महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Naukri | ठाणे महानगरपालिकेत 13 पदांची भरती | थेट मुलाखत
ठाणे महानगरपालिका भरती 2021. ठाणे महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 13 MSW, आरोग्य निरीक्षक, CSSD सहाय्यक, फार्मासिस्ट आणि नाभिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार TMC भरती 2021 साठी 27 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित मुलाखतीसाठी येऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
करोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय | उर्जामंत्र्यांच्या विधानानंतर फडणवीसांचं टीकास्त्र
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे. “एकीकीडे करोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याच्या ऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसूली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसूली करायची आहे. म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
दरेकरांनी 24 तासात माफी मागितली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे वंगण फासणार | सक्षणा सलगर यांचा इशारा
भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांनी माफी मागावी अशी मागणी केलीय.
4 वर्षांपूर्वी -
महिलेला विनयभंग केल्याची खोटी तक्रार द्यायला लावत शिवसेना नगरसेवकाकडे खंडणीची मागणी | २ पत्रकारांना अटक
महिलेला विनयभंग केल्याची तक्रार द्यायला लावून शिवसेनेच्या नागरसेवकाकडे बदनाम करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी माजी उपसरपंच, पत्रकारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पत्रकारासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील कलाकार आहेत | मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार का? - प्रिया बेर्डे
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून संतप्तजनक प्रतिक्रिया येत असताना नुकतंच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या प्रिया बेर्डे यांनीही भाजपवर टीका केली आहे. “भाजपमध्येही अनेक दिग्गज कलाकार आहेत. हेमा मालिनी, स्मृती इराणी, अमृता फडणवीस, मग या सर्व महिलांबद्दलही तुम्ही असचं बोलणार आहात का?” असा संतापजनक सवाल प्रिया बेर्डे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे केंद्राच्याही सूचना आहेत | भातखळकरांचं डोकं फिरलं आहे, त्यांचं डोकं ठिकाणावर नाही - आ. मनीषा कायंदे
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले | ५ जणांचे मृतदेह हाती
वरुड (अमरावती) तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव अलटून एकाच कुटुंबातील एकूण 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिस आणि बचाव कार्य पथक दाखल झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भातखळकरांचं परप्रांतीयांवरून प्रेम उफाळून आलं? | 'या' राज्यात भाजप सरकारने केली होती परप्रांतीयांविरुद्ध मोहीम
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही | गाल सर्वांनाच रंगवता येतात - प्रवीण दरेकर
राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय टीका करण्याच्या नादात दरेकरांकडून महाराष्ट्राच्या लोककलाकारांचा अपमान? | प्रतिक्रियेत संतापजनक शब्दप्रयोग
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भापजमध्ये गेल्या काही दिवसापासून शाब्दीक खडाजंगी सुरु आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पुणेकर या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्याच्या नादात धक्कादायक विधान केलं आहे..
4 वर्षांपूर्वी -
दारूड्या मुलांना मुली पटतात | मला लाईनही देत नाहीत, लै जीव जळतो | कार्यकर्त्याचे आमदाराला पत्र
आमदारांना कोणती कामे सांगावीत याचेही एक तारतम्य असते. पण एका प्रेमवेड्या तरुणाने मुलगी पटत नाही म्हणून चक्क आमदारांना पत्र लिहिले. मुलींनी मुलांना भाव द्यावा यासाठी मुलींना प्रोत्साहन द्यावे, अशी अजब मागणी त्याने या पत्रातून केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एकही मुलगी भाव देत नाही म्हणून भूषण जांबुवंत राठोड याने राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहिले. तो म्हणतो, ‘आपल्याला मुलगी पटून नाही राहिली ही चिंतेची बाब आहे.
4 वर्षांपूर्वी -
दरेकर! महिलांची माफी मागा | अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड रंगवू शकतो - रुपाली चाकणकर
महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लवकरच राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टिपण्णी केली होती. त्यावरुन, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना इशारा दिला आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, ते काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत - नितीन राऊत
काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झालेली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर काँग्रेसकडून सर्वात टोकदार प्रतिक्रिया ठाकरे – पवार सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे
4 वर्षांपूर्वी -
झेडपी व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान | राज्य सरकार व विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
4 वर्षांपूर्वी -
हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळा प्रकरण | चंद्रकांत पाटलांविरोधात लाचलुचपत विभागाकडे FIR दाखल करणार - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या या आरोपांवर पलटवार केला आहे. सोमय्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा करतानाच रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
सोमय्यांना काही माहिती नसावी | चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगेंच्या सांगण्यावर केलं असेल - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ती कागदपत्र IOC वेबसाईटवर उपलब्ध | सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
निलेश राणे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार? | कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढत देणार
कुडाळ मालवण विधासभेत सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे नेतृत्त्व करतात. वैभव नाईक यांनी 2014 मध्ये दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे. कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे. 2014 मध्ये यापैकी 2 जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली होती.
4 वर्षांपूर्वी -
ED, CBI दोन्ही तपास यंत्रणा राज्यभरात ठिकठिकाणी देशमुखांना शोधण्यासाठी छापेमारी करण्याची शक्यता
शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरजर राहिले आहेत. तसेच त्यांचा ठावठिकाणाही लागत नाहीय. यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे.
4 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होतील - विजय वडेट्टीवार
ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात चांगलाच वाद उफाळून आला होता. राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक भुमिकेत आहे. विद्यमान सरकारवर भाजप नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 3 वाजता होणार आहे.
4 वर्षांपूर्वी