महत्वाच्या बातम्या
-
Rain Updates | मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस | पुणे, सातारा, रत्नागिरीत रेड ॲलर्ट
राज्याभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. तळकोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. तर कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर केली आहे. येत्या 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, साताऱ्यासह, रत्नागिरीला रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | केंद्रात काय करायचं ते मी बघतो गर्जना करत उदयनराजेंच्या केवळ राज्याकडेच ढीगभर मागण्या?
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून श्वेतपत्रिका काढली पाहिजे. तेव्हा कोणी कोणाला फूस लावली हे लोकांना स्पष्टपणे समजेल. आधी राज्याने मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवावे आणि कायदा करावा. त्यानंतर केंद्रात काय करायचं ते मी बघतो. संभाजीराजे यावर थेटपणे बोलणार नाहीत. ते जंटलमन आहेत. पण मराठा आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते. मात्र आता त्यांनी केंद्राकडे दुर्लक्ष करत ढीगभर मागण्या आणि त्याही अल्टिमेसहित केवळ राज्य सरकारकडेच केल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय ठोकताळा | त्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेना २०२४ मध्ये एकत्र निवडणुका लढतील? - सविस्तर वृत्त
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनपेक्षितपणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि अनपेक्षितपणे शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या प्रचारात दिल्लीतील वरिष्ठांनी म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राज्यात प्रचारसभा देखील घेतल्या नव्हत्या. अगदी राहुल गांधी यांनी यांनी निवडक १-२ प्रचार सभा घेतल्या होत्या आणि त्यातही नसीम खान यांच्यासारखे मंत्री पदाचे दावेदार असलेले काँग्रेसचे नेते अगदी मनसेतून फुटून शिवसेनेत दाखल झालेल्या दिलीप लांडे यांच्यासमोर पराभूत झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही वाट्टेल ते लिहिणार त्यावर रोषही व्यक्त करायचा नाही का? | दंडुकेशाही चालणार नाही - चंद्रकांत पाटील
मुंबईत काल (१६ जून) शिवसेना भवनासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी तिथे आलेले शिवसेना कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये आधी वाद आणि त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्य झालं. शिवसेना भवनासमोर हा राडा झाल्यानंतर त्यावर भाजपा आणि शिवसेनेमधून परस्परांवर आरोप करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेकडून गुंडगिरी सुरू असल्याची टीका झाल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | दलित, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी तत्काळ घरगुती वीज जोडणी योजना
महावितरणकडून १४ एप्रिल ते ६ डिसेंबर या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीज जोडणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थींना या योजनेमधून घरगुती वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीज बिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपने निर्धार केलाय, महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. परंतु, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये, मैदानात यावं ते दोन पायांवर जाणार नाहीत - आ. नितेश राणे
भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे येत्या २ महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका | मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सतर्कतेचे निर्देश
महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला धक्का | माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षाला धक्के बसत आहेत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव, सांगली व जळगाव महापालिकेची सत्ता हातातून निसटल्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता आहे. पुन्हा सत्ता मिळण्याची चिन्हं नसल्यानं निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये आलेले अनेक नेते व आमदार अस्वस्थ आहेत. त्यातूनच आता घरवापसी सुरू झाली आहे. सुनील देशमुख यांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल - संजय राऊत
एकाबाजूला शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीबरोबर युती करणार असल्याचं उघड उघड जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या युतीचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणप्रश्नी आज संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी काल मोर्चा काढल्यानंतर खासदार संभाजी छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पाच मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. मात्र, भेट सकारात्मक न झाल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही, असा सूचक इशाराच संभाजी छत्रपती यांनी बैठकीपूर्वी दिला आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मागण्या पूर्ण करा अन्यथा परिणाम गंभीर | खासदार उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मराठा आरक्षणप्रश्नी काल (१६ जून) कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चा कडून आयोजित मुक आंदोलन पार पडल्यानंतर आज (१७ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक यांची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं खासदार उदयनराजेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पिक कर्ज योजना | जाणून घ्या कसं मिळणार कर्ज - वाचा सविस्तर
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तीन लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
शासकीय यादी मान्य करण्याचे राज्यपालांना बंधनकारक नाही | सरकार व राज्यपालांच्या सचिवांना स्पष्टीकरणाचे निर्देश
राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांची यादी राज्यपालांकडे असल्याची बाब पुढे आली. राज्यात यावरुन धुमशान सुरु असतानाच शासकीय यादी मान्य करण्याची मुदत राज्यपालांना नसल्याचे मत न्यायालयात नोंदविण्यात आले आहे. तसेच न्यायालयाला स्पष्टीकरण देण्याचे अधिकार राज्यपालांना नसून राज्य सरकारकडे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची आता चांगलीच कोंडी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्यासाठी विशेष माहिती | शेत जमीन मोजणी ऑनलाईन अर्ज कसा कराल? | वाचा, शेअर करा
आज आपण जाणून घेणार आहोत ते शेत जमीन मोजणी अर्ज संबधी. शेत जमीन मोजणीसाठी ऑफलाईन अर्ज व ऑनलाइन अर्ज संदर्भात बऱ्याच शेतकरी बांधवांना या लेखामुळे नक्कीच फायदा होणार आहे. शेत जमीन मोजणी अर्ज कसा करतात तो अर्ज कोठून डाउनलोड करावा, त्याची प्रिंट कशी काढावी आणि तो अर्ज कोणाकडे सादर करावा हि संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शेत मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपले सरकार या वेबसाईटवर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन कसे करावे हे बघणार आहोत. तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर नवीन युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी नोंदणी कशी करावी या संदर्भात अगदी तपशीलमध्ये माहिती सांगणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांनी दिलं निमंत्रण
मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज (१५ जून) कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीयांच्या नेतृत्त्वात या मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. त्यानुसार हा मोर्चा निघत आहे. हे आंदोलन मूक असणार आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शाहु महाराजांच्या समाधीस्थळावरुन याची सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज, पण अशक्तपणाने उपचार सुरु असतानाच धैर्यशील माने आंदोलनात सहभागी
मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी सलाईन लावून मराठा मोर्चात सहभागी झाले. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं, असं आवाहन मानेंनी मोर्चाच्या सुरुवातीला भाषणातून केलं.
4 वर्षांपूर्वी -
खासदारकी मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो, ते स्वतः माझ्याकडे आले होते - संभाजीराजे
मराठा आरक्षणावरून सुज्ञ भूमिका घेत पुढील लढा उभारणाऱ्या संभाजीराजेंमुळे भाजपचा राजकारण करण्याचा डाव फसल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी संभाजीराजेंना लक्ष केलं होतं. त्यात सर्वाधिक प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
मराठा मोर्चाला सुरुवात | संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल | सर्व पक्षांचा पाठिंबा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज कोल्हापुरातून आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे. खासदार संभाजी शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन सुरु झालं असून राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळी काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात येतं आहे. कोल्हापूरसह औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि रायगड अशा राज्यातील पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हेसुद्धा सहभागी झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सगळ्या लोकप्रतिनिधींना अडवून गाडा बोलणारे पण लोकप्रतिनिधीच आहेत - अजित पवार
मराठा आरक्षणासाठी काल (१४ जून) छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजेंची पुण्यात भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी संभाजीराजेंच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसंच संभाजीराजे यांनी अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचं सांगितलं.
4 वर्षांपूर्वी