महत्वाच्या बातम्या
-
कोकणात रिफायनरीला विरोध वाढला, राजापुरात मोर्चा व सरकारविरोधी घोषणा
कोकणात रिफायनरीला विरोध वाढला, राजापुरात मोर्चा व सरकारविरोधी घोषणा
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र HSC २०१८: बारावीच्या निकालात मुलींची बाजी
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी २०१८ चा निकाल एकूण ८८.४१ टक्के लागला आहे. एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अजित पवारांची बापटांवर टीका
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मंत्र्यांवर सडकून टीका केली. हे असले मंत्री या वयात काय बोलावे ते कळत नाही अशा आमदाराला येथून निवडून दिले आहे. हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर कसबा विधानसभा मतदारसंघातीळ राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त, मनसेकडून पेट्रोल ४ रुपयांनी स्वस्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. मुंबईतल्या एकूण ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पालघर निवडणूक, एका रात्रीत ६.७२% मतं वाढली? शिवसेना
पालघर पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर १२ तासात तब्बल ८२,००० मतं वाढली कशी असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केला आहे. एकुण मतांमध्ये पालघर पोटनिवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत ६.७२ टक्के इतकी मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप आज शिवसेनेच्या सामना मुखपत्रातुन करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा १ जूनला पुन्हा एल्गार, आंदोलनाची हाक
शेतकऱ्यांचा ज्वलंत मागण्यांसाठी राज्याभर पुन्हां एल्गार, येत्या १ जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या ४ वर्ष पूर्तीवर तिचे काही प्रश्न - समाज माध्यमांवर व्हायरल
मोदी सरकारच्या ४ वर्ष पूर्तीवर तिचे काही प्रश्न – समाज माध्यमांवर व्हायरल
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना
भाजपची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेसोबत युती असून ही युती राहिली पाहिजे असं केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केलं. आमच्यातील युतीच म्हणजे “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना” अशी परिस्थिती येते असं सुद्धा नितीन गडकरी म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंचे तावडेंना आव्हान, मी काय खोटे बोलले ते सांगा?
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागे आरोप केला होता की, राज्यातील शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात आहेत. त्यालाच अनुसरून खासदार सुप्रिया सुळेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आव्हान दिल की,’शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे’.
7 वर्षांपूर्वी -
वणी पालिका भाजपकडे, लोकांची तहान भागवते राज ठाकरेंची मनसे
वणी शहराची एक हाती सत्ता भाजपकडे असताना सुद्धा इथे स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. सत्ताधारी केवळ टँकर माफियांना पोसण्यातच मग्न असून त्याची शहरवासीयांच्या मूळ समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. मे महिन्यामुळे उन्हाची झालं सर्वच घरात पोहोचली असून प्राण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. परंतु इथल्या स्थानिकांची रोजची तहान भागविण्याची जवाबदारी मनसेचे राजू उंबरकर आणि पदाधिकारी नित्याने पेलत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मी अजून एक तटकरेंच्या घराण्यातील उमेदवार शोधतोय: भास्कर जाधव
सध्या विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक लागत आहे. त्यामुळे मी अजून एक तटकरेंच्या घराण्यातील उमेदवार शोधतोय अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंवर केली आहे. तसेच ही कोकणातील राष्ट्रवादीमधील धुसपूस लवकरच चव्हाट्यावर येण्याची चिन्हं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घ्या, इव्हीएमसोबत छेडछाड: प्रफुल्ल पटेल
इव्हीएमवर आम्हाला भरवसा नाही, कारण या इव्हीएम मशिन्स सुरतवरून आणल्याने त्या व्यवस्थित आहेत की नाही याबाबतच आम्हाला शंका आहे. जगभरातील अनेक देशांनी विशेष करून युरोपिअन देशांमध्ये संबंधित निवडणूक आयोगाने इव्हीएमचा वापर सुरु केला होता. परंतु कालांतराने इव्हीएममधील त्रुटी समोर आल्या आणि त्यांनी पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरु केला होता असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
शाळेच्या उदघाटनाचा मान राज ठाकरेंनी लहानग्या विद्यार्थ्यांना दिला
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा तो उत्साह पाहून राज ठाकरेंनी त्या जिल्हा परिषदेच्या पूर्वप्राथमिक शाळेच्या इमारतीचं उदघाट्न त्या विद्यार्थ्यांच्या हातून करून घेतलं. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रचंड आनंद झाला.
7 वर्षांपूर्वी -
पालघर, भंडारा-गोंदिया निवडणुक मतदान, व्हीव्हीपॅट मशीन गुजरातमधून
आज पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. संपूर्ण निवडणूक यंत्रणा सुसज्ज झाली असून या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. हे व्हीव्हीपॅट मशीन गुजरातमधील सुरत व बडोदा येथून आणण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही
शिवसेनेतील संजय राऊतांसारख्या व्यक्तीला भाजपने कधीही महत्त्व दिलेले नाही. त्यांना केवळ प्रसार माध्यमांनी मोठे केलं. पण आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला ४ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी भाजपासंदर्भात केलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिल.
7 वर्षांपूर्वी -
राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, म्हणून शिवसैनिकाचं आंदोलन
शाम मारोती गायकवाड या शिवसैनिक कार्यकर्त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं म्हणून चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा दिल्या. या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी भावनिक मागणी या तरुणाकडून करण्यात आली आहे. तासा भराने जेंव्हा त्याला अग्निक्षमण दलाच्या जवानांनी खाली उतरवले तेंव्हा त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी पत्रकेही त्या ठिकाणी वाटली आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! नाहीतर कोकणी माणूस कुणाचंही ऐकत नाही: शरद पवार
सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आधुनिक आणि भव्य हॉस्पिटलचे उद्धाटन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाणार प्रकल्पाला होणाऱ्या विरोधावरून मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष पणे सूचक इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बांदेकर! सिद्धिविनायकाचे अध्यक्ष असेपर्यंत तरी खरं दाखव: मुख्यमंत्री
सध्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेत एकमेकांवर जोरदार चिखलफेक होताना दिसत आहे. कालच प्रचारादरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ टेप भर सभेत ऐकवली. परंतु त्याच ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते आदेश बांदेकरांनी वाचून दाखवलं होतं.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे दौऱ्या दरम्यान कोंकण वासियांना संबोधित करताना
राज ठाकरे सध्या कोंकण दौऱ्यावर असून, दौऱ्यादरम्यान त्यांनी कोंकण वासियांना संबोधित करताना सावध राहण्याचा इशारा दिला. तसेच आपल्याकडे लोक आणि कार्यकर्ते जास्त आहेत तरी आपण सत्तेत नाही अशी खंत देखिल व्यक्त केली.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी शाळा इमारतीचा उदघाट्नाचा मान विद्यार्थ्यांना दिला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोंकण दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्या त्याच्या आणि स्थानिकांच्या समस्या समजून घेत आहेत. त्यावेळी पक्षाने केलेल्या कामाचे लोकार्पण सुद्धा त्यांच्या हस्ते केलं जात आहे. परंतु अशाच एका लोकार्पण सोहळ्यात वेगळाच अनुभव पाहावयास मिळाला.
7 वर्षांपूर्वी