महत्वाच्या बातम्या
-
OBC Reservation | मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक | मोठ्या निर्णयाची शक्यता
ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात चांगलाच वाद उफाळून आला होता. राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक भुमिकेत आहे. विद्यमान सरकारवर भाजप नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 3 वाजता होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Updates | IMD कडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं - बाळासाहेब थोरात
काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. पवारांच्या या विधानाशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असहमती दर्शविली आहे. तसेच पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असं खुलं आवतनच बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना दिलं आहे. त्यामुळे थोरात यांच्या या आवतनावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
4 वर्षांपूर्वी -
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करणार
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | मुख्यमंत्री स्तरावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल - जयंत पाटील
राज्यातील ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत आरक्षणाच्या बाबतीत निर्णय़ होईल, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज संस्थेतील ओबीसी आरक्षण कमी होता कामा नये, ही सरकारची भूमिका असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ते सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र MIDC'त 06 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज
MIDC भरती 2021. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र ने 06 विपणन व्यवस्थापक पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे आणि अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 18 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी एमआयडीसी भरती 2021 साठी ईमेलद्वारे त्यांचे अर्ज पाठवू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | निवडणुकीचे पूर्ण अधिकार आयोगाचे | सुप्रीम कोर्टाचा निर्णय | सर्वच राजकीय पक्षांची अडचण
मागील काही दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यात सुप्रीम कोर्टातून नुकत्याच आलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या अडचणी आणि विशेष करून राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला | पुढील 5 दिवस पुण्यालाही ऑरेंज अलर्ट
मागील आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दुसरीकडे मात्र काही भागात झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावणारा ठरला. राज्यात सध्या अनेक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात हलक्या पाऊस कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Soil Health Card Scheme | मृदा आरोग्य कार्ड योजना 2021 | असा करा ऑनलाईन अर्ज? - नक्की वाचा
भारत सरकारच्या वतीने देशातील शेतकर्यांच्या हितासाठी सन 2015 मध्ये मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली गेली. या योजनेंतर्गत देशातील शेतकर्यांना जमिनीच्या माती गुणवत्तेचा अभ्यास करून चांगले पीक घेण्यास मदत केली जाईल. या मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकर्यांना आरोग्य कार्ड दिले जाईल, ज्यामध्ये शेतकर्यांच्या जमिनीच्या मातीच्या प्रकाराविषयी (शेतकर्यांना जमिनीच्या मातीच्या प्रकाराविषयी माहिती दिली जाईल) व मातीची गुणवत्ता याची माहिती दिली जाईल आणि या योजनेच्या आधारे शेतकर्यांना चांगली पिके घेण्यास मदत होईल.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हा परिषद निवडणुकांच्या सोबतच होणार विविध महामंडळांवरच्या नेमणुका | महाविकास आघाडीत 40:40:20 सूत्र
आघाडी सरकारला सत्तेत येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी राज्यातील विविध महामंडळांच्या नेमणुकांना मुहूर्त मिळालेला नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महामंडळाच्या नेमणुका होतील, अशी नवी तारीख मंडळांवर वर्णी लावण्याकडे डोळे लावून बसलेल्या पदाधिकाऱ्यांना दिली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
बंद करून दाखवलं'चं श्रेय घेणार का? | आ. नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा बंद केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना विमा बंद केल्याच्या कारणावरून खोचक पत्र लिहिल आहे. कोविडच्या कठीण प्रसंगांमध्ये या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य अचूक बजावलं. या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली तेव्हा, “करून दाखवलं” अशा घोषणा देण्यात आल्या. मग आता हा विमा बंद केल्यानंतर याचे श्रेय कोण घेणार, असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन करणार - अण्णा हजारे
केंद्रात ज्या पद्धतीने लोकपाल कायदा झाला आहे, त्याच धर्तीवर राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा व्हावा, या मागणीसाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकार विरोधात आंदोलनाचा बिगुल दिला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्यासाठी सशक्त आणि स्वायत्त लोकायुक्त गरजेचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजपा कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करत मारहाण
काही दिवसांपूर्वी पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली होती. घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला होता . त्यानंतर भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावरुन संताप व्यक्त करताना म्हटलं होतं की, हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाचा संबंध काय? | राणेंना उंचीवरून काय बोलणार? - मनिषा कायंदे
गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाच संबंध काय? असा सवाल करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. राणेंना उंचीवरून काय बोलणार?, असा टोला मनिषा कायंदे यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस | 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश
सीबीआयची कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी लाच दिल्याचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती योगेश खन्ना यांच्या खंडपीठाने 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळ उद्घाटन | मुख्यमंत्री आले तर स्वागत करू - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आले तर स्वागत करू असा पवित्र घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान केल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी नरमाईचा सूर आळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर स्वागत करू, असं नारायण राणे म्हणाले. राणेंनी अवघ्या तीनच दिवसात पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली | त्यांनीच चोरली-डाका मारला - पटोलेंचा पवारांना टोला
आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो, तसे आजच्या काँग्रेस झाले आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे त्याच वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाने वस्तुस्थिती स्वीकारली तर विरोधकांना एकत्र येण्यासाठी मार्ग मोकळा होईल, अशी सूचनाही त्यांनी करून घेतली आहे. शरद पवार एका ‘वेबपोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
राणेंच्या विविध रिसॉर्टमधील कर्जाच्या आरोपांवर सोमैय्या अधिक माहिती देऊ शकतात | राऊतांच्या टोला
कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि चिरंजीव नितेश राणे यांना लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. केंद्राच्या गृहखात्याच्या सूचनेवरूनच राज्याच्या गृहखात्याने ही कारवाई केली आहे. हवं तर नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी, असा खोचक टोलाही विनायक राऊत यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्यानेच न्यायदेवतेने त्यांना निर्दोष सोडले - गुलाबराव पाटील
छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला.
4 वर्षांपूर्वी -
आरक्षित जागांवर ओबीसी उमेदवार देऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शक्य | ठाकरे-पवार यांच्यात चर्चा
ओबीसींची जातनिहाय आकडेवारी केंद्राकडून मिळणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाकडून इतक्यात जमा करणे शक्य नाही, त्यामुळे ओबीसी उमेदवारांसाठी राखीव जागांवर ओबीसीच उमेदवार देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका वेळेत घेणे हिताचे राहील, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गुरुवारी झाल्याचे समजते आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी