महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार
राज्यातील 25 जिल्हातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी आता होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसी राजकीय आरक्षण | आम्ही आघाडी सरकारला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देतोय अन्यथा...काय म्हणाले बावनकुळे?
भारतीय जनता पक्ष अपेक्षेप्रमाणे आता जातीय मुद्यांवर लक्ष केंद्रित करू लागल्याचं समोर येतंय. मराठा आरक्षणावरून १०२’वी घटना दुरुस्ती करून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेवून गुंता वाढवला आहे. तर दुसरीकडे राजकीय ओबीसींच्या आरक्षणावरून केवळ ‘ओबीसी आरक्षण’ हा शद्बप्रयोग करून संभ्रम वाढवत असल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या करतंय - आ. नितेश राणे
महाराष्ट्रात हिंदू सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या परिपत्रकावरील तारीख फक्त बदलली. निर्बंध तेच असून हा हिंदूंवर अन्याय आहे, असं सांगतानाच ममता बॅनर्जी यांनी जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण केली. तिच परिस्थिती ठाकरे सरकारला राज्यात घडवायची आहे, असा घणाघाती हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी चढवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात दाखल | प्रकृती स्थिर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दर, महागाई, बेरोजगारी मुद्द्यांवर निवडणुका कठीण | भाजप राज्यात आखतंय फक्त 'जात' युद्ध? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दिल्लीत महत्वाची बैठक | कारण गुलदस्त्यात
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा सुरु होणार | काय आहे तारीख?
तब्बल दीड वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा हालचालींना वेग आला आहे. १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल - देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील-राज यांची भेट निष्फळ ठरलीय का? असा सवाल केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | चक्क 'नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद' | नेमका विषय काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मीडियासमोर यायला घाबरतात अशी टीका मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून केली जाते. असं असतानाच आज मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पत्रकार परिषदेतील फोटो पोस्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलेल्या या फोटोची सध्या समाज माध्यमांवर चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप चंद्रकांतदादांना पदावरून हटवणार? | भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीवर फडणवीसांनी दिली माहिती
पुढील वर्षी महाराष्ट्रात मुंबईसह इतर अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष तयारीला लागला आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीची देखील चाचपणी केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये देखील बदलांची चर्चा सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात? | आरोपींची कबुली | पोलीस नोटीस पाठवणार
झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात आले असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. तर रांची येथील डीएसपी प्रभात रंजन यांनी याप्रकरणात शुक्रवारी आरोपी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद यांची चौकशी केली. यावेळी या आरोपींनी महाराष्ट्रातील नेत्यांशी आपले संबंध असल्याची कबुली दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता लोकच यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत म्हणतील 'लाव रे तो व्हिडिओ' | वडेट्टीवार यांचा टोला
आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोलेबाजी केली. दोघांच्या भेटीचे व आतापर्यंतचे व्हिडिओ लोकच लावतील, सोशल मीडियावर आता “लाव रे व्हिडिओ” सुरू होईल असे म्हणत राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं हे मोदी-शहांना सांगणार - चंद्रकांत पाटील
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याची चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंजवर भेट घेतली होती आणि त्यानंतर युतीच्या बातम्यांनी पुढं जोर पकडला होता. मात्र आज चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील तरुण नाराज झाले आहेत - हसन मुश्रीफ
मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ‘स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् संजय राऊतांना कसलं आव्हान देताय, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे, नाशिक नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर | पक्ष बांधणीवर जोर
नाशिक आणि पुण्यातील मोर्चेबांधणीनंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवणार आहेत. त्यादृष्टीने मनसेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे लवकरच मराठवाड्यात सभा घेणार आहेत. या बैठकांसाठी तयारील लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापुरात स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय? | मुश्रीफ यांचा चंद्रकांतदादांना टोला
मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. चंद्रकांतदादांच्या चॅलेंजला आज संजय राऊत यांनी जशास तसं प्रत्युत्तर देताना दादांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं. तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?, असं म्हणत त्यांनी दादांवर शाब्दिक वार केला.
4 वर्षांपूर्वी -
अजब! | ५०% आरक्षणाची मर्यादा न हटवता १०२ घटनादुरुस्ती करणाऱ्या मोदींचे मेटेंनी मानले आभार
केंद्र सरकारने केलेला 102 व्या घटनादुरुस्तीतील नवीन बदल ऐतिहासिक आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच देखील आभार मानतो. तसेच आता राज्य सरकारने मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. मात्र, तत्पूर्वी अशोक चव्हाण यांच्याकडून मराठा आरक्षणाची जबाबदारी काढून घ्यावी, ते निष्क्रिय आहेत, अशा शब्दात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केंद्र सरकारचे कौतूक करत अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BDD चाळीच्या पुनर्विकासात BDD चाळीच्या रहिवाश्यांचाच अडथळा? | काय आहे प्रकरण..
बीबीडी चाळीचं पुनर्वसन केलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, वरळी विधानसभेचे आमदार अदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. बीडीडी चाळवासियांना 500 चौरस फुटाचे टू बी एच के घर मिळणार आहे. येत्या 36 महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांना चाव्या दिल्या जातील, अशी घोषणा देखील करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे
मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूर जिल्ह्यातील फेट्री शिवारातील माहुरझरी परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी कॅम्पसमध्ये ईडीचे अधिकारी पोहचले आहे. ही तीच संस्था आहे, ज्याचे अध्यक्ष अनिल देशमुख, पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहे. याशिवाय देशमुख यांच्या महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी ईडी पथकामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे हिंदुत्वाचा अजेंड्यावर तीव्र करणार | त्यांच्या मनात परप्रातीयांच्या प्रती घृणा-द्वेष नाही - चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरेंसोबत नाशिकला अचानक भेट झाली होती. त्यावेळेला त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी घरी यायचं आमंत्रण दिलं होतं. घरी चहा प्यायला बोलावणं ही महाराष्ट्राची संस्कृती, पंरपरा आहे. त्यानंतरच्या आमंत्रणानंतर आज भेटायला आलो. या भेटीत परप्रांतीयांच्या भूमिकाबाबत चर्चा झाली. राज यांनी क्लिप दाखवली. युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसदर्भात चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी