महत्वाच्या बातम्या
-
तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, प्रत्येक बूथ प्रमुखाला २३ सूत्री कानमंत्र: अमित शाह
महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजप पक्ष विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान अमित शहा यांनी कोणताही सार्वजनिक भाषण न करता पदाधिकाऱ्यांशी वन टू वन असा थेट संवाद साधला.
7 वर्षांपूर्वी -
शेणगावच्या जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान
शेणगावच्या अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळाला. पंढरपुरात सकाळी साडेतीनच्या सुमारास ही विठूरायाची ही शासकीय पूजा पार पडली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाला १६ टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल याची खात्री काय? पुढे काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज ते जालना येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी राज्य तसेच देशपातळीवरील अनेक विषयांना हात घालत त्यावर दिलखुलास उत्तर दिली.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचा पंढरपुरात आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय
मराठा समाजाच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरवर्षी पंढरपुरात आषाढीची पूजा पार पडत असते आणि कायम चालत आलेली शासकीय प्रथा आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप नगरसेवकाचे २२ वर्षीय विद्यार्थिनीवर लग्नासाठी ५ वर्ष लैंगिक अत्याचार!
यवतमाळ मधील वणी शहरातील २२ वर्षीय विद्यार्थिनीवर भाजप नगरसेवक धीरज दिगंबर पाते वय वर्ष २९ याने मैत्री करून तिच्याशी प्रेम संबंध प्रस्थापित केले. तिच्या वयाचा तसेच अज्ञानाचा गैरफायदा घेत सतत ५ वर्ष लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतर तरुणीचे सर्व खोटे कागदपत्र तयार करून या तरुणीला लग्न करण्यासाठी भाजप नगरसेवक धीरज दिगंबर सतत ब्लॅकमेल करत होता.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे मंत्री व आमदार सध्या संभ्रामवस्थेत असून काय करावं हे त्यांना सुचत नाही: अजित पवार
मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं असता उपस्थितांना संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. तसेच लोकसभेत अविश्वास प्रस्तावावेळी रंगलेल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा त्यांनी नेमकं बोट ठेवलं.
7 वर्षांपूर्वी -
ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत मोठं बंड होण्याची शक्यता
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले ठाणे महानगर पालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वादाचे कारण पुढे करत भोईर कुटुंबातील चारही नगरसेवक पक्षावर प्रचंड नाराज असल्याचे समजते. तसेच या निमित्ताने थेट एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध ठाण्यात राजकीय बंड केलं जाऊ शकत अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्यभर माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलनं सुरु आहेत, ती आंदोलनं लोकांसाठी आहेत: राज ठाकरे
काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारची जनहिताची आंदोलन करून महाराष्ट्र हादरवून सोडला आहे. त्यापैकी एक महत्वाचं आंदोलन म्हणजे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांनी सरकारला जाग आणण्यासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या जनहिताच्या आंदोलनाचा आणि कार्यकत्यांचा मला अभिमान असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरून ही भावना व्यक्त केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसेच्या अजून एका पाठपुराव्याला यश, सॅनिटरी नॅपकिन्स करमुक्त झाल्याने स्त्रीवर्गाला फायदा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी कौन्सिलने सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतल्याने समस्त स्त्री वर्गाला त्याचा फायदा होणार आहे. शालिनी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री मुनगंटीवार आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन या करमुक्तीची लेखी सूचना आणि विनंती केली होती, ज्याला आज यश मिळालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोलापूरमध्ये संतप्त मराठा क्रांती मोर्चाचा चक्काजाम, एसटी बसेस सुद्धा फोडल्या
मराठा क्रांती मोर्चाच आंदोलन हळूहळू राज्यभर पेट घेण्याची चिन्ह आहेत. पंढरपूर नंतर आता सोलापुर शहरात मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या जमावाने दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना व उद्योगपतींना मोठ्या मनाने मिठ्या मारल्या: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलिंगन दिल्याच्या विषयाला अनुसरून ट्विटर द्वारे प्रतिक्रिया नोंदवली आहे. कारण त्या आलिंगनानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर होकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया सर्वच थरातून नोंदवल्या जात आहेत. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आलिंगन दिल खरं, परंतु मोदींनी उभं राहण्याची तसदी घेतलेली पाहायला मिळाली नाही.
7 वर्षांपूर्वी -
सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर दूध आंदोलन मागे घेत आहोत: राजू शेट्टी
मागील चार दिवसांपासून सुरु असलेले दूध आंदोलन अखेर मागे घेण्याचा निर्णय राजू शेट्टी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राजू शेट्टी ही अधिकृत घोषणा केली आणि अखेर सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.
7 वर्षांपूर्वी -
संयम संपतोय - मराठा मोर्चा तिसरा डोळा उघडणार?
संयम संपतोय – मराठा मोर्चा तिसरा डोळा उघडणार?
7 वर्षांपूर्वी -
राज्याच्या अस्मितेसाठी टीडीपी'चा मोदी सरकारविरोधात 'अविश्वास' ठराव, तर शिवसेनेचा 'विश्वास'
देशभरातील विरोधक मोदी सरकार विरोधक अविश्वास ठरावा दरम्यान एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले असताना शिवसेनेचा भाजपला विरोध हा केवळ कागदावरच असल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे. कारण शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असून विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहाव म्ह्णून पक्षाने विशेष काळजी घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमधील कचराकोंडीने नाशिकमधील मनसेच्या काळातील कचरा व्यवस्थापनाच महत्व अधोरेखित झालं?
परंतु औरंगाबाद महापालिकेतील कचराकोंडीने आणि वाईट अनुभवातून, नाशिक महापालिकेत मनसेच्या सत्ताकाळात झालेलं कचरा व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनाचं शहराच्या दृष्टिकोनातून महत्व अधोरेखित होत आहे. एकूणच औरंगाबादमधील तब्बल ५ महिण्यापासून झालेल्या कचराकोंडीवर तोडगा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला आणि भाजपला अक्षरशः अपयश आले आहे. अनेक वर्षांपासून केवळ टेंडरशाहीत गुंतलेल्या सत्ताधारी आणि प्रशासनाने औरंगाबाद बकाल केलं असून रोजच जगन सुद्धा तोंडावर रुमाल ठेऊन करावं लागत आहे आणि आता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेला स्वतःची सत्ता असलेली औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची वेळ का आली आहे?
औरंगाबाद महापालिकेत ५ महिन्यापासून कचराकोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. त्यात पावसाळा सुरु झाल्याने साठलेला कचरा कुजल्याने रोगराई आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परंतु अनेक महिन्यापासून हा प्रश्न जटील होत चालल्याने नागरिकांमध्ये सुद्धा रोष वाढत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या संघर्षात जनतेची होरपळ होत असल्याने मुंख्यमंत्र्यांवरील दबाव वाढत आहे.
7 वर्षांपूर्वी -
वादळ पुन्हा येणार? लवकरच मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या दिशेने?
मराठा क्रांती मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा येणार पुन्हा येणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी बुधवारी परळी तहसील कार्यालासमोर ठिय्या आंदोलन केले आणि हेच वादळ लवकरच मुंबईच्या दिशेने येतंय काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
NEET वैद्यकीय शिक्षणात प्रथम राज्यातील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळायला हवं: राज ठाकरे
मराठवाडा दौरा सुरु करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा संबंधित गंभीर विषयाला हात घातला. काही दिवसांपूर्वी NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे पालक राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.
7 वर्षांपूर्वी -
उद्या भाजप सरकार गेल्यावर, त्यांच्या कार्यकर्त्यांना पट्ट्याने मारावे का? राज ठाकरे
मराठवाडा दौरा सुरु करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून त्यामुळे अनेक प्रवाशांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यां आक्रमक पवित्रा घेत झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन छेडलं आहे.
7 वर्षांपूर्वी