महत्वाच्या बातम्या
-
तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत? | तुम्ही तर दळीद्री विचाराचे - रुपाली पाटील
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रविण गायकवाड, श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. त्यावर मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाड यांना पुण्यात फिरू देणार नाही असा थेट धमकीवजा इशारा दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | कोर्टाने आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिन्यांच्या कारावास ठोठावला
वरुड येथील तत्कालीन तहसीलदाराला अर्वाच्च शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासासह 45 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षेचा समावेशही करण्यात आला आहे. देवेंद्र भुयार सध्या मोर्शी-वरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमधील पक्षांतर्गत विरोधकांना जे हवं होतं, तेच पंकजांकडून घडलं? | तर त्या भविष्यात....
मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना पक्षांतर्गत अघोषित विरोधाचा सामना करावा लागतोय हे लपून राहिलेलं नाही. त्यांनी अनेकदा तसा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिल्या होत्या. अगदी शिवसेना सारख्या पक्षाने तर त्यांना खुली ऑफर देत शिवसेनेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. अगदी केंद्रीय मंत्री पदी खासदार बहिणीची वर्णी न लागत मराठवाड्यातील दुसरे ओबीसी नेते भागवत कराड यांना संधी दिली हा देखील त्यांना धक्का होता हे देखील सत्य असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
4 वर्षांपूर्वी -
७ पिढ्या लांब राहिल्या, 2024 नंतर विनायक राऊतांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही - निलेश राणे
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही,” असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. त्यानंतर आता निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. “सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही,” असा पलटवार निलेश राणे यांनी केलाय. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
तेव्हा त्यांच्या कुटुंबात असा कुठलाही वाद दिसला नाही | पण पोलीस आपली कारवाई करतील - शर्मिला ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तसेच थेट पत्नीने आरोप केल्याने मनसेची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यात गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर विविध पक्षातील महिला जमा झाल्या आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र ४ दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीएचआर घोटाळा | फरार भाजप आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर
ज्यातील बहुचर्चित बीएचआर अपहार प्रकरणी जळगाव विधान परिषदेचे आ.चंदूलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयाने मंजूर केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी अनेक दिग्गज गोत्यात अडकले आहेत. याच प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर देखील ठेवी मॅनेज केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंना कोणत्याही क्षणी अटक होणार | काय घडामोडी घडल्या?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तसेच थेट पत्नीने आरोप केल्याने मनसेची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यात गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर विविध पक्षातील महिला जमा झाल्या आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र ४ दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्यासाठी पवारांनी या 'तीन' महत्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या
नरेंद्र मोदी सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार दिले. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी ओबीसी आरक्षणावरून पवारांनी भाजपला जोरदार झापतानाच ओबीसींना आरक्षण कसे मिळेल याबाबत मत व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकारचं पत्र गेलंय, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल - शरद पवार
राज्यपालांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सदस्यांनी भेटून १२ आमदारांची यादी दिली आहे. त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात याबाबत अनेकदा विनंती केली आहे. मात्र सरकार आग्रही नाही असे म्हणणे आश्चर्याचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या दीर्घकाळ रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ करा, अशी विनंती काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांकडे केली.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांच्या सर्व मागण्या फेटाळल्या | CRPC'च्या अनुषंगाने याचिका करण्याची सूचना
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला नाही. अनिल देशमुख यांच्या मागण्या कोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता अनिल देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं | त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे - शरद पवार
महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे म्हणले होते.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | गजानन काळे यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | आता महिला संघटना आयुक्तांकडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तसेच थेट पत्नीने आरोप केल्याने मनसेची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यात गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर विविध पक्षातील महिला जमा झाल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पुणे महानगर परिवार महामंडळ लि. मध्ये 395 जागांसाठी भरती | त्वरा करा
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड भरती. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 395 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार पीएमपीएमएल भारतीसाठी 31 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी योग्य माध्यमांद्वारे अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच | यात्रेमुळे महाविकास आघाडीला टक्कर वगैरे काही मिळणार नाही - विनायक राऊत
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनआशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. भाजपने तो चोरला आहे, असं सांगतानाच नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाच विनायक राऊत यांनी चढवला.
4 वर्षांपूर्वी -
मी प्रविण गायकवाड, असं सांगत होतास | पण लायकीत राहायचं, नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू - वसंत मोरे संतापले
महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे म्हणले होते.
4 वर्षांपूर्वी -
बीडमध्ये जनआशीर्वाद यात्रा वादात | अंगार-भंगार घोषणा काय देताय? | पंकजा समर्थकांवरच संतापल्या
भाजपकडून आजपासून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपने काढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मिशन महाराष्ट्र | भाजपच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला आजपासून सुरुवात | मुंबई-कोंकण ते मराठवाडा
भाजपकडून आजपासून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपने काढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि कुडाळमध्ये पराभूत झालेल्या नारायण राणेंवर मुंबई महापालिका निवडणुकीची जवाबदारी? | भाजपचं मिशन 114
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन पोहोचल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाकडे कोणताही चेहरा नसल्याचं पाहायला मिळतंय. कारण गुजराती, मारवाडी आणि जैन या पारंपरिक मतदारांपलीकडे मुंबईतील शिवसेनेचा मतदार असलेल्या मराठी, भंडारी ते मालवणी मतदारांपुढे कोणता चेहराच नाही हे स्पष्ट झालं आहे. तसेच फडणवीसांना मुंबईत तास कोणीही चाहता वर्ग नाही. तसेच मुंबईतील भाजपचे बरेच विद्यमान आमदार हे मोदी लाटेवर निवडून आले आहेत आणि ते देखील ट्विटरवर वारंवार ट्विट करत स्वतःच्या बातम्या कशा झळकतील यावर केंद्रित असल्याने जमिनीवर त्यांची कोणतीही ओळख झालेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
Rain Updates | पाऊस पुन्हा सक्रिय होतोय | हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना अॅलर्ट
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल याची माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील घाट प्रदेश, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्रतवण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकार आग्रही नाही ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे | रोहित पवारांचा टोला

4 वर्षांपूर्वी