महत्वाच्या बातम्या
-
OBC Reservation | छगन भुजबळ दिल्लीत ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांची भेट घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सर्वोच्य न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबाबत ते दिग्गजांच्या भेटीगाठी घेत आहेत. भुजबळ आज ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत. सर्वोच्य न्यायालयात उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यासाठी छगन भुजबळ दिल्लीत दाखल होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
'मोदी नामा'ची जादू उतरली | 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या प्रयोगावर ठरेल - शिवसेनेचे टीकास्त्र
2024 चे लक्ष्य वगैरे ठीक आहे, मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील, असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांना दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधी शिवसेनेत अस्वस्थ, मग काँग्रेसमध्ये अस्वस्थ, मग भाजपने सूक्ष्म खाते दिल्याने डोकेही सूक्ष्म झाले - गुलाबराव पाटील
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे म्हणत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले होते.
4 वर्षांपूर्वी -
जनता पाहतेय, योग्य वेळी आशीर्वाद देईल | त्यांना खरंच काम करायचे असे तर लोकांसाठी कोविड लस द्यावी - महापौर
भारतीय जनता पक्षाच्या जन आर्शीवाद यात्रेवरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा ही फसवणुकीची यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष काय करत आहे याची लोक साक्ष देत आहे. ते योग्य वेळी त्यांचा आर्शीवाद देतील, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
साताऱ्यात भाजप खासदार विरुद्ध भाजप आमदार | 'ते' थापांचा पाऊस पाडण्यात माहीर | उदयनराजेंवर जोरदार टीका
मागील साडेचार वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी हा केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे. त्यामुळे पालिकेतील ‘कचरा’ हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय | अजित पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून आम्हाला साथ दिली जात नसल्याचा ठपका यशोमती ठाकूर यांनी यावेळी ठेवला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहेत. अजित पवार सहकार्य करत नाही असे जरी बालविकास मत्र्यांनी म्हटले असले तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये असे आवाहन सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोफत ‘मोदी’ एक्स्प्रेस | आ. नितेश राणेंची घोषणा
यंदा गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भारतीय जनता पक्षाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. आमदार नितेश राणेंनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. खास बात म्हणजे हा प्रवास मोफत असला तरी त्यासाठी आरक्षण असणं आवश्यक असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरांचा बंगला तोडण्यास सुरुवात
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा मुरूड मधील बंगला तोडण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे. CRZ नियमांचं उल्लंघन करून बांधकाम केल्याचा मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे यासंदर्भात पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
माझी निष्ठा शिवसेनेसोबतच | राणेंच्या खात्याचे निर्णय मोदींच्या संमतीशिवाय मंजूर होत नसावेत - एकनाथ शिंदे
जन आशीर्वाद’ यात्रेनिमित्त वसई येथे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते उरले असून त्यांच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असे सांगितले. तसेच शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच निर्णय घेतील, असे सूचक विधान नारायण राणे यांनी केले. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, “मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहित आहे.
4 वर्षांपूर्वी -
म्हणे मराठी, हिंदू सण साजरे करायचे नाहीत? | पण मनसेकडून नारळी पौर्णिमा साजरी
करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रविवारी लॉकडाऊन असतानादेखील दादरमध्ये नारळी पौर्णिमेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नियमानुसार सध्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना जमण्यास बंदी आहे. पण तरीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळी पौर्णिमा साजरी करणारच असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि मनसे असा सामना आज पाहायला मिळेल.
4 वर्षांपूर्वी -
ITI Students | आयटीआय विद्यार्थ्यांना आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षणासहित रोजगाराच्या संधी - नवाब मलिक
कोरोना संकटामुळे रोजीरोटीवर गदा आली असताना राज्य सरकारने मात्र आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षणासहित रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. असे मलिक यांनी सांगितले. मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत आयटीसी हॉटेल सोबत काल (शनिवार) राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुलुंड आयटीआय संस्थेच्याअंतर्गत डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच संगणक कार्यशाळेचे (आयटी लॅब) मंत्री मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
राणेंची जन संपर्क यात्रा | संपूर्ण मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजप नेते नारायण राणे येताच संपर्का बाहेर
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेकडे आज मीरा भाईंदर भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे पाठ फिरवली. परंतु मराठा समाजाने मात्र काशीमीरा नाक्यावर राणे यांचे आपुलकीने स्वागत करून त्यांचा सत्कार केला. भाजपचे खासदार नारायण राणे यांची केंद्रीय उद्योगमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर, राज्यातील इतर केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच राणे यांनीसुद्धा पक्षादेशाप्रमाणे जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तक्रार अर्ज महिलेचा नाही, महिलेच्या नावाचा वापर, स्वाक्षरी सुद्धा खोटी | षडयंत्र रचलं कोणी?
संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांबद्दल कळलं नाही का? - हसन मुश्रीफ
राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला, असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे. शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा तुम्हाला पवारांबद्दल कळलं नाही का?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडणार - जगदीश खांडेकर
महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार असल्याचे वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. या टीकेवर मनसेनेही प्रत्युत्तर दिले. मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट धमकीच दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे न्यायालयाने गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला | अटक अटळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झालीय.
4 वर्षांपूर्वी -
ऑडिओ क्लिप व्हायरल पूर्वी 6 ऑगस्टला विभागीय आयुक्तांना कसुरी अहवाल | सरकारी कामात अनियमितता ठपका, कारवाईची शिफारस झाल्याने...
पारनेरच्या लोकप्रतिनिधीवर धक्कादायक आरोप करत आत्महत्येचा इशारा देणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 6 ऑगस्टलाच विभागीय आयुक्तांना एक कसुरी अहवाल पाठवल्याचे उघड झाले आहे. देवरे यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेने नेते एकनाथ शिंदेंच्या संदर्भात नारायण राणेंचा खळबळजनक दावा | काय म्हणाले?
जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, अशा बोलण्यान ते काय खरं होत नाही - सुप्रिया सुळे
हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.
4 वर्षांपूर्वी -
महागाईने जनता त्रस्त | मोदीजी तुम्ही गोंधळाला या हो, निर्मला आक्का तुम्ही या जागराला या हो
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळतंय. तसेच सामान्य लोकांशी निगडित असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस आणि वाढती बेरोजगारी या महत्वाच्या विषयात मोदी सरकार पूर्णपणे नापास झालं आहे. याच विषयावरून आता विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष केलं आहे.
4 वर्षांपूर्वी