महत्वाच्या बातम्या
-
नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षिस | विश्व हिंदू सेना अध्यक्ष अरूण पाठक
विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बनारसच्या भेलूपूर भागात राहणाऱ्या अरुण पाठक यांनी फेसबुक आणि ट्विटरवर नारायण राणेंविरोधात अनेक आक्षेपार्ह पोस्टही केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महापालिका निवडणुकांसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना | निवडणूक आयोगाकडून तयारी
राज्यातील १८ महापालिकांची मुदत २०२२ मध्ये संपत आहे. या महापालिकांच्या प्रभाग रचनेची तयारी करण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. याबाबतचे आदेश आयोगाकडून बुधवारी काढण्यात आले. राज्य शासनाच्या निर्णयानुसार एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना आदेश बजाविले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अनिल परब यांच्या विरोधात न्यायालयात जाणार - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोबाडीत मारण्याबाबत वक्तव्य केले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ सुरू झाला. राणे यांच्यावर चार शहरांत गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिक पोलिसांनी तत्काळ राणेंना अटक केली. संतप्त शिवसैनिकांनी महाराष्ट्रातील 17 हून अधिक शहरांमध्ये निदर्शने केली आणि तोडफोड केली.
4 वर्षांपूर्वी -
ज्या माणसाला 'मी राजा आहे' हे दाखवावे लागते तो खरा राजा नसतोच | अमृता फडणवीसांच्या ट्विटवर ट्रोलिंग सुरु
राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे असा वाद सुरू आहे. याच वादात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली. त्यांनी एक ट्विट करून खरा राजा कसा असतो याचा अर्थ सांगितला. ज्या माणसाला मी राजा आहे असे दाखवावे लागते तो खरा राजा नसतोच असे अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे. अर्थातच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांना माथेफिरू आणि केंद्रीय मंत्री यातला फरक कळतो? | राणेंच्या बचावासाठी पवारांसंबंधित अजब उदाहरण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकला. त्यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
4 वर्षांपूर्वी -
सेना भवनजवळच्या राड्यातील भाजप कार्यकर्ते मावळे, तर जुहूच्या राड्यातील शिवसैनिक गुंड? | राष्ट्रपती राजवटीची मागणी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जमीन मिळाल्यावर त्यांचं नक्की मत काय या सगळ्यावर याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून मोठं विधान केलं आहे. या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राणेंचे वाक्य चुकले नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद | काल सहमत नसणारे चंद्रकांतदादा आज पलटले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राज्यातील राजकारण पेटले आहे. मंगळवारी अवघ्या महाराष्ट्रात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत राणेंविरोधात आंदोलने केली. असे असताना नारायण राणेंना अटक करण्यात आली. रात्री उशीरा त्यांना जामीनही देण्यात आला असला तरीही अजुनही शिवसेना-भाजप राज्यात आमने-सामने आल्याचेच चित्र दिसत आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे समर्थन केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई | गजानन काळेंवर 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. पत्नी संजीवनी काळे यांनी गजानन काळेंविरोधात विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस कारवाईवरून जाणीवपूर्वक 'छत्रपती' शब्द प्रयोग करणाऱ्या फडणवीसांना नाशिक पोलीस आयुक्तांचं सुज्ञ प्रतिउत्तर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात पहिला गुन्हा नोंद झाला आणि थेट अटकेचा आदेश निघाला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाशिक पोलीस आयुक्तांना सूचक इशारा देत ते छत्रपती आहेत का? असा सवाल केला. यावर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार यांनी प्रत्युत्तर दिलंय. माजी मुख्यमंत्री खूप सुज्ञान आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे.
4 वर्षांपूर्वी -
राणेंना 2 सप्टेंबरला नाशिक पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार | जन आशीर्वाद यात्रा स्थगित | हायकोर्टात जाणार?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. मुंबई-कोकण, औरंगाबाद, नाशिक, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. राणेंच्या अटकेचे आदेश निघालेल्या नाशिकसह राज्यातील अनेक शहरांमध्ये शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. दरम्यान, राणेंची जनआशीर्वाद यात्रा चिपळूण येथून रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचताच संगमेश्वर तालुक्यात राणे यांना दुपारी साडेतीनच्या दरम्यान ताब्यात घेतले.
4 वर्षांपूर्वी -
राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत चांगलाच राडा घातला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. आमदार नितेश राणे यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी केली.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणूक | शिवसेनेकडून 'नारायण अस्त्र' निकामी | अस्त्र भाजपवरच कोसळलं? - सविस्तर वृत्त
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रोजच्या रोज होणारी जहरी टीका तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून धडा शिकवल्याने शिवसेनेतील मरगळ दूर होणार असून सहा महिन्यांनी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण घडून येईल व त्याचा लाभ पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पोलिस संरक्षण हटवा | नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढण्याची आपली तयारी - आ. संतोष बांगर
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पायाचीही बरोबरी नसलेल्या केंद्रीय राज्यमंत्री राणे यांनी त्यांच्या बद्दल बोलणे चुकीचे आहे. पोलिस संरक्षण बाजूला केल्यास त्यांच्या घरात घसून त्यांचा कोथळा बाहेर काढण्याची आपली तयारी असल्याचे खुले आव्हान कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी ता.२४ रात्री झालेल्या आंदोलनाच्या वेळी दिले.
4 वर्षांपूर्वी -
राणेंना न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर | प्रसाद लाड यांनी राणेंना कोठडीत पाठविल्याचे माध्यमांना सांगितले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाचा अपमान केलेला शिवसैनिकांना चालतो का? बाळासाहेबांनी तरी हे सहन केले असते का? असा प्रश्न विचारत आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे नितेश राणे कणकवलीत बोलताना म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे | अंजली दमानिया यांचा भाजपाला टोला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात शेडको शिवसैनिकांकडून राणे यांचा विविध प्रकारे आंदोलन करून निषेध व्यक्त केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याणमध्ये शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा | शिवसैनिकांनी भाजपचे कार्यालय फोडले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात शेडको शिवसैनिकांकडून राणे यांचा विविध प्रकारे आंदोलन करून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच कल्याण पश्चिम भागातील कल्याण भाजप शहर कार्यलयावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यावेळी काही भाजपचे कार्यकर्ते मध्ये आलेले असता दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मनसेकडून वरुण सरदेसाई लक्ष | 'त्या' व्हिडिओवरून सुनावलं
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमकपणे आंदोलन केले आहे. राज्यभरात राणेंविरोधात संघर्ष पेटला असून त्याचे पडसाद मुंबईतही पाहायला मिळाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे यांनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यात शिवसेनेने थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानं संघर्ष आणखी वाढला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | नारायण राणे जेवत होते, पण पोलिसांनी ना जेवणाचं ताट खेचलं, ना धक्काबुक्की | प्रसाद लाड यांचा माध्यमांकडे बनाव?
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अटक होताच नारायण राणेंची प्रकृती बिघडली | रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी