महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | अस्सल सातारी झणझणीत शेंगदाण्याचा म्हाद्या घरच्याघरी बनवा - पहा रेसिपी
महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक रेसिपी प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यात सर्वाधिक प्रकार हे झणझणीत पदार्थांचे आहेत यात वाद नाही. त्यात कोल्हापूर, कोकणी, खान्देशी आणि साताऱ्याचे पदार्थ तर नेहमीच अव्वल म्हणावे लागतील. त्यातील एक पदार्थ म्हणजे अस्सल सातारी झणझणीत शेंगदाण्याचा म्हाद्या. चला तर आज पाहूया अस्सल सातारी झणझणीत शेंगदाण्याचा म्हाद्या रेसिपी;
4 वर्षांपूर्वी -
कुणाशीही वैयक्तिक वैर नाही | पण मला मोदी, शहांच्या भूमिका पटत नाहीत - राज ठाकरे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस आहे. ते यावर्षी 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्त आज पुण्यात सेलिब्रेशन केले जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिचिंतन करत सत्कार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे पारनेर तालुकाध्यक्षाच्या पत्नीला खंडणी प्रकरणी अटक
एकाबाजूला पक्षातील वरिष्ठ आगामी महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुकीत व्यस्त आहेत तर दुसऱ्या बाजूला इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय मनसेच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आली आहे, पारनेर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी याची पत्नी पुष्पा माळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. शेत जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन नंतर ताबा सोडण्यासाठी एकरी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि पारनेर तालुक्यातील रोहिदास भास्कर देशमुख यांच्या मालकीची १९ एकर जमीन आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्यापासून पूरग्रस्तांच्या खात्यावर 10 हजार रुपये जमा होणार | विजय वडेट्टीवार यांची माहिती
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी १:३० वाजता पूरग्रस्ते चिपळूण आणि ४:३० वाजता महाड शहाराची ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत असल्याने मदत कार्यात विलंब होतो, त्यामुळे तूर्तास नेत्यांनी दौरे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. परंतु, आज काँग्रेसचे नेते राऊत आणि आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेच्या महा बजेटमधील पैसा जातोय कुठे? | माहिती घेऊन भाजपाची पोलखोल करा - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पाश्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन ते संपूर्ण पक्षकार्याचा आढावा घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये भूकंप होणार? | खडसेंप्रमाणे गेम होतोय, पंकजांनी शिवसेनेत जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव - सविस्तर वृत्त
फडणवीस राज्याचे मुंख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी स्वपक्षातील दिग्गज नेते आणि एखाद्या समाजाचा चेहरा असणाऱ्या नेत्यांना शिस्तबद्ध संपवण्याचा घाट घातला आणि तो प्रत्यक्षात देखील उतरवला आहे. पक्षांतर्गत सर्व ज्येष्ठ नेत्यांचं राजकीय महत्व संपूष्टात आणून आयात नेत्यांना पुढे करण्याचा सपाटा लावल्याची भावना राज्य भाजपात निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले | रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
पोलिस दलात क्रीम पोस्टिंग आणि बदल्यांतील भ्रष्टाचारावर निगराणी ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. शुक्लांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानींनी बाजू मांडली. सीआयडीच्या प्रमुख असताना शुक्ला यांना तत्कालीन पोलिस महासंचालकांकडून काही फोन नंबर्सवर निगराणी ठेवण्याचे आदेश मिळाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | मराठमोळी झणझणीत कांद्याची भाजी - पहा रेसिपी
केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात कांद्याची भाजी अत्यंत आवडीने खाल्ली जाते. खरे तर ही कांद्याची भाजी महाराष्टातची मानली जाते आणि ग्रामीण महाराष्ट्रात तर कांद्याची भाजी म्हणजे आवडीचा पदार्थ म्हणावा लागेल. पण आता कांद्याची भाजी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाली आहे. कांद्याची भाजी बनविण्यास खूपच सोप्पी आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे कांद्याची भाजी करून पहा.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत खान्देशी डुबुक वडे बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
केवळ उत्तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खान्देशी खिचडी ही स्वादिष्ट अशी डिश आहे. खरे तर ही खान्देशी खिचडी, पण आता पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाली आहे.खान्देशी खिचडी बनविण्यास खूपच सोप्पी आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे खान्देशी खिचडी करून पहा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | मीरा भाईंदर महानगरपालिकेत 290 जागा | ई-मेल द्वारे अर्ज करा
मीरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२१. मीरा भाईंदर महानगरपालिकेने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून २९० विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले गेले. इच्छुक आणि पात्र अर्जदार २ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा तत्पूर्वी ईमेलने अर्ज सादर करु शकतात.
4 वर्षांपूर्वी -
सांगलीतील पुरस्थितीनंतर | नदी पात्रातील मगर रस्ते आणि घराच्या छतावर
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महापूरमुळे अनेक लोकांचा संसार उघड्यावर आले असून यामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, दुसरीकडे सांगलीतून एक खूपच भीतीदायक व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील एक मजली घर पाण्यात बुडाले होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या दत्तक नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा | भाजपसोबत युती नाहीच - संदीप देशपांडे
शिवसेनेसोबत राजकीय अंतर वाढल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या जवळीक वाढण्यावर वारंवार वक्तव्य करताना दिसत आहेत. अगदी फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात जर तर जोडत मोठी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे मोठा राजकीय संभ्रम पाहायला मिळत होता. मात्र याच संभ्रमावर मनसेतून मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कारण या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पत्रकार फोटोग्राफरकडून राज यांचे वारंवार फोटोज | राज गमतीने म्हणाले 'मी काय कुंद्रा आहे का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणावर बैठका आणि पक्ष बळकटीच्या अनुषंगाने पक्षांतर्गत चर्चा देखील सुरु आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला मूळ विषयावर केंद्रित असलेले राज ठाकरे पत्रकारांसोबत वेळ खर्ची घालताना दिसत नसल्याने अनेक पत्रकारांच्या रिपोर्टींग संदर्भात अडचण होतं आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोठा संभ्रम | पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रानं जाहीर केलेली ७०१ कोटीची मदत 2020 सालची
काल केंद्र सरकारने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०१ कोटीची मदत जाहीर केल्याचं वृत्त झळकलं. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केंद्राच्या तत्परतेचे गोडवे गाण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता आलेल्या वृत्ताप्रमाणे मोठा संभ्रम झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण स्वतः राज्य सरकारकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPS परमबीर सिंह यांच्यावरील गुन्ह्याच्या तपासासाठी SIT ची नेमणूक
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. परमबीर सिंह आणि इतर 5 पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. प्रताप सरनाईकांचा उपक्रम | रिकामा सिलेंडर आणा मोफत ऑक्सिजन भरा
आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी स्वखर्चातुन ‘ऑक्सिजन प्लांट’ उभारला आहे . पुढील 3 ते 4 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. काल पालिका आयुक्त, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ऑक्सिजन प्लांट’मधून सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे प्रात्यक्षिक झाले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लांटची पाहणी केली.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | झारखंड आमदार खरेदी प्रकरण | दिल्लीतील फुटेजनुसार बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांशी बैठक
झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी नाशिक आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी
महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसलेली आहे हे दिसून येतंय. मनसे नेते अमित राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानपरिषदचे विरोधीपक्ष नेते दरेकरांना नारायण राणे एकेरी शब्दात म्हणाले, थांब रे, मध्ये बोलू नको
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यापासून आक्रमक स्वभावाचे अनुभवी नेते आहेत. त्यात प्रशासन हाताळण्याचा त्यांना मोठा अनुभव असल्याने त्यांना अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सर्वांनी पाहिलं आहे. मात्र भाजपमध्ये आता केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने कालपर्यंत विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आदरपूर्वक उच्चार करणारे नारायण राणे यांना त्याच दरेकरांचा एकेरी भाषेत आणि एका ओळीत शांत केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी - नाना पटोले
बहुचर्चित पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील महत्वाचे राजकीय नेते, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. या लोकांवर हॅकिंगच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशी आदेश अद्याप दिले नसले तरी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने या हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी