महत्वाच्या बातम्या
-
अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट? | CBI नं दिलं स्पष्टीकरण
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं. यावर आता खुद्द सीबीआयनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचंं - हसन मुश्रीफ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केलाय.
4 वर्षांपूर्वी -
मुलांमुळेच नारायण राणेंचं नुकसान | त्यांची मुलं उठसूट इतरांचे बाप काढतात, तुम्ही काय बिनबापाचे आहात काय?
मुख्यमंत्री ठाकरे यांना धमी देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कायद्यावे कारवाई केली. राणे यांच्यावरील कारवाई म्हणजे घटनाबाह्य असल्याचे तारे भाजप नेते तोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री असोत, त्यांचा जाहीर उपमर्द कोणालाच नाही. राणे हा अपराध वारंवार करती राहिले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा कोणाला गुन्हा वाटत असेल तर ते भारतीय संविधानास कुचकामी ठरवत आहे. असे टीकास्त्र संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र रोखठोकमधून सोडले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सीबीआयच्या अहवालात देशमुखांविरोधात एकही पुरावा सापडला नाही, तरी CBI कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. सीबीआयच्या अहवालात अनिल देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं. त्यानंतरही मग सीबीआयने कुणाच्या इशाऱ्यावर कारवाई केली? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता असलेल्या हरयाणात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज | शरद पवारांचं टीकास्त्र
शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत असताना, आज (शनिवार) हरयाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या लाठीचार्जच्या विरोधात सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे - नारायण राणे
जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेली, असा घणाघात करत केंद्रीय लघू आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. ते कणकवलीत बोलत होते. तसेच एका दिवसात स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे, अशी टीका राष्ट्रवादीवर केली.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीतून फोन करून कोणाच्या कानाखाली मारायची नाही असं सांगितलंय, पण बाकी अवयव आहेत ना - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन करून कोणाच्या कानाखाली नाही मारायचे, असे सांगितले. मात्र, मी कानाच्या खाली मारणार नाही. बाकी अवयव आहेत ना ? कोर्टानेही माझ्याकडून लिहून घेतल्याचे नारायण राणेंनी कार्यक्रमात सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद | ऑटो चालक काढत होता छेड, तरुणीची धावत्या रिक्षातून उडी | आरोपीला अटक
औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीची रिक्षाचालकाडून छेडछाड करण्यात आली. आपला जीव वाचवण्यासाठी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली.
4 वर्षांपूर्वी -
Global Warming | मुंबईतील नरीमन पॉईंट, मंत्रालय परिसर 80% पाण्याखाली जाईल | महापालिका आयुक्तांचा इशारा
पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मुंबई वातावरणीय बदल अॅक्शन प्लॅन योजनेच्या वेबसाईटचं लाँचिंग करण्यात आलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावेळी मुंबईकरांना एक इशारा दिला आहे. वातावरणीय बदलांमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन 2050 पर्यंत मुंबईतील नरिमन पॉईंट, मंत्रालय, दक्षिण मुंबईतील ए, बी. सी आणि डी वार्डमधील 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल, अशी गंभीर भविष्यवाणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कणकवली | नारायण राणेंच्या हाताला रेलिंगचा करंट लागताच त्यांनी इतरांना सावध केले | राणे सुखरूप
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून पुन्हा एकदा आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केलीय. काल रत्नागिरी जिल्ह्यातून राणेंची ही यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली आहे. यावेळी ठिकठिकाणी राणे यांचं ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं जात आहे. कणकवलीमध्येही राणे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, त्यावेळी एक ठिकाणी नारायण राणेंना लाईटचा शॉक लागल्याचं पाहायला मिळालं. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राजनाथ सिंह यांच्यावर सर्वच थरातून जोरदार टीका
छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पुण्यात केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या वक्तव्याचा निषेध करत राजनाथ सिंहांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवारांची रिक्षातून अनोखी सफर
पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असतात. आज तर अजित पावर यांनी चक्क रिक्षाची ट्रायल घेतली. अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सोलापुरातील काँग्रेस भवनावर हल्ला | दगड आणि शाई फेकून हल्लेखोर फरार
सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवनवर आज शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक आणि शाई फेकून नव्या राजकिय वादाला सुरुवात केली आहे. काँग्रेस भवन येथे हल्ला झाला याची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे धावून आले.
4 वर्षांपूर्वी -
भारती पवार, कपिल पाटील, कराडांनीही जनआशीर्वाद यात्रा काढली | पण यात एकच अतिशहाणा निघाला - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे. फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला धक्का | मोदी सरकारकडून कोंकण रेल्वेचे खाजगीकरण ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परवाच 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपक्रमाची घोषणा केली आहे या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशकात मतदारांप्रमाणे इतर पक्षातून दत्तक घेतलेले नेते सुद्धा कंटाळले | सेनेच्या संपर्कात
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण भाजप नेते आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही | त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही - सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चेतील हवाच काढली. मी इतकं इम्पलसिव्ह आयुष्य जगत नाही. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. कोणी काही बोललं तरी मी थोडा वेळ विचार करते, असं सांगतानाच राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोणी वैयक्तिक नाती जपत असेल तर त्यात काही गैर नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
गडकरींचं मंत्रालय निधी देतंय | सूक्ष्म आणि लहान मंत्रालयातून काय निधी मिळणार? | ते पूर्वीचं अवघड खातं
करोना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी करोना त्याच्या नियमावली संदर्भात प्रशासनाला काही सूचना केल्या. यावेळी त्यानी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला. त्यांच्या मंत्रालयाकडून काय निधी मिळणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, मी एकटा काय करु? - अण्णा हजारे
देशातील राजकारणात काही वाद किंवा चर्चा सुरू झाल्यावर सर्वांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची आठवण येत असते. अशा वेळी आता अण्णा हजारे कुठे गेले असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो. तसेच आता अण्णा हजारे हे झोपले आहेत का? अशी विचारणाही केली जाते. आता समाजसेवक अण्णा हजारेंनीच जनतेला हा सवाल केला आहे. ‘जनता हीच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार, GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे - उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी