महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान 'जेम्स'चं निधन | घरातील सदस्यप्रमाणेच अखेरचा निरोप दिला
राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान म्हणजेच त्यांच्या लाडक्या जेम्सचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास जेम्सचं निधन झालं आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे. राज ठाकरेंकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, तर आता जेम्सही गेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत समुद्राचं पाणी गोड होणार | इस्त्रायलसोबत सामंजस्य करार | इस्त्रायलकडून मराठीत ट्विट
इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या पाण्याला गोड करण्याच्या प्रकल्पाला आता वेग मिळाला आहे. मुंबई पालिका व आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. दरम्यान मालाड, मनोरी येथील दोनशे दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. हा प्रकल्प एक क्रांतिकारी पाऊल असून अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे लग्न आमच्यासोबत झाले | आम्ही मंगळसूत्र घातल्यानंतर अचानक नवरी पळून गेली - आ. सुरेश धस
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्री विजय वडेट्टीवार हे मनाला येईल ते बोलत आहेत. राज्य सरकार मात्र काहीच करत नाही. वडेट्टीवार फडतूस असून त्यांनी बीड जिल्ह्यात पाऊल ठेवून दाखवावे. पोलिस बंदोबस्तातच त्यांचा सत्कार केला नाही तर सुरेश धस नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात साेमवारी सकाळी काढलेल्या विराट मोर्चाची वेळी त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यांनतर विराट मोर्चाला सुरुवात झाली.
4 वर्षांपूर्वी -
जि.प., पं.स. पोटनिवडणुका पुढे ढकलण्यासाठी याचिका | राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात
राज्यातील ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी १९ जुलै रोजी होणाऱ्या पोटनिवडणुका ६ महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी रिट याचिका राज्य सरकारकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्यात कोविडची दुसरी लाट तसेच साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकांना ६ महिने स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत केल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना सांगितले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ४४ पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. यातील मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून घेतल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीचा विकास जोमात | कलानगर जंक्शन उड्डाणपुलाचे उद्घाटन | प्रवाशांचा प्रवास वेळ वाचणार
कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सी लिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स | आज चौकशीसाठी राहणार हजर
ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देखमुखांची चौकशी केली जाणार आहे. 100 कोटी रुपये वसूल प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना, मुंबईतील काही बार मालकांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी अनिल देशमुख यांना प्रत्येकी 4 कोटी रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचा दावा ईडीने केला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहायकास (पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुख यांना समन्स पाठवले होते. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | वसंतराव ना. मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) 07 जागांसाठी भरती
व्ही एन मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी भरती 2021. व्हीएनएमकेव्ही परभणी भरती 2021: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी 07 एसआरएफ, प्रकल्प सहाय्यक आणि कुशल मदतनीस (हेल्पर) पदासाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत 30 जून 2021 रोजी घेतली जाईल.
4 वर्षांपूर्वी -
नाबार्ड दक्षता पथकाच्या चौकशीत मुंबै बँकतील बोगस कर्ज प्रकरणं समोर | दरेकरांच्या अडचणीत वाढ
मुंबै बँकमध्ये बोगस कर्ज प्रकरण समोर आल्याची चर्चा आहे. नाबार्डच्या आदेशावरून बॅंकेच्या दक्षता पथकाच्या चौकशीत समोर बोगस कर्जाचं प्रकरण समोर आल्याचं बोललं जातं आहे. मात्र बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे सर्व राजकारण असून सत्ताधाऱ्यांकडून द्वेषापोटी हे सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 साठी ऑनलाईन अर्ज सुरु | करा अर्ज
सोलर पंप योजना अर्थात सौर चलित पंप योजना संबधी अधिक माहिती जाणून घेवूयात. सोलर पंप योजनेसाठी अर्थात सौर उर्जा चलीत पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या वेबसाईटवर हा अर्ज करावा लागणार आहे त्यासंबधी अगदी तपशीलवारपणे माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सोलर पंप योजना संदर्भात या लेखामधील माहिती अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी सांगितलेल्या अर्ज पद्धतीनुसार तुम्ही तुमचा अर्ज करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
संजय राऊतांच्या राजकीय गाठीभेठी | मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केल्यानंतर पवारांच्या भेटीला
महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होत आहे. शनिवारीही संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुसऱ्यांदा राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, इंधन दरवाढ नव्हे, यासाठी त्या म्हणाल्या 'गर्व आहे मला भक्त असल्याचा'
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाची सुरुवात 16 जानेवारी 2021 रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी सुरुवात झाली होती. भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 32.36 कोटींचा मैलाचा टप्पा पार केला. उपलब्ध अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत 43 लाख 21 हजार 898 सत्रांमध्ये, एकूण 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसी देण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासात 17 लाख 21 हजार 268 लसी देण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सत्ता दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात | नाही दिली तर फडणवीस मदत करणार नाहीत असे वाटते
ओबीसी आरक्षण पूर्ववत करुन न दिल्या राजकीय संन्यास घेईन अशी गर्जना करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाविकास आघाडीचे नेते हल्लाबोल करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला.
4 वर्षांपूर्वी -
सारेगमप लिटिल चॅम्प्स सोबत रंगणार जागर लोकसंगीताचा | स्वरा जोशी सगळ्यांची लाडकी
सारेगमप लिटिल चॅम्प्सचे १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. छोटे गायक तसंच अतिशय उत्तम छोटे वादक देखील आपल्याला या पर्वात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सुरेख गाण्यांनी एक वेगळाच माहोल या लिटिल चॅम्प्सनी तयार केला. पहिल्याच आठवड्यात या स्पर्धकांच्या टॅलेंटची झलक पाहून या कार्यक्रमातील ज्युरी म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि कार्तिकी गायकवाड या यांच्यासाठी परीक्षण करणं हे खूप अवघड असणार आहे हे मात्र नक्की.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | डिजिटल 7/12 तुमच्या मोबाईलवर असा डाउनलोड करा - नक्की वाचा
आजच्या या लेखामध्ये डिजिटल सात बारा कसा डाउनलोड करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर डिजिटल सात बारा म्हणजे काय हे समजावून घेवूयात. मित्रांनो तुम्ही जर महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर गेलात तर या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारचे सात बारा व ८ अ उतारे बघू शकतात. पहिला आहे विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ . दुसरा आहे digitally signed 7/12 या दोन्ही मधला फरक या ठिकाणी बघुयात.
4 वर्षांपूर्वी -
अटकेच्या शक्यतेने परमबीर सिंह २ महिन्यांच्या सुट्टीवर? | ५ मे पासून पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा आरोप करून खळबळ माजवणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त व राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग हे तब्बल 2 महिन्यांच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला परमबीर सिंह हे चंदिगड येथे असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. तेथील एका स्थानिक रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर यांची तब्येत ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे परमबीर हे 5 मे पासून सुट्टीवर गेले असल्याचे समोर येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी आयात नेत्यांना पवार साहेबांवर टिका करावी लागते - रुपाली चाकणकर
देवेंद्र फडणवीस एकटेच राजकीय संन्यास घेणार आहेत की मोदीजींनाही सोबत नेणार आहेत? OBC आरक्षणाचा बळी देण्यात दोघांचाही मोलाचा वाटा आहे. लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचे नाव घेऊन मी पुन्हा येईन चं सोंग करतंय असं म्हणत चाकणकरांनी फडणवीसांवर टीका केली होती.
4 वर्षांपूर्वी -
वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नव्हते | लोकांना फसवून सत्ता मिळवणं हाच भाजपचा उद्देश - बाळासाहेब थोरात
विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींनो, आता मोठ्या फसवणुकीला सज्ज राहा | फसवणूक झालेल्या धनगर समाजाच्या नेत्यांचा फडणवीसांच्या आश्वासनावरून हल्लाबोल
विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोटे बोलण्यात कोणी हात धरू शकणार नाही. त्यांनी सात वर्षांपुर्वी धनगर समाजाला १५ दिवसांत अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात आरक्षण मिळणारच नाही, याची व्यवस्था केली, शिवाय बुद्धीभेद करून धनगर समाजाच्या राजकीय जागृतीची चळवळ संपवली. बहुजनद्वेषी फडणवीसांचा डोळा आता ओबीसी समाजावर आहे. त्यांनी ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नवे आश्वासन दिले आहे. त्यांचा आवेश पाहता ओबीसी बांधवांनी नव्या फसवणुकीला तयार राहावे, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे. फडणवीसांच्या आश्वासनाला धनगर समाज ज्याप्रमाणे भुलला, त्याप्रमाणे ओबीसी समाजाने भुलून जाऊन नये, फडणवीसी डावपेचांपासून सावध राहावे, असे आवाहनही ढोणे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी जोमात | भाजप समर्थक आमदार करणार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
सध्या सगळे राजकीय पक्ष स्वतः ला सक्षम करत असून आपलं बळ वाढवताना दिसत आहेत. अशात पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. परंतु, आता एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून राष्ट्रवादीचं संख्याबळ पुन्हा वाढलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कलानगर उड्डाणपुल दुसऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन | विरोधी पक्षनेते फडणवीसांना वगळले
वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वांद्रे- कलानगर जंक्शन येथे उभारलेल्या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिकांपैकी दुसरी मार्गिका आज (सोमवार) खुली केली जाणार आहे. तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मालाड येथे दोन हजार रुग्णांच्या क्षमतेचे करोना केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह विविध खात्याचे मंत्री, अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. यावरून मनापमानाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी