महत्वाच्या बातम्या
-
भाजपकडून OBC आ. संजय कुंटेंना पुढे करून पंकजा मुंडेंच्या राजकारणाला धक्का देण्याची खेळी? - सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्लीत असून महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीवर सध्या खलबते सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले जळगाव-जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत. ते मूळचे बुलडाण्यातील आहेत. काही वर्षांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Bank Job Alert | पुणे जिल्हा बँकेत 356 क्लार्क पदांसाठी भरती | असा ऑनलाईन अर्ज करा
पुणे जिल्ह्यातील अग्रणी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्याकडून बँकेसाठी लेखनिक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 356 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना 16 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करतायेणार आहेत. सरळसेवा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया होणार आहे. (PDCC Bank Recruitment 2021 Free Job Alert)
4 वर्षांपूर्वी -
राज्यात मोहरमसंदर्भात मार्गदर्शक सूचना | मिरवणुका काढण्यास परवानगी नाही
मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिल्डरांनी रखडवलेले SRA प्रकल्प ताब्यात घेणार - जितेंद्र आव्हाड
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे. आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असून एसआरए स्वत: लोकांना घरं बांधून देणार आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएतील घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा माझी बहीण, अन्याय झाल्यास मला सांगावं मग बघू | जाणकरांचा पंकजा मुंडे विरोधकांना इशारा
राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत | राज्यात 200 विधानसभांमध्ये रॅली काढणार - महादेव जाणकर
राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर केंद्राचा विचार सुरू | लोकसभेत माहिती, समितीचीही स्थापना
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत दिली. एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मेघवाल यांनी संसदेत ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदाराची पदाधिकारी मेळाव्यात थेट राष्ट्रवादीला बुडवण्याची भाषा | वाद अजुन पेटणार?
महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं आमदार-मंत्री, पक्षातील नेते मंडळी दाखवतात. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चित्र वेगळं आहे. कारण परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या एका स्फोटक व्हिडीओ क्लिपने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष अधोरेकित झालाय. एका मेळाव्यात खासदार संजय जाधव बोलत असताना ते राष्ट्रवादीवर असे काही घसरले की त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बाप काढला. एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बुडविण्याची भाषा केली.
4 वर्षांपूर्वी -
लोकल रेल्वे प्रवास | राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्रं दिलं होतं | आज मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार
मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री आठ वाजता सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आज (दि ९) कोरोना राज्य कृती दलाची बैठक बोलावली आहे. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तेथील निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रार्थनास्थळे, हाॅटेल आणि माॅल्स उघडण्यास काही अटींवर परवानगी देण्यात येईल. तसेच सामन्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी काही अटींवर मान्यता दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी अमित शहांची दिल्लीत बैठक?
विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोघेही दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे जयकुमार रावळ निरंजन डावखरे हे देखील दिल्लीत आज उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षात नेमकी काय खलबतं सुरू आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सदिच्छा भेटीआडून भाजप मनसे पदाधिकाऱ्यांना गळाला लावणार? | भाजप आमदार मनसे शाखेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भारतीय जनता पक्ष करणार नसल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. काही दिवस अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना चांगलाच उधाण आलं होतं. जिथे भाजप मनसे युतीची चर्चा आहे तिथे या दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राम शिंदे समर्थक ढोकरीकर आ. रोहित पवारांच्या गटात | नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी धक्का
भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनी पदत्याग केला आहे. ढोकरीकर सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहताना दिसतात. राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची पंतप्रधानांना विनंती केली आहे | पण केंद्राची भूमिका अस्पष्ट - मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री आठ वाजता सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आज (दि ९) कोरोना राज्य कृती दलाची बैठक बोलावली आहे. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तेथील निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रार्थनास्थळे, हाॅटेल आणि माॅल्स उघडण्यास काही अटींवर परवानगी देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र आरोग्य विभागात 2725 पदांची भरती | १०वी पास ते पदवीधर | ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि गट सी श्रेणीच्या 2725 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. आरोग्य विभाग भारती 2021 साठी पात्र आणि इच्छुक अर्जदार 06 ते 20 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
१५ ऑगस्टपासून २ डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा | ऑनलाईन-ऑफलाईन पास मिळणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला थोड्यावेळापूर्वीच संबोधित केलं. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणूक २०२२ | डिसेंबरमध्ये राहुल गांधी यांची शिवतीर्थावर सभा
काँग्रेस पक्षाची सभा डिसेंबरला शिवाजी पार्क मध्ये होणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होत आहे. डिंसेबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे येत्या 28 डिसेंबरला कॉंग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली वारी | संजय राऊत-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला आहे. शिवसेना युपीएचा भाग नाही. मात्र, दिल्लीत राहुल गांधी आणि राऊत यांच्यात जवळकी वाढलेल्याचे चित्र दिसून आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नको असलेल्या Emails पासून मिळवा सुटक असे' करा ब्लॉक | स्टेप्स फॉलो करा
Google ची मेल सेवा Gmail आपल्यापैकी प्रत्येक जण वापरतोच . बहुतेकदा हे प्रथम Android फोनमध्ये स्थापित केले जाते, त्यानंतरच सर्व काम पूर्ण होते. त्याचबरोबर ऑफिस पासून ते इतर कामाच्या ठिकाणी जीमेलचा सर्वाधिक वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला जीमेलच्या काही महत्त्वाच्या फीचर्सविषयी सांगणार आहोत. जे तुमच्या खूप उपयोगी येतील. यात जीमेल पासवर्ड कसा बदलायचा, मेल कसे शेड्यूल करायचे. इतकेच नाही तर, जर कोणी तुम्हाला अनावश्यकपणे मेल करत असेल तर त्याला कसे ब्लॉक कसे करायचे यांचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा | कोरोना निर्बंधात मोठे बदल
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो - नारायण राणे
राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपूर्वी भेटले होते आणि त्यानंतर राऊत आणि गांधी यांच्या फोटोची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्ष रसातळाला जातो, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी