महत्वाच्या बातम्या
-
रोजगार हमी योजनेतून विहीर काढायचीय? | अर्ज कुठे आणि कसा करायचा? - नक्की वाचा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार पंचायत समितीच्या गटविकासअधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरींचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी रोहयोतून सिंचन विहीर काढण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा हे माहिती असणं आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी | हेल्थ बुलेटीन द्वारे माहिती
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळेच ते तीन महिने विश्रांती घेणार असून या दरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईचा खून करून काळीज काढणाऱ्या नराधमास फाशी
दारूसाठी पैसे दिले नाहीत या रागाच्या भरात जन्मदात्या आईला ठार मारून तिचे काळीज काढणाऱ्या निर्दयी नराधमास गुरुवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सुनील कुचकोरवी असे आरोपीचे नाव आहे. ही घटना कोल्हापुरात कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहतीत २८ ऑगस्ट २०१७ रोजी घडली होती. यल्लव्वा रामा कुचकोरवी असे मृत वृद्धेचे नाव होते. हल्लेखोर मुलगा सुनीलला याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. जन्मदात्या आईला क्रूरपणे मारणाऱ्या कुचकोरवी खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
4 वर्षांपूर्वी -
टीम देवेंद्र वगैरे माहिती नाही | पण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे - पंकजा मुंडे
टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी मी असं चालत नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
विजय औटींना महिला सरपंचानी झापले | आमदार निलेश लंकेविरोधातील टिकेवरून जोरदार निशाणा
संकटाचा सामना करायचा का संकटाला भिऊन घरात बसायचं ? म्हणजे चुकीचं वागा असा याचा अर्थ नाही. मुख्यमंत्री पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? ‘त्यांच्यातच जाउन झोपन !’ कोणत्याही गोष्टीला एक सिमा असावी. माणसाने वागावं कसं ? तुम्ही अधिक कडक केले असते, प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते. मी तपशिलात जाणार नाही. त्यासाठी योग्य वेळ येऊ द्या. मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते असा दावा करीत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मा. आ. विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते | विजय औटींचा निलेश लंकेवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते.
4 वर्षांपूर्वी -
जळगावात कुछ बडा होने वाला है नंतर, मी नाथाभाऊ समर्थक कॅम्पेन जोरात
BHR प्रकरणाची सूत्रे जोरात फिरू लागताच आ.गिरीश महाजन गटाकडून ‘कुछ बडा होनेवाला हैं’ असे संदेश समाज माध्यमांवर फिरत होते. आठवडाभरात एकनाथराव खडसेंच्या मागे ईडी लागली आणि खडसे समर्थक मैदानात उतरले. खडसे समर्थकांकडून जोरदार सोशल मिडिया कॅम्पेन केले जात असून ‘मी नाथाभाऊ समर्थक’चे वॉलपेपर व्हायरल केले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा जबाब नोंदवला जाणार
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
घरबसल्या वय, राष्ट्रीयत्व आणि डोमासाईल प्रमाणपत्र ऑनलाईन कसं काढायचं? - असा करा अर्ज
महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल. सरकारी नोकरीसाठी किंवा सैन्यातील नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर महत्वाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक असते ते म्हणजे वय,राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र होय. या प्रमाणपत्राला डोमासईल प्रमाणपत्र म्हणून देखील ओळखलं जाते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते.
4 वर्षांपूर्वी -
चिंता मिटली | परीक्षा न देता उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला 11वीत प्रवेश मिळेल
कोरोना लाटेमुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे यंदा अकरावीच्या वर्गात जागा कमी पडतील, ही भीती चुकीची ठरणार आहे. कारण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध विद्यार्थ्यांपेक्षा ३५ टक्के जागा अधिक आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीत हमखास प्रवेश मिळेल. पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मात्र सीईटीचे मार्क महत्त्वाचे ठरतील. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता पालकांना सतावते आहे.
4 वर्षांपूर्वी -
राफेलच्या चौकशीची आग लागली फ्रांसमध्ये आणि धूर दिल्लीच्या CBI कार्यालयातून, कुछ तो गडबड है - रुपाली चाकणकर
भारत आणि फ्रान्समधील जागतिक पातळीवरील बहुचर्चित ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय कराडांना मंत्रिपद हा पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव - शिवसेना
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांतून व्यक्त होत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा 25% शुल्क कपातीचा निर्णय
महाराष्ट्राच्या इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशने असा निर्णय घेतला आहे की कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 25% कपात केली जाईल. यामुळे राज्यभरातल्या सुमारे 18,000 इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राणेंना पंतप्रधान केले तरी कोकणातून शिवसेनेला हटवणे कोणाच्याही आवाक्याबाहेर - विनायक राऊत
कोकणातील लोकांनी आपलं आणि शिवसेनेचं नातं अभेद्य आहे हे सिद्ध करून दाखवून दिलेले आहे. आज नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवले तरी सुद्धा कोकणातून शिवसेनेला हटविणे हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नाते तोडण्याचं काम कोणीही करू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मोदी तेरे राज मे, सायकल आगयी हाथ मे | इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल-बैलगाडी मोर्चा
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भरपावसात सभा घेतली होती. त्याचाच कित्ता गिरवीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भरपावसात भिजत इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात सायकल मोर्चा काढला. यावेळी ‘माेदी तेरे राज मे, सायकल आगीय हाथ मे’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
4 वर्षांपूर्वी -
मुंडे भगिनींचे राजकारण अजून खडतर | नाराजी नाट्याच्या प्रश्नावर उत्तरावेळी फडवणीस संतापले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. बुधवारी 43 जणांनी राष्ट्रपती भवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये 36 नवे चेहरे सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे 12 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. तर महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रीतम मुडेंनाही स्थान मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र प्रीतम मुडेंना मंत्रिपद देण्यात आले नाही. यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अत्यंत महत्वाचा ग्रामपंचायत नमुना 8 अ उतारा | तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही - नक्की वाचा
तुम्ही जर कोणत्याही ग्रामपंचायत हद्दीत राहत असाल तर तुम्ही 8 अ चा उतारा, सात बारा, फेरफार यांसारखे उतारे पहिलेच असतील. परंतु ही कागदपत्रे काढायची कशी, त्याचे फायदे काय आहेत तसेच त्यांचा वर लिहलेल्या गोष्टींचा अर्थ काय व यातील फरक काय हे सगळ्यांच माहीत असते असे नाहीये. अशा सर्वांसाठी या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत 8 अ उतार्या बाबतची सर्व माहिती.
4 वर्षांपूर्वी -
राज्य भाजपवर आयात नेत्यांचं वर्चस्व | शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस ते मनसे नेत्यांना लॉटरी
देशात असो किंवा राज्यात, भारतीय जनता पक्षाचं राजकारण २०१४ नंतर पूर्णपणे बदललं असून त्यात मूळ भाजप पदाधिकारी आणि नेते मंडळींच्या राजकारणाला अहोटी लागल्यात जमा आहे. त्यात फडणवीसांनी देखील देशातील मोदी नीतीप्रमाणे राज्यातही फडणवीस नीती सुरु करून केवळ निवडून येण्याच्या निकषावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ते मनसेतील नेते मंडळींना प्राधान्य दिल्याचं वारंवार पाहायला मिळालंय. त्यातही या पक्षातील नेत्याचा पराभव झाल्यास त्यांना पुन्हा विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवून मोदी पद बहाल करण्याचा फडणवीसांनी सपाटाच लावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नांदेड 2018 | फडणवीसांच्या काळातील सर्वात मोठ्या शासकीय धान्य घोटाळ्यात CID नंतर ED'ची उडी
फडणवीसांच्या काळातील म्हणजे 2018 च्या जुलै मध्ये राज्यातील सर्वात मोठा शासकीय धान्य घोटाळा नांदेडमध्ये उघड झाला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या धान्य घोटाळ्यात जिल्ह्य़ातील बडे राजकीय मंडळी, व्यापारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हाथ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणारे मोठे रॅकेट नांदेडमध्ये कार्यरत असल्याचे यात उघड झालं. पोलीसांनी या कारवाईत दहा ट्रकसह एक कोटी 80 लाखांचे धान्य जप्त करुन गुन्हे दाखल केले होते. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की पारदर्शक चौकशी झाली तर अनेक बडी मासे तुरुंगात जातील अशी माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळाप्रकणी घडामोडींना वेग | महाजन आणि फडणवीसांचे निकटवर्तीय आ. चंदुभाई पटेल अटकेच्या भीतीने अंडरग्राउंड?
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी एका बड्या नेत्याला अटक होणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, विधान परिषद आमदार चंदुभाई पटेल यांच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखा पुणे युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून आ.पटेल यांचा शोध सुरू असल्याचे समजते. आ.चंदूभाई पटेल यांच्यावर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा देखील दाखल केल्याचे समजते.
4 वर्षांपूर्वी