महत्वाच्या बातम्या
-
इंजिनिअर व्हायचंय पण इंग्रजीचं टेन्शन? | काळजी नको, आता मराठी भाषेतून अभियांत्रिकी शिक्षण मिळणार
विद्यार्थ्यांसाठी आणि तीही विशेष करून ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयानुसार भारतातील प्रादेशिक भाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचं शिक्षण देण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात या अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन केले जाणार लसीकरण | पुण्यातून सुरुवात
राज्यात लसीकरणासाठी मोठ्या संख्येत लोक घराबाहेर पडत आहेत. यामुळे संक्रमणाचा धोका वाढला आहे. हे पाहता राज्य सरकारने आता घरोघरी जाऊन लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात पुण्यातून केली जात आहे. ही माहिती राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी लसी या केंद्र सरकारकडून दिल्या जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे-मुंबई महापालिकांच्या निवडणुकीआधी भाजपची राजकीय घाई? | अजितदादा, अनिल परबांच्या CBI चौकशीची मागणी
राज्यातील महत्वाच्या मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने मुंबईत शिवसेना आणि पुण्यात राष्ट्रवादी मोठी मजल मारण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात अनेक महानगरपालिकेत आणि नगरपालिकेत भाजपाची सत्ता हातातून जातं असल्याने चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांच्या नेतृत्वाची चिंता वाढली आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सोबत असेल तर पुण्यात मोदी लाटेत आलेली सत्ता आता टिकवणं कठीण असल्याचं दिसतंय. परिणामी नेत्यांच्या बदनामीकडून पक्षाला बदनाम करण्याची व्यूहरचना आखली जातं आहे. मुंबई आणि पुणे महानगरपालिकेत पराभव झाल्यास चंद्रकांत पाटील यांची गच्छंती होईल अशी शक्यता असल्याने ते देखील चिंतेत असल्याचं भाजपच्या गोटातून समजलं.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला महाविकास आघाडीचा धक्का | सांगली, जळगाव पाठोपाठ भाजपने अहमदनगर महापालिका गमावली
याआधी अहमदनगर महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. गतवेळी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. परंतु आता सांगली आणि जळगाव पाठोपाठ भारतीय जनता पक्षाने तिसरी महापालिका गमावली. अहमदनगर महानगरपालिकेतही महाविकास आघाडी पॅटर्न आल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सिनियर PI, PSI आणि API पदावरील अधिकाऱ्यांच्या लवकरच मुंबई बाहेर बदल्या | 727 जणांची यादीही तयार
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस खात्यामध्ये ८ वर्षांहून अधिक काळ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना काळातील आंदोलन ही दुर्दैवाची गोष्ट | राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी परिस्थितीचा थोडा विचार करायला हवा
कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नसताना आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टमुले तिसऱ्या लाटेचा धोका असताना राज्यात अनेक आंदोलनं झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून न्यायिक प्रक्रियेपेक्षा भाजप नेत्यांना सामान्य लोकांना भडकविण्याचा प्रयन्त केल्याचं आणि आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात नवी मुंबईमध्ये होऊ घातलेल्या विमानतळाच्या मुद्यावरून सर्व पक्षाच्या नेत्यांनी देखील आंदोलन केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
१-२ गुंठे जमिनींच्या तुकड्याचीही लवकरच दस्तनोंद | महसूल विभागाचे नोंदणी महानिरीक्षकांना पत्र - नक्की वाचा
जमिनीच्या छोट्या तुकड्यांच्या कायदेशीर नोंदणीकडे दुर्लक्ष केलं जातं. नागरी भागात, तसेच प्रमाणभूत क्षेत्रात तुकडेबंदी कायद्याचा भंग होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयांतून एक-दोन गुंठे जमिनींचे व्यवहार नाकारण्यात येतात. परंतु, तुकडाबंदी कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा आणि महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण याबाबत अधिनियम १९४७ मधील तरतुदी विचारात घेऊन अशा प्रकारच्या व्यवहारांचे दस्त नोंद करून घेण्यासंबंधीचे पत्र महसूल विभागाने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांना पाठवले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल - भास्कर जाधव
मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. याच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी यांनी चांगलाच समाचार घेतलाय. आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिंताजनक | ऑनलाईन शिक्षणातून पैसा | बालभारतीच्या अॅप्लिकेशनसाठी पैसे मोजावे लागणार
कोरोना काळात शाळा बंद असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोरील समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता ज्या ऑनलाईन शिक्षणाच्या भरोसे पालक मुलांना अभ्यासात व्यस्त ठेवत आहेत त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या गरजेतून पालकांची लूट होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा | कोणत्या मुद्यावर चर्चा?
राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोडी घडत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन | शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हिप जारी
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होत आहे. या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहायच आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे शिवसेनेच्या आमदारांना जारी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत, आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते - शरयू देशमुख
देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला असून, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं, अशी विचारणा थोरात यांनी केली होती. थोरात यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वक्तव्यावरून थोरातांना टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
२४ तासात चौकशीसाठी हजर राहा | नाहीतर घरी येऊन चौकशी - ईडीचं उत्तर
ईडीच्या कचाट्यात सापडलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावून आज (२९जून) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, अनिल देशमुख यांनी वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. यासंदर्भात त्यांनी ईडीला पत्र देखील लिहिलं होत दरम्यान, या पत्राला ईडीने उत्तर देत २४ तासांत ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ED'चं ठरलंय? देशमुखांना चौकशीनंतर..? | गृहमंत्री वळसे पाटील, आव्हाड आणि मुंबई पोलीस आयुक्त वर्षावर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या (ED) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहे. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर | सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा - वाचा सविस्तर
संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे? | जाणून घ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य’ योजनेचे लाभ कसे घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना खरंतर २ जुलै २०१२ रोजीच महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरु केली होती. आता (२०१७ मध्ये) त्याच योजनेचं नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना हे ठेवण्यात आलं आहे. (इथे आपल्याला राज-कारणात पडायचं नसून, उपयोगी अशा योजनेची माहिती घ्यायची आहे).
4 वर्षांपूर्वी -
Health First | लस 'खरी; आहे कि 'खोटी' ते कसे ओळखावे? | जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतात सध्या करोनाचे लसीकरण अगदी जोरात सुरु आहे. २१ जून पासून केंद्र सरकारने राबवलेल्या नव्या धोरणामुळे १८ वर्षे वयाच्या वरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम अगदी धडाक्यात सुरु आहे. भारतात बनवलेल्या लसी तसेच काही प्रमाणात परदेशात बनवलेल्या लसी असे सर्व डोस उपलब्ध झाल्यामुळे आता भारतात लसीकरण वेगाने सुरु झाले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात एकूण ३२ कोटींपेक्षा जास्त डोस देऊन झाले आहेत. शिवाय दररोज मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊन हा आकडा वाढतच आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिसऱ्या लाटेपूर्वी मुंबई महापालिका सज्ज | 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती
महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
चौकशीस गैरहजर राहण्यासाठी अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | ईसीआयआरची प्रत देण्याची विनंती
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज इडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. परंतु, अनिल देशमुख आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात आपले वाढते वय आणि कोरोनाचा धोका असे कारण सांगत चौकशीतून सूट मिळवण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालय गाठले आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळा | जितेंद्र कंडारेला अखेर इंदूरमधून अटक | बडे मासे गळाला लागणार
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर बहुराज्य सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील इंदूर परिसरात पोलिसांच्या हाती लागला. दाढी, मिशी वाढवून रूप बदलवण्याचा प्रयत्न करूनही इंदूर परिसरातील एका जुनाट वसतिगृहाजवळ त्याला ओळखून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तो जिथे राहत होता तिथे काही महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली असून त्यांच्यासह बुधवारी त्याला पुण्याच्या विशेष न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी