहीत. परंतु नुकतंच सामना’ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते सत्तेचा अनुभव घेण्यासाठी सत्तेत सामील असल्याचं उत्तर दिल आहे. वास्तविक गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या मंत्र्यांचा कार्यकाळ हा विकासशुन्य असाच म्हणावा लागेल.
7 वर्षांपूर्वी -
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार-मायावतींची भेट
आगामी लोकसभा निवडणुका जशा भाजपसाठी महत्वाच्या आहेत, तशाच त्या विरोधी पक्षांसाठी खूप महत्वाच्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सर्वच पक्ष अनेक राजकीय गणित मांडताना दिसत आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणाचा कल हा भाजप विरोधी होऊ लागला आहे आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि बसपाच्या सर्वेसेवा मायावतींमध्ये जवळपास दीड तास राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्टंन्ट? सेना आ. हर्षवर्धन जाधवांचा जुलै २०१८ ई-मेलद्वारे राजीनामा, डिसेंबर २०१५ पत्राद्वारे, ऑक्टोबर २०१५ फॅक्सद्वारे प्रयोग झाले आहेत
मराठा आरक्षण तापू लागल्याने अनेक राजकारणी नवं नवे प्रयोग करताना दिसतील आणि त्यातले काही जण असे प्रयोग अनेक वेळा करून झाले आहेत आणि शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव त्यातीलच एक असच म्हणावं लागेल. भावनिक राजकारण आणि संधीचा फायदा असच त्या मागील कारण असावं असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.
7 वर्षांपूर्वी