महत्वाच्या बातम्या
-
राजकीय ठोकताळा | केंद्रात मोदी तंत्र, तर राज्यात फडणवीस तंत्र | विरोधक आणि स्वपक्षीयांसाठी सुद्धा घातक? - वाचा सविस्तर
देशातील राजकरणात आज मोठं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यात खरी भर पडली ती २०१४ नंतरच्या देशातील बदलेल्या राजकारणामुळे हे नव्याने सांगायला नको. सत्ता आल्यानंतर समाज माध्यमांच्या साहाय्याने अनेक विरोधकांच्या विरोधात एक क्रूर प्रचार राबवला गेला. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्थकारण देखील घडल्याचं सामोरं आलं आणि अनेक माध्यमांचे लागेबांधे देखील समोर आले. विरोधक म्हणजे या देशाचे शत्रू असाच प्रचार सुरु केला गेला.
4 वर्षांपूर्वी -
काय घाबरू नका, वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू असं वक्तव्य | आता प्रसाद लाड यांच्याकडून सारवासारव
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेबद्दल केलेल्या विधानावरून आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त वक्तव्यं प्रसाद लाड यांनी केल्याचं समोर आलं आहे. तर, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचे दिसत आहे. आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने माहीम विधानसभा कार्यलायच्या बाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर | 2019 मध्ये मंदिरात आश्वासन देणारे फडणवीस आता त्याच मंदिरात २०२१ मध्ये प्रकटले | नागरिकांनी झापले
2019 मध्ये ज्या दोन गावांना महाप्रलयाचा फटका बसला. त्याच आंबेवाडी आणि चिखली गावाला यावर्षी सुद्धा महापुराचा फटका बसला आहे. 2019 मध्येही अनेक मंत्री, नेते गावात येऊन नागरिकांना आश्वासन देऊन गेले. अनेकांना मदत मिळाली तर काहींना मिळाली नाही. त्यामुळे यावेळी गावात महापुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नागरिकांच्या शब्दांचा मार सोसावा लागला.
4 वर्षांपूर्वी -
ते सध्या काय करत आहेत? | म्हणाले, पक्षाने माझ्याकडे हरियाणाची जबाबदारी दिली आहे - विनोद तावडे
मागील २ वर्षांपासून राज्याच्या राजकारणातून जवळजवळ दूर गेलेले भाजपचे माजी मंत्री आणि नेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी कल्याण पूर्वेत भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. त्यांनी भाजप आणि मनसे युती याबाबत वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा | त्यांना शिवसेनेत स्थान आणि सन्मान मिळेल - गुलाबराव पाटील
भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा असून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत असतानाचा आता त्यात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देणारा पहिला मीच होतो, असं विधान गुलाबराव पाटील यांनी करून चर्चेचं माहोळ उठवून दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
HSC Result 2021 | १२'वीचे बैठक क्रमांक जाहीर | ऑनलाईन असा मिळवा सीट नंबर - पहा स्टेप्स
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून लवकरच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणं आवश्यक होतं.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये? | वर्ध्यात पंतप्रधानांची ऑडिओ क्लिप वाजवत काँग्रेसची सायकल यात्रा
‘पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये’ या पंतप्रधानाच्या जुन्या भाषणाच्या क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. हीच क्लिप कारंजा तालुक्यात युवक काँग्रेसच्यावतीने इंधन आणि महागाईच्या विरोधात सायकल यात्रा काढली होती. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात कारंजा ते आर्वी अशी 45 किलोमीटरची ही सायकल यात्रा शुक्रवारी काढण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी हिताची ठिबक सिंचन अनुदान योजना 2021-22 | कसा लाभ घ्याल - वाचा माहिती
सन २०१५-१६ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. सदर घटकामध्ये सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी अशा दोन उप घटकांचा समावेश आहे. यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेगासस हेरगिरी | केंद्र सरकार लोकांचे व्हाट्सअँप, इमेल, SMS, पेमेंट हिस्ट्री, मोबाईल असं सर्वच पाहातंय
संसदेत शुक्रवारीही पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. सरकारने विरोधकांशी समेटाचे संकेत शुक्रवारी दिले होते. लोकसभा स्थगित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘विरोधकांकडे अजूनही पर्याय आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रकरणी दिलेल्या वक्तव्यावर विरोधक स्पष्टीकरण मागू शकतात. पण मंत्री राज्यसभेत निवेदन करत असताना त्यांच्या हातातील कागद ओढून फाडले गेले.’
4 वर्षांपूर्वी -
ग्रामीण तरुणांसाठी नाविन्यपूर्ण योजनेची माहिती | असा मिळतो शेळीपालन योजनेचा लाभ - वाचा माहिती
केवळ माहितीच नाही तर ज्या शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत शेळी पालन योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्याने कोणकोणती कागदपत्रे सादर केलेली आहेत याविषयी आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या मानहानीकरक कशा असू शकतात? | हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला झापले
पोर्न व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो | आता पिकांची नोंदणी थेट मोबाईल ॲपद्वारे | अधिक माहितीसाठी वाचा
शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंद करण्याची जी पद्धत आहे ती आता नव्या रूपाने शेतकऱ्यांसमोर येणार आहे अर्थातच एक एप्लीकेशन तयार करण्यात आला आहे आणि त्या पिकांची नोंद शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे या एप्लीकेशनमुळे शक्य होणार आहे पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्जही दिलं जातं. मात्र 2 ते 3 गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता.
4 वर्षांपूर्वी -
रायगडमध्ये पुन्हा भूस्खलनाचा धोका | भारतीय भूशास्त्र विभागाकडून भीती व्यक्त
महाराष्ट्रात रायगडात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुळे जीवितहानी झाली असताना पुन्हा असाच धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महाड आणि पोलादपूर तालुक्यातील ४१३ कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे. पावसामुळे एकूण १,५५५ लोक प्रभावित झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी | मनसेकडून डायरेक्टरला फटक्यांची माळ
एका अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कास्ट डायरेक्टरला मनसेकडून चोप देण्यात आला. हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष अभिनेत्रीला त्याने दाखवले होते. त्याअभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे तक्रार केली होती.
4 वर्षांपूर्वी -
मोत्याची शेती करा आणि कमवा बक्कळ पैसे | सरकारही देतं 50 टक्के सबसिडी
जर आपण भारताचा विचार केला तर शेतकरी अनेक प्रकारचे वेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करून शेती करीत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्नातही वाढ होत आहे. महाराष्ट्रात प्रमुख यांनी ऊस, कापूस, कांदा सारख्या नगदी पिकांची लागवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु आता भारतातील शेतकरी बऱ्यापैकी मोत्याच्या शेतीकडे वळला आहे. या लेखात आपण मोत्यांची शेतीनक्की काय असते याबद्दल माहिती घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
ते थांबले आणि आमचं सर्व ऐकून घेतलं | मुख्यमंत्री आमच्या मागण्या पूर्ण करतील, कोल्हापुरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया
पावसाचा जोर ओसरला असलातरी अधून मधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे.सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्या अजूनही इशारा पातळीवरुनच वाहत असल्याने महापुर ओसरण्यास वेळ लागत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर २४ तासात अवघ्या दीड फुटाची घट झाली आहे. वारणा, दूधगंगा, चिकोत्रा धरणातून गुरुवारी विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
विरारमध्ये ICICI बँकेच्या माजी मॅनेजरकडून बँक लुटण्यासाठी हल्ला | हल्ल्यात महिला मॅनेजरचा मृत्यू
विरार पूर्व परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेत गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास लुटीचा प्रकार घडला. याला विरोध करताना बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मॅनेजर योगीता वर्तक यांचा मृत्यू झाला असून, कॅशियर श्वेता देवरूख जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी कॅशियरवर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत - भास्कर जाधव
महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच, कोकणातील पूरस्थितीमुळे नारायण राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे त्यांची मुलेही राज्य सरकारसह शिवसेना नेत्यांना लक्ष्य करत आहेत. त्यातूनच, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवरच जोरदार प्रहार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
‘फडणवीस’ हे मुळात आडनाव नाही | ते मूळचं पर्शियन नाव आहे ‘फर्द नलीस’ - राज ठाकरे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस आहे. ते यावर्षी 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्त आज पुण्यात सेलिब्रेशन केले जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिचिंतन करत सत्कार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे - अजित पवार
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी १:३० वाजता पूरग्रस्ते चिपळूण आणि ४:३० वाजता महाड शहाराची ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत असल्याने मदत कार्यात विलंब होतो, त्यामुळे तूर्तास नेत्यांनी दौरे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. परंतु, आज काँग्रेसचे नेते राऊत आणि आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. काही दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पावसामुळे कोकणात मोठ्या प्रममाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी