महत्वाच्या बातम्या
-
सातारा | अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी आणि मिल्किंग मशीनच वाटप | करा अर्ज
जिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत जिल्हा परिषद सातारा पशुसंवर्धन विभागाकडून ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व एक बोकड वाटप. ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप ( दोन गाई म्हशी) व मिल्किंग मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी शेवट दिनांकाच्या आत विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हा परिषद निवडणुकांवरून भाजपमध्ये गोंधळ? | फडणवीस OBC उमेदवार देणार तर पंकजा न्यायालयात जाणार
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे 100 रुम देणार | आव्हाडांना आनंद
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजापूर रिफायनरीच्या बाजूने मतदान | शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरीच्या बाजूने मतदान केल्याचा ठपका ठेवत नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी केली गेली. राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवीयांनी नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांच्यावर ही कारवाई केली.
4 वर्षांपूर्वी -
आशा सेविकांना मानधनवाढ आणि कोविड भत्ता मिळणार | आरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे
महाराष्ट्रातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा आशा संपाबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आशांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.
4 वर्षांपूर्वी -
अविनाश भोसलेंवरील ED कारवाई हा अजित पवारांवर दबाव | ED भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी हे करतय - अंजली दमानिया
अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा किंवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर ईडी कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे,” अशी टीका अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पत्नीच्या खासदारकीसाठी आणि आनंदराव अडसुळांवर दबाव टाकण्यासाठी पती-पत्नीची राजकीय आरोपांची धडपड?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्राच्या निर्णयाला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधत अवैध संपत्ती बाळगला असल्याचा आरोप केला आहे. खासदार नवनीत राणा आणि मला शिवसेनेकडून टार्गेट केले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून तशी खिचडी शिजवली जात असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगवेगळ्या देशात अवैध संपत्ती असून त्याची माहिती मी मिळवली आहे. लवकरच ही माहिती ईडीकडे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार राणा यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
नागपुर | पिकनिकला गेले आणि संपूर्ण कुटुंब पुराच्या पाण्यातच अडकलं | प्रशासनाची रात्रभर धावपळ
सध्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे नदी-नाले-धबधबे ओसांडून वाहत आहे. या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण जात आहेत. पण नागपुरमधील एका कुटुंबाला पिकनिक चांगलीच महागात पडली आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील घोघरा धबधब्याजवळ ही कुटुंब तब्बल आठ तास पुराच्या पाण्यात आडकले. मंगळवारी रात्री 11 वाजता सर्वांना सुरक्षित वाचवण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
स्वप्ना पाटकर यांना बनावट PHD डिग्री प्रकरणी अटक झालेली | त्यांच्यावर फसवणूक, 420, 467, 468 या गंभीर गुन्ह्यांची नोंद
फिल्म निर्मात्या आणि डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पाटकर यांनी न्यायालयात याचिका दाखल करताच, बोगस डिग्रीच्या खोट्या प्रकरणात पाटकर यांना अटक केल्याचा दावा विरोधी पक्षकारांकडून करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने लक्ष घालत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील गुरुवार(24 जून) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सजय राऊत यांच्या विरोधात महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी करा | हायकोर्टाचे पोलीस आयुक्तांना निर्देश
फिल्म निर्मात्या आणि डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पाटकर यांनी न्यायालयात याचिका दाखल करताच, बोगस डिग्रीच्या खोट्या प्रकरणात पाटकर यांना अटक केल्याचा दावा विरोधी पक्षकारांकडून करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने लक्ष घालत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील गुरुवार(24 जून) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली | महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत - एकनाथ शिंदे
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा आरोप केला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | भारती सहकारी बँक (पुणे) | क्लार्क ते मॅनेजर पोस्टसाठी भरती | ऑनलाईन अर्ज
भारती सहकारी बँक लिमिटेड पुणे भरती २०२१. भारती सहकारी बँक लिमिटेड, पुणे यांनी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून व्यवस्थापक, लिपिक आणि अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बीएसबी लिमिटेड पुणे भरती 2021 वर 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि सर्व मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. संभाजीराजेंनी कोल्हापुरात विविध मागण्यांसह मुक मोर्चा काढला होता. यानंतर राज्य सरकारने लवकरच आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करु असे आश्वासन दिले होते. आज राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्योग कर्ज योजना ९० टक्के कर्ज मिळणार | असा करा ऑनलाईन अर्ज - वाचा आणि शेअर करा
जाणून घेवूयात उद्योग कर्ज योजना संदर्भात. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य शासनाला १५ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या व्यक्ती शेळी पालन किंवा दुग्धव्यवसाय करतात त्यांना या व्यवसायाबरोबर दुध आणि प्रक्रिया उद्योग, सलग्न पशुखाद्य, मास निर्मिती, मुरघास उद्योग देखील सुरु करावा असा या योजनेचा उद्देश आहे. ९० टक्के कर्ज आणि 3 टक्के व्याज सवलतीची योजना नुकतीच पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे उद्योग कर्ज योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. कारण अर्ज स्वीकारणं देखील सुरु झालंय.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक कीटकनाशक | असे तयार करा - वाचा सविस्तर
सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं राजकीय अस्तित्व धोक्यात | ठाण्यात शुक्रवारी ओबीसींचा आक्रोश मोर्चा
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी केंद्राकडे ओबीसींची आकडेवारी मागितली होती. पण सरकारने ती दिली नाही. त्यामुळेच ओबीसींचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ठाणे-पालघर प्रमुख सुभाष देवरे यांनी केला आहे. केंद्र सरकारने ओबीसींची आकडेवारी द्यावी आणि आरक्षणाचा मार्ग सुकर व्हावा या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने शुक्रवार 25 जून रोजी ठाण्यात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं देखील देवरे यांनी जाहीर केलं.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी पर्याय देऊ - फडणवीस
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
अमरनाथ यात्रा रद्द करणारी भाजपा पंढरपूरच्या वारीसाठी आग्रही | त्यांना वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही - काँग्रेस
देशात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 28 जून ते 22 ऑगस्टपर्यंत होणार होती. मधल्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे श्राइन बोर्डाने अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 1 एप्रिलपासून यात्रेचे अॅडवांस रजिस्ट्रेशनदेखील सुरू झाले होते. पण, कोरोनाची दुसरी लाट आली आणि यामुळे यात्रा रद्द करावी लागली. पण, भाविकांना ऑनलाइन दर्शन करता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | MAHATRANSCO मध्ये तब्बल 8500 जागांसाठी होणार भरती
कोरोनामुळे सरकारी नोकरीच्या जागाही निघत नसल्यानं तरुणाईमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मात्र आता MSEB च्या महापारेषण विभागात लवकरच तब्बल 8500 जागांसाठी पदभरती होणार आहे. यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर झाले आहेत आणि पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी