महत्वाच्या बातम्या
-
उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची चौकशी व पाहणी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला भेट देणार आहेत. दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफांवर आरोप केल्यानंतर सध्या सोमय्या चर्चेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. यातच त्यांचा आता पारनेर दौरा हा विशेष चर्चेचा ठरणार आहे. क्रांती शुगरकडे पैसे नसतानाही ३२ कोटींना हा कारखाना कसा विकत घेतला असा प्रश्न उपस्थित करत सहकारी बँकेने कारखाना विक्रीची प्रक्रिया संशयास्पदरित्या राबवली असल्याचा आक्षेप बचाव समितीचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
NCRB २०२० च्या आकडेवारीनुसार फडणवीस सरकार हे राज्यातील महिलांसाठी कर्दनकाळ ठरले - सचिन सावंत
महिला अत्याचारांमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे आत्ताच घोषित झालेल्या NCRB २०२० च्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. तर मविआ सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपाच्या राज्यांतील महिला अत्याचारांवरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला तेथील महिलांचीही काळजी असल्याने अनुमोदन आहे. महिला विरोधी भाजपानेही या मागणीला पाठिंबा द्यावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे व फडणवीस सरकार हे महाराष्ट्रातील महिलांसाठी कर्दनकाळ ठरले होते याची आठवण करून दिली.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईतील भाजप आमदारांमध्ये वाद टोकाला | आ. मंदा म्हात्रेंचा थेट गणेश नाईकांच्या मतदारसंघात शिरकाव करण्याचा इशारा
नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांचं वाद पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे आणि त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांच्या संघर्षाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. कारण मंदा म्हात्रे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन, ऐरोली विधानसभेत आमदार असलेले गणेश नाईक मतदार संघातील कामे करत नाहीत, असा हल्लाबोल केला. थेट पत्रकार परिषद घेऊन हा आरोप मंदा म्हात्रे यांनी केल्याने आता गणेश नाईक काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या दत्तक नाशिकच्या पोकळ विकासावर भाजप आमदार संतापल्या | निकृष्ट दर्जाच्या, खड्डेयुक्त रस्ते कामात कंत्राटदाराच्या फायद्याचा आरोप
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होत आहेत. त्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी करत आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील नाशिकमध्ये पक्ष बांधणीच्या कामात व्यस्त आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महिलांचा अपमान आणि ‘मुका’ घेण्याचं वक्तव्य | प्रवीण दरेकर यांच्याविरोधात कलम 501 नुसार तक्रार दाखल
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकर यांच्या विरोधात कलम 501 नुसार तक्रार दाखल केली आहे. प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं म्हटलं होतं. त्यावरुनच महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात तक्रार केली.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांची लायकी सव्वा रुपयाची, कोट्यवधीची नाही | सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार - संजय राऊत
भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेनेच्या नेत्यांवर विविध आरोप करत आहेत. यामुळे राज्यातील वातावरण हे तापलेले दिसत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये देखील शाब्दीत युद्ध सुरू आहे. दरम्यान शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. याला पाटलांनी उत्तर देत राऊतांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी पीएमसी घोटाळ्यासंदर्भात राऊतांवर आरोप केले होते. आता या आरोपांना संजय राऊतांनी उत्तर देत अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
खुलासा करण्याच्या बहाण्याने राज्यपालांनी OBC आरक्षण अध्यादेश रोखला? | कोश्यारी, भाजप विरुद्ध ठाकरे सरकार वाद पेटणार
ठाकरे सरकारनं ओबीसी आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाला राज्यपालांनी रेड सिग्नल दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानपरिषदेच्या 12 जागांवरील नियुक्तीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्यापही मंजुरी दिलेला नाही.ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला राज्यपालांनी ब्रेक लावत ठाकरे सरकारला काही प्रश्न देखील विचारले आहेत. आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना अध्यादेश कसा? असा प्रश्न भगतसिंह कोश्यारींनी ठाकरे सरकारला विचारला असल्याची माहिती पुढे आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खाडीत कार कोसळून अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि प्रियकर शुभम देगडेचा मृत्यू
कॅलनगुट येथील खाडीत कार कोसळून पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व शुभम देडगे या प्रेमिकांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पार्टी करून परतत असताना हा अपघात घडला. भरतीच्या वेळी खाडीत पाणी असल्याने दोघांचाही अपघातानंतर बुडून मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | भाजप नेते किरीट सोमैय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमैया यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून अनिल परब आता सोमैया यांच्यावरती 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. या प्रकरणी परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमैय्यांना एक बिनशर्त माफी मागण्याची नोटीस पाठवली होती. त्यानुसार सोमैय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिले होते. सोमैया यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता.
4 वर्षांपूर्वी -
महिलांवरील अत्याचार हा साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी चिंतेचा विषय | संसदेचं ४ दिवसाचं अधिवेशन बोलवा - मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला पत्रानेच उत्तर दिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं म्हणत विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली होती. उद्धव ठाकरे यांनी आता पलटवार करत हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, तशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीत जुन्या आणि नव्या चेहेऱ्यांनाही संधी देणार | कार्यकर्ताही महत्वाचा - अजित पवार
लवकरच जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. जसं मागच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही तुमच्या भागातून खासदार देखील निवडून देण्याचा काम केले आहे. तसेच जिल्ह्यातून 10 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 2 आमदार काँग्रेसचे निवडून दिले. आम्ही खासदार-आमदार मंत्री झालो, तरी खाली काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देखील संधी मिळाली पाहिजे. ते आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच महापालिकेच्या निवडणुकीत नव्या चेहेऱ्यांचा आणि जुन्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे’, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनंत गीतेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून महाविकास आघाडीत 'राजकीय तेल' ओतणारी प्रतिक्रिया
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की हे अनैसर्गिक युती आहे, यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Ramdas Kadam Vs Vaibhav Khedekar | कोणत्याही परिस्थितीत वैभव खेडेकरांवर मानहानीचा दावा करणार - रामदास कदम
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या १० वर्षात सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही | मी कशाला सरकार पाडू? - रामदास कदम
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनंत गीतेंचे राष्ट्रवादी संदर्भातील 'ते' वक्तव्य वैफल्याग्रस्तातून | सुनील तटकरेंचे प्रत्यूत्तर
काल शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यांवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैफल्याग्रस्तातून अनंत गीते यांचे वक्तव्या आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेचा स्वाभिमान मागच्या निवडणूनक गळून पडला असून नैराशेतून त्यांचे हे वक्तव्य आले असल्याचेही तटकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
NCRB रिपोर्ट | महिला अत्याचारात भाजपशासित राज्य देशात टॉप 3 मध्ये | तर राज्यपालांचे ठाकरे सरकारला विशेष अधिवेशनसाठी पत्र
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं आहे. इतकंच नाही तर राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेची दखल घेणं, त्यात अधिवेशन बोलावण्याच्या सूचना करणं हे म्हणजे राज्याच्या सक्रीय राजकारणात वाढत्या हस्तक्षेपाचं द्योतक आहे, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय जोर लावूनही ठाकरे सरकार पडत नसल्याने विरोधी पक्षाच्या तोंडास फेस | शिवसेनेचं टीकास्त्र
महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी पक्ष भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे. सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले आहेत. आता शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून याविषयावर भाष्य केले आहे. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अभिजित लिमयेला सोडविण्यासाठी फडणवीसांनी कॉल केला | लखोबा लोखंडेचं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का? - रुपाली चाकणकर
लखोब लोखंडे या फेसबुक पेजवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयात हजर करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले होते.
4 वर्षांपूर्वी -
ED कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? | CBI-ED'च्या कामाला काही दर्जा आहे की नाही? - सुप्रिया सुळे
मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Kirit Somaiya Vs Ajit Pawar | ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार - अजित पवार
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सकाळपासून ठाकरे सरकारच्या नेते-मंत्र्यांच्याविरोधात आरोपांचा धडाका लावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अलिबागमधील 19 बंगल्याची आणि अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करणार अ्सल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी