महत्वाच्या बातम्या
-
हे 5 कृषिसंबंधित व्यवसाय करून शेतकरी कमवू शकतात भरपूर कमाई - वाचा सविस्तर
शेतकऱ्यांचा संबंध थेट निसर्गाशी असल्याने पाऊस, दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक संकटांचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असतो. पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी कृषि संबंधित व्यवसायाचे अनेक पर्याय समोर आले आहेत. या व्यवसायांसदर्भात जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात शनिवारी-रविवारी दुकानं बंद राहणार | फिरायला जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करणार
पुण्यात शनिवार आणि रविवार दुकानं बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी निर्बंध अजून कठोर करण्याचा इशारा देताना विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जाईल असं सांगितलं आहे. तसंच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाही, ते नुसतेच बोलतात - चंद्रकांत खैरे
एकाबाजूला सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुकांना अजून ३ वर्ष शिल्लक | त्याआधीच युती, आघाडी, स्वबळाची भाषा करणं शहाणपणा नाही
मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फटकारले आहे. निवडणुकांना अजून अवकाश आहे. त्या आगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असा टोला लगावतानाच 2024’मध्ये मुख्यमंत्री कुणाचा असेल याचा फॉर्म्युलाही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात भाजपचं सरकार असल्याने फडणवीसांनी ते प्रयत्नच केले नाहीत | पण जयंतरावांनी केले
पावसाळ्यात पुराच्या पाण्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला नेहमीच अलमट्टी आणि हिप्परगा धरणातील पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना याच भागात महापुरामुळे अनेक कुटुंब बेघर झाली होती, तर अनेकांनी प्राण गमावले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्याने फडणवीसांनी नेहमीच गुळगुळीत भूमिका घेतली होती. तसेच कडक भूमिका किंवा संवाद साधून प्रश्न निकाली काढण्यासाठी कधीच प्रयत्न केले नव्हेते. कायदेशीर बाब पुढे करून केवळ बचावात्मक भुमीका मांडल्याचे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मात्र सध्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र थेट कर्नाटकात जाऊन संवाद सुरु केल्याने प्रश्न निकाली लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात पेट्रोल पंपावर राडा | शिवसेना आ. वैभव नाईक भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले
दरम्यान, आता सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
4 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वासाठी आजही शिवसेनाच समोर येते | हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे - संजय राऊत
शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने पक्षाच्या नेतेमंडळींकडून आणि इतर राजकीय पक्षांकडून देखील शिवसेनेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या गेल्या ५५ वर्षांच्या प्रवासाविषयी भूमिका मांडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची खास ऑफर | पेट्रोल मोफत मिळवा तो देखील नारायण राणेंच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर?
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात पुन्हा ठिणगी उडण्याची शक्यता आहे. शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भारतीय जनता पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा आज 55 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे पेट्रोल वाटप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर होणार होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड देण्याचा कार्यक्रमच वैभव नाईक यांनी आखला होता.
4 वर्षांपूर्वी -
नवनीत राणांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड | सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली
अमरावतीच्या भाजप समर्थक खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने २ लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. खासदार नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती मिळतेय.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेन उभारा | अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई-औरंगाबाद-जालना-नांदेड-हैदराबाद असा मार्ग केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून, या पत्रात त्यांनी सदरहू मार्गाची आवश्यकता आणि या प्रकल्पातील सुलभता निदर्शनास आणून दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा नंतर OBC'वरही भाजपचं अजब राजकारण | केंद्राकडे इम्पिरिकल डेटा उपलब्ध असताना राज्याकडे मागणी
मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलेले असल्याचे पहायला मिळत होते. आता यानंतर राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आरक्षणासंदर्भात राज्यातील ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात भाजपची बैठक झाली. या बैठकीनंतर येत्या 26 जून रोजी ओबीसी आरक्षणासाठी राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांपूर्वीच फुल्ल
कोरोनाने मागील वर्षी देशात असे काही थैमान घातले होते, की सण उत्सवांवरही याचे सावट पाहायला मिळाले. हे चित्र यंदाच्या वर्षीही फारसे काही वेगळे नाही. कोकणच्या दिशेने जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांना मागच्या वर्षी गावी जाणे शक्य झाले नव्हते. प्रशासनाचे नियम आणि कोरोनाचे संकट यांमुळे चाकरमान्यांचा हिरमोड झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने, काँग्रेस-एमआयएम'च्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे - गिरीश महाजन
राम मंदिराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं असून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी घणाघाती टीका केली आहे. श्रीराम जन्मीभूमीतील मंदिर पूर्ण होण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना प्रयत्न करीत आहे. आता तर ‘शिवसेनेने, काँग्रेस एमआयएमच्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे,’ अशी घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार
केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. कारण, केंद्राकडे असलेला हा डेटा मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल”, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट म्हटले आहे. तसेच हा मिळावा म्हणून आम्ही केंद्राला दोन पत्रे लिहिली पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुंबई येथे भेट घेतली. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या समर्थकांवर बीएचआरकडून झालेली कारवाई आणि खडसेंकडून घेण्यात आलेली भेट यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका
पुण्याच्या लौकिकाला साजेसा उपक्रम काँग्रेसने शहरात राबवला आहे. नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी याची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. त्याहीपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. मात्र आता विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखला म्हणजे TC (transfer certificate ) /LC (leaving certificate) शिवाय प्रवेश दिला जाणार आहे. नुकतंच राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय जारी केला आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मतारखेचा दाखल्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR Scam | बडे मासे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात | २ आमदारही तपास यंत्रणेच्या रडारवर?
जळगावसह राज्यात एकाच दिवशी धरपकड करीत कारवाई केल्याने बीएचआर प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले असून ठेवीदारांशी दलाली करणारे देव पाण्यात टाकून बसले आहेत. एका आमदाराचे नाव दिवसभर जोडले जात असले तरी दुसरा आमदार थोडक्यात बचावला आहे. सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ची भुमिका घ्यावी लागणार असून मोठा मासा पुढील आठवड्यात पथकाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा २०२४ | रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांची तयारी
मराठवाड्यातील सर्वाधिक चर्चेत असणारं म्हणजे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव असंच म्हणावं लागेल. तेच हर्षवर्धन जाधव पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि ते सुद्धा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधातच असं दिसतंय. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. कारण, हर्षवर्धन जाधव यांनी आता थेट जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
२-४ आठवड्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही | डॉ. संजय ओक यांचा इशारा
महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी