महत्वाच्या बातम्या
-
हिंसा नको, सरकार चर्चेला तयार: मुख्यमंत्री फडणवीस
मराठा समाजाने हिंसा वा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सातारा, आंदोलकांनी एनसीपी आमदार शिवेंद्रराजें'ना बोलू दिलं नाही
सातारा येथे मराठा क्रांती मोर्च्यातील आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्र राजे यांना आक्रमक आंदोलकांनी घोषणा देत भाषण करण्यापासून रोखलं असं वृत्त आहे. त्यामुळे साताऱ्यात सुद्धा मराठा आरक्षणावरून वातावरण तापताना दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा क्रांती मोर्चा, औरंगाबादेत आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा मृत्यू
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून औरंगाबादेत पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी काकासाहेब शिंदे या युवकाने नदीत उडी घेऊन निषेध नोंदवताना आपला जीव गमावला होता. काल म्हणजे मंगळवारी जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे वय वर्ष ५५ यांनी आंदोलनादरम्यान विषप्राशन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची मुलाखत एक फुसका बार, भाजप विरोध म्हणजे ‘मंगळसूत्र वापरणार नाही, पण कुंकू ठेवणार’
उद्धव ठाकरे यांच्या सामना मधील टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या मॅरेथॉन मुलाखतीत सर्वच प्रश्नांना त्यांच्या पक्षीय दृष्टीकोनातून उत्तर दिली आहेत, त्याला सर्वच थरातून उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘ओरिजिनल’ व ‘रिजनल’शी लोकांना काहीही देणेघेणे नाही, जो लोकांच्या समस्या सोडवतो तो लोकांचा पक्ष
उद्धव ठाकरे यांच्या सामना मधील टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या मॅरेथॉन मुलाखतीत सर्वच प्रश्नांना त्यांच्या पक्षीय दृष्टीकोनातून उत्तर दिली आहेत, त्याला सर्वच थरातून उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण, मुंबईत थेट रेलरोको तर ठाण्यात बसेस फोडल्या
औरंगाबाद पासून सुरु झालेल मराठा आरक्षणाचं रुद्र रूप संपूर्ण राज्यभर पसरत आहे. त्यात आज राज्याची राजधानी मुंबई सकट ठाणे, नवी मुंबई आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचे पडसाद सकाळी १० वाजल्यापासून उमटू लागले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून शासनाच्या वाहनांची तोडफोड
औरंगाबादमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून शासनाच्या वाहनांची तोडफोड
7 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्गचे पालकमंत्री मराठाद्वेषी आहेत: आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात घडत असलेल्या विषयाला अनुसरून एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेव्हा त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर थेट आरोप केले आहेत. पालकमंत्री जिल्ह्यात मराठाद्वेषी राजकारण करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट, घाईत निर्णय घेता येणार नाही: उद्योग मंत्री सुभाष देसाई
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकणे गरजेचे आहे असं सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक
मुंबई दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात मराठा क्रांती मोर्च्याच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली असता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहन मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्य कारभाराची अप्रेंटिसशिप? राज्यातील १२ कोटी लोकं सुद्धा सेनेच्या सत्ता कारभाराचा अनुभव घेत आहेत?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना सत्तेत का सहभागी झाली यावर प्रतिक्रया दिली आहे. त्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,’महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे फोडून भाजपने आपलं राज्य स्थापन केलं असतं तर पुन्हा आम्ही बोंबलतच राहिलो असतो रस्त्यावर. त्याच्यापेक्षा मी माझ्या लोकांना कारभाराचा अनुभव घेऊ दिला” असं उत्तर दिल.
7 वर्षांपूर्वी -
मराठा क्रांती मोर्च्या आंदोलनात काही पेड लोकं घुसली आहेत: चंद्रकांत पाटील
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण आणि मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनासंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. सरकारच्या हातात जे होतं ते केलं, आता निर्णय न्यायालयाचा आहे. परंतु काही पेड लोक या आंदोलनांत घुसली असून त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना धक्काबुक्की, गराड्यात पळ काढला
शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आले असता मराठा क्रांती मोर्चातील आक्रमक कार्यकर्ते चंद्रकांत खैरेंच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना अक्षरशः हाकलून देण्यात आहे, तसेच सुरक्षेच्या गराड्यात त्यांना त्यांच्या खासगी वाहनात बसवून निघुन जाण्यास सांगण्यात आलं.
7 वर्षांपूर्वी -
काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मराठा क्रांती मोर्चेकरी सेना खासदार खैरेंच्या अंगावर धावले आणि हाकलून दिल
काल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला. आज सकाळी काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
7 वर्षांपूर्वी -
‘माझा पक्ष रिजनल असला, तरी ओरिजनल आहे’; उद्धव ठाकरेंची मनसे अध्यक्षांवर अप्रत्यक्ष टीका
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेली उद्धव ठाकरेंची आज दुसरी मॅरेथॉन मुलाखत प्रसीद्ध झाली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक फोडण्याच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल. मागील वर्षी मुंबई महानगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले.
7 वर्षांपूर्वी -
सत्तेबाहेर राहण्यापेक्षा मी माझ्या लोकांना कारभाराचा अनुभव घेऊ दिला: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना सत्तेत का सहभागी झाली यावर प्रतिक्रया दिली आहे. तसेच त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे. भाजपवर कुरघोडी करण्याची एकही संधी शिवसेना मागील ४ वर्षांपासून सोडलेली नाही तरी शिवसेना सत्तेत सामील का झाली आहे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी त्याने दिले प्राण
अन् त्याने मारली गोदावरीत उडी – मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे सुरू असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने अचानक पुलाचा कठडा ओलांडून पाण्यात उडी घेतली.
7 वर्षांपूर्वी -
परभणीत मराठा आंदोलन चिघळलं, ६ बसेस आणि पोलीस व्हॅन सुद्धा जाळल्या
मागील २ वर्षापूर्वी शांततेत पार पडलेले मराठा समाजाचे मोर्चे आता हिंसक वळण घेऊ लागले आहेत. मराठा समाजाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी गंगाखेडमध्ये ४ खासगी गाड्या, ५ बसेस आणि पोलिसांची व्हॅन जाळली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच निर्णय घोषित करते वेळी पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या या निर्णयाची आता खिल्ली उडवली जाऊ लागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाचा ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद, तर केस व नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका: नितेश राणे
समस्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजे क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधित मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूर येथे पार पडली असता हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी