महत्वाच्या बातम्या
-
कदमांनी मला पाडण्याचा व संपविण्याचा विडा उचलला होता: अनंत गीते
शिवसेनेतील जुनी खदखद चव्हाट्यावर आली आहे. औरंगाबाद येथे औरंगाबाद शाखेच्या वर्धापन कार्यक्रमात आणि व्यासपीठावर औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आणि महिला अध्यक्ष मनीषा कायंदे उपस्थित असताना केंद्रीय मंत्री वसंत गीते यांनी ही जुनी आठवण करून दिली.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या नजरेतून गळाभेट, भेट आणि मन की बात, पाठीत खंजीर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीची खिल्ली उडविली आहे. मुंबईतील भेटीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच स्वागत करत गळाभेट केली खरी, परंतु ज्याला निवडणूक प्रचारात अफजलखान म्हणून हिणवलं त्याची अखेर गळाभेट झाल्याने, त्यावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक व्यंगचित्र प्रसिद्ध केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
टीडीपीच्या केंद्रातील रिक्त मंत्रिपदांवर सेनेचा डोळा ?
सत्तेत राहून भाजपला विरोध करत राहायचा आणि योग्य वेळ येताच स्वतःची ‘बार्गेनिंग पवार’ वापरून महत्वाची खाती पदरात पाडून घ्यायची रणनीती सध्या सत्ताधारी आपसातच करताना दिसत आहेत. ज्या चंद्रा बाबूंच्या तेलुगू स्वाभिमानाने केंद्रातील मंत्रिपदांना मागचा पुढचा विचार न करता लाथ मारली त्याच रिक्त झालेल्या मंत्रिपदावर दिखाऊ स्वाभिमान दाखविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा डोळा असल्याचे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून समजलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
केवळ मराठीच भावनिक राजकारण, ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही
सध्याची शिवसेना ही पूर्वीची बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. केवळ मराठीच्या नावाने भावनिक राजकारण करायचा पण त्यांच्यासाठी शिवसेनेकडून काही सुद्धा केले जात नाही हे वास्तव आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट शिवसेनेचं नाव घेऊन केली आहे. यांनी मराठी माणसासाठी कधीच काही केलं नाही, त्यामुळे यांच्या कार्यकाळातच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला असं ते टीका करताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर, 'मातोश्री'वरही माहिती?
शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर असून त्याची माहिती ‘मातोश्री’वरही आहे आणि मी स्वतः हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असा धक्कादायक व खात्रीशीर दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवेंनी केला आहे. जालन्यामधील शिवसेनेत खोतकर जे करत आहेत त्याची माहिती मातोश्री वर असल्यानेच खोतकरांना मातोश्रीवर भेटीसाठी ३-४ तास वाट बघावी लागते असं सुद्धा ते म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
एस.एस.सी २०१८: दहावीचा निकाल ८ जूनला
उद्या म्हणजे ८ जूनला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर होणार आहे. तशी अधिकृत घोषणा बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठी उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन: राज ठाकरे
मराठी उद्योजकांनी आक्रमक पने व्यवसाय करणे गरजेचे आहे असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र बिजनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं.
7 वर्षांपूर्वी -
आज नारायण राणे 'मातोश्री'वरील भेटीगाठींवर भाष्य करतील
कालच भाजप आणि सेनेमधील दुरावा दूर करण्यासाठी आणि आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली.
7 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबूंकडे जाण्याचं धाडस नाही झालं, पण मातोश्रीवर आत्मविश्वासाने गेले?
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे जर भाजप नेतृत्वाला खरोखरच जुन्या मित्र पक्षासोबत पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध जोडायचे होते तर तो प्रयत्नं टीडीपी सोबत म्हणजे चंद्राबाबूंना भेटून दुरावा दूर करण्याचा प्रयत्न का नाही झाला, जसा शिवसेनेसोबत अगदी सहज झाला?
7 वर्षांपूर्वी -
युतीतले रुसवे-फुगवे दूर, २०१९ नंतर जनतेचे पुन्हां 'अच्छे दिन' येणार?
काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नियोजित वेळेनुसार सुद्धा ही चर्चा खूप लांबल्याने सर्व काही मनासारखं आणि सकारात्मक झालं असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
अमित शहांची आगामी निवडणुकीची बकेट लिस्ट - राज ठाकरेंचं व्यंगचित्र
भाजप अध्यक्ष अमित शहा संपर्क फॉर समर्थन अभियानाअंतर्गत सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मार्मिक टीका केली आहे. आणि याचे कॅप्शन आहे “अमित शहांची बकेट लिस्ट”, जे सध्या सोशिअल मीडियावर बरंच व्हायरल होताना दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपच्या राजकारणाने राज ठाकरेंवरचा विश्वास द्विगुणित ?
२०१४ मधील निवडणुकीत भाजप शिवसेनेने प्रचारादरम्यान एकमेकांवर तुफान चिखलफेक केली होती. मागील लोकसभेच्या निवडणूका असोत किंव्हा विधानसभेच्या निवडणुका, या दोन्ही पक्षांची आपसात भांडण करून प्रसार माध्यमांना स्वतःवर केंद्रित करण्याची रणनीती मतदाराला चांगलीच माहित झाली आहे. दोघे सुद्धा एकमेकांच्या पक्ष नैतृत्वाची भर सभेत वाटेल त्या थराला जाऊन उणीधुनी काढायचे आणि सत्तेचे मलई डोळ्यासमोर येताच पुन्हां ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वीणा करमेना’ अशी गत झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
सेलिब्रिटीं संपर्कात, महागाईने होरपळणारा सामान्य 'संपर्क क्षेत्राच्या' बाहेर ?
सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानावर आहेत. अमित शहा आज मुंबईमध्ये प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सुद्धा त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. एकूणच देशभरातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आणि कर्नाटकातील राजकीय कलाटणीने भाजपची झोप उडाल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव प्रकरणी धरपकड सुरू
एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्या सोबत इतर ३ जणांना सुद्धा अटक झाली आहे. सुधीर ढवळे यांना सकाळी ६ च्या सुमारास पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून अटक केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अफजल खान व उंदीर यांची उद्या गळाभेट : काँग्रेस
आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना अनेक वेळा चिखलफ़ेक आणि बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीवर कॉग्रेसने ट्विटरवरून उपहासात्मक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंच पाशा पटेल व प्रकाश आंबेडकरांना चोख प्रतिउत्तर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धी मिळत नाही अशा तिखट शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर आणि पाशा पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वतः शरद पवार निरंजन डावखरेंविरोधात आक्रमक
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार स्वतः निरंजन डावखरेंविरोधात मैदानात उतरले आहेत. निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र आहे. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत निरंजन डावखरेंना धडा शिकवायचाच असा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सर्व विरोधकांना एकत्र आणण्यास आवडेल: शरद पवार
देशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला १० जागांपैकी तब्बल ९ जागांवर पराभव झाल्याने २०१९ मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यास मला आवडेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
युवासेनेची नाराजी भोवली, डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीवर युवासेनेतून आवाज बुलंद होण्याआधीच घडामोडींना वेग आला होता. अखेर शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कार्यशैलीवर अनेक युवा सैनिक नाराज होते तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील यश संपादन केल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
7 वर्षांपूर्वी -
मराठी नाट्यसंमेलन, उद्घाटन राज ठाकरे करतील आणि समारोप उद्धव ठाकरे
१३ जूनला ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. कालच नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर या निवासस्थानी भेट घेऊन तसं निमंत्रण सुद्धा दिल आहे.
7 वर्षांपूर्वी