महत्वाच्या बातम्या
-
तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! | असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय.. - रोहित पवार
राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला आहे. राज यांच्या या विधानाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या म्हणण्याचं अर्थ आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल | व्यापाऱ्याकडून ९ लाख खंडणी आणि महागडे फोन
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
साधी ग्रामपंचायतही न लढणारा अन बी-ग्रेडमधून हकालपट्टी केलेल्या चाटकरी पोपटाला सल्ला... रुपाली पाटील संतापल्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातींमध्ये द्वेष वाढल्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलाय. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्यपालांकडून चर्चेचं निमंत्रण | वादाचा गुंता सुटणार?
१२ आमदारांच्या निर्णयावरून शिवसेना आणि राज्यपालांमध्ये चांगलंच राजकारण पेटलं आहे. पण हा वाद आता निकाली निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेचं निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजीवनी काळे वडिलांसह कृष्णकुंजवर | तर राज ठाकरे पुण्यात | भेट नेमकी कोणाशी?
घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेण्यासारखे - आ. अमोल मिटकरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातींमध्ये द्वेष वाढल्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलाय. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Bank Job Alert | दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत 100 लिपिक पदांसाठी भरती | पगार २५ हजार
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भरती. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 100 जूनियर लिपिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एडीसीसीबीएल भरती 2021 साठी 04 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी म्हणजे देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड | दानवेंनी विखारी टीका
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज बदनापुरात पोहोचली. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका केलीय. दानवे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड असा केला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता पेटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, दानवे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज या मूळ विचाराने का होत नाही - राज ठाकरे
माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संबंध काय? हे मला एकदा शरद पवार साहेबांनी सांगावं, असं आव्हान देतानाच मी प्रबोधनकारांची सर्व पुस्तके वाचली आहेत. तसेच यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचा संबंध काय? | हे मला पवार साहेबांनी सांगावं - राज ठाकरे
माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संबंध काय? हे मला एकदा शरद पवार साहेबांनी सांगावं, असं आव्हान देतानाच मी प्रबोधनकारांची सर्व पुस्तके वाचली आहेत. तसेच यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
तहसीलदार ज्योती देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप | विभागीय आयुक्तांचा अहवाल | २०२० पासून होत्या वादात... म्हणून बनाव?
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून आपल्या बचावासाठी केविलवाणा प्रयत्न केलाचा पलटवार निलेश लंके यांनी केलाय.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण द्यायचं कुठून? इंदिरा सहानी केसने हात बांधले | 50 टक्क्यांची कॅप बदला - संभाजीराजे
मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांनी बसावं माझ्यासमोर, होऊन जाऊ द्या चर्चा, असं आव्हानच खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये ऑडीओ क्लिप बॉम्ब | तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा | तो लोकप्रतिनिधी?
लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले”, असं हृदयाला बोचणारे शल्य व्यक्त करीत नगर जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने चक्क अकरा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारेच आपली सुसाईड नोट जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला | आता अजित पवारांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोक कधी कधी काही तरी बोलून जातात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं.
4 वर्षांपूर्वी -
वाशीम | किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक | शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप सोमय्यांनी केले होते, याची पाहणी करण्यासाठी ते निघाले होते.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव | आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवणुकीची सेना-राष्ट्रवादीत खलबतं?
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात राज्यातील दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांच्याशी देखील गुलाबराव पाटलांचे फारसे जमत नाही. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी एकत्र भेट घेतली. रुग्णालयातून घरी परतल्यावर खडसेंची ही सदिच्छा भेट असली तरी अनेकांच्या या भेटीने भुवया उंचावल्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
शुद्धीकरणासाठी ब्राह्मण हवा होता | आमच्याकडे भरपूर आहेत, घेऊन गेलो असतो - नारायण राणे
शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. त्यावरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो. शिवसेनेकडे आहेत कुठे? आमच्याकडे मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
ही अतिशय संकुचित मानसिकता | एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार - देवेंद्र फडणवीस
नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. यावरून भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक संतप्त प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी अनेक स्मारकं पाहिली | पण बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पँटवर करून आत गेलो - नारायण राणे
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं. नारायण राणे यांनी आज या प्रकारावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाची अवस्था आधी पाहा.
4 वर्षांपूर्वी -
म्हणून पुढच्या वेळी..चड्डीत राहायचं ! | नितेश राणेंचं शिवसैनिकांना उद्देशून ट्विट
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनयात्रेला काल(२० ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. मात्र या प्रकरणावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. असं असतानाच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी थेट नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी