महत्वाच्या बातम्या
-
12 आमदारांची यादी 7 महिन्यांपासून राज्यपालांकडेच | आता मुंबई हायकोर्टातही याचिका
महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर आज सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं त्यांना कळवण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर | उद्याच्या मूक आंदोलनापूर्वी संभाजीराजेंचं महत्वाचं आवाहन
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. 6 जूनला रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून म्हणजेच उद्यापासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले होते. या आंदोलनाला उद्यापासून कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. शाहू समाधी स्थळी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या तयारी पाहण्यासाठी संभाजीराजे आंदोलन स्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसोबत संवाद साधला आहे. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींचा आढावाही घेतला.
4 वर्षांपूर्वी -
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी | भाडेकरू होणार घरमालक
महानगरपालिकेची मालकी असलेल्या इमारतीत भाडेतत्वावर काही सदनिका देण्यात आल्या आहेत. या सदनिका संबंधित भाडेकरू नागरिकांच्या नावावर करण्यात येणार आहेत. शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 1 हजार 512 सदनिकांची विक्री करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपयांदरम्यान ही सदनिका उपलब्ध होणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
4 वर्षांपूर्वी -
केवळ नावाने 'अवजड' असणारं खातं मिळण्याची शक्यता | विस्ताराच्या नावाने राज्यात राजकारणाच्या उद्योगासाठी वापर?
मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल असं सांगितलं जातं आहे आणि त्यातच महाराष्ट्रातून एखाद दोन खासदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल अशी चर्चा आहे. अजूनही अधिकृतपणे यावर कुणी काही बोलायला तयार नाही. पण ज्या दोन नेत्यांचं नाव चर्चेत आहे, त्यातले एक आहेत नारायण राणे आणि दुसऱ्या आहे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे.
4 वर्षांपूर्वी -
गावाकडली खुशखबर | महामंडळाकडून बियाणे परमिट वाटप सुरु | जाणून घ्या कसं मिळवाल
बियाणे परमिट वाटप सुरु झालेले आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेवूयात. बियाणे अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज भरला होता त्यांना कृषी विभागाकडून बियाणे परमिट वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झालेले आहे. बियाणे खरेदी करण्याचा परमिट कसे असते, कोणकोणत्या बियाण्यांसाठी हे परमिट वाटप सुरु झालेले आहे, कोणत्या बियाण्यासाठी शेतकऱ्याला किती रक्कम भरावी लागणार आहे. हे परमिट किती दिवस चालते, तुम्हालाही असे परमिट मिळाले असेल तर पुढील प्रक्रिया काय करावी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
भाजप अध्यात्मिक आघाडीच्या नेत्याच्या इशाऱ्यासंबंधित प्रश्न | अजितदादा म्हणाले, कोण तुषार भोसले?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तुषार भोसले यांनी वारीबाबत राज्य सरकारला इशारा दिल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल पवारांनी केला. त्यावर ते भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
आषाढी वारी | वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसमधून पंढरपूरला जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी 2021 च्या नियोजनाला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिला आहे. त्याबाबतचा आदेश आज राज्य सरकारनं काढलाय. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी अन ग्रामीण बेरोजगारांसाठी | शेळी पालन शासकीय कर्ज योजना २०२१ - वाचा आणि लाभ घ्या
मित्रांनो शेळी पालन कर्ज योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. शासनाच्या वतीने शेळी/मेंढी गट वाटप राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. तुम्ही जर शेळीपालन व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला शेळी पालन कर्ज योजना साठी अनुदान मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळवा | योजनेबद्दलची माहिती वाचा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम कारण यासाठी गाडी चालवून परीक्षा दिली जाते. आता फारसं सोपंही झालं असलं तरी आधी यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा. पण आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने ओबीसींचा इम्पेरीयल डेटा सुप्रीम कोर्टात न दिल्याने राजकीय आरक्षण रद्द | फडणवीसांनी केंद्राकडून तो डेटा आणावा
सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ओबीसी आरक्षणाच्या याच मुद्द्यावर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झालं, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेचं ५ वर्ष मुख्यमंत्री असतील | नाना पटोलेंचं स्पष्टीकरण
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पडद्याआड सुरू असलेली चर्चा आता समोर येत आहे. उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची भूमिका घेतली तर काँग्रेस योग्य भूमिका घेईल, असं महत्त्वाची विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच पाच वर्ष राहणार असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थनं केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | राज्याने अधिवेशन बोलावून कायदा करावा | केंद्रात काय करायचं ते मी बघतो - उदयनराजे
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून श्वेतपत्रिका काढली पाहिजे. तेव्हा कोणी कोणाला फूस लावली हे लोकांना स्पष्टपणे समजेल. आधी राज्याने मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवावे आणि कायदा करावा. त्यानंतर केंद्रात काय करायचं ते मी बघतो. संभाजीराजे यावर थेटपणे बोलणार नाहीत. ते जंटलमन आहेत. पण मराठा आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी | उपमुख्यमंत्र्यांनी सुनावलं
राज्याच्या जीएसटीची थकलेली रक्कम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. यावेळी अजित पवारांनी जीएसटीची थकलेली रक्कम २४ हजार ३०६ कोटी द्यावेत अशी मागणी केली होती. याच जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोविड काळात गर्दी होईल म्हणून ते थांबले होते | पण राज ठाकरेंचे झंझावाती दौरे सुरु होतील - बाळ नांदगावकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते मुंबईतील लसीकरण उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मनसे आणि राज ठाकरे यांची पुढील रणनीती सांगितली. आगामी महापालिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड तयारी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठरलं | उदयनराजे आणि संभाजीराजे आज पुण्यात भेटणार
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 16 जूनला कोल्हापुरातून मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाणारी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीची वेळ अखेर ठरली आहे. आज पुण्यात दुपारी एक वाजता संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले भेटणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदुंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली | सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं - संजय राऊत
अयोध्येत राममंदिराची उभारणी करत असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ‘आप’ नेते संजय सिंह आणि सपाचे नेते पवन पांडेय यांनी केला आहे. पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली, असा आरोप करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | कोल्हापुरात उपमुख्यमंत्री आणि श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट, मालोजीराजेही उपस्थित
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. आज(दि.14)त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली आहे. कोल्हापूरातील न्यू पॅलेस येथे ही भेट होत आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित आहेत. या भेटीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेती विषय | मोठ्या कमाईसाठी सरकारी रोपवाटिका योजना २०२१ | ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज
रोपवाटिका योजना २०२१ संदर्भातील माहिती. पंचायत समिती कृषी विभाग योजना सतत चालू असतात, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना या योजनांची माहिती नसण्याची शक्यता असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील बातमी दिनांक ९ जून २०२१ च्या दैनिक पुण्यनगरी वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेसाठी लागणारा अर्ज या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे पेजला खाली स्क्रोल करून तो pdf अर्ज डाउनलोड करून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | सोलर पावर प्लांट उभारायचा आहे? | तालुका तपासा आणि असा करा अर्ज
शेतकरी बंधुंनो आजच्या लेखामध्ये सोलर पावर प्लांट संबधी माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेडच्या वतीने सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारण्यासंदर्भात अर्ज मागविण्यात आले आहेत. दैनिक लोकमतमध्ये या संदर्भातील जाहिरात देण्यात आलेली आहे ती जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या सर्वात खाली देण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२१ आहे. तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी हे सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारले जाणार आहेत त्याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकता त्या संदर्भातील माहिती (PDF File) सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून शकता.
4 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवशी मनसेकडून विनामूल्य कोविशिल्डचे डोस
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस सोमवार १४ जून २०२१ रोजी आहे. या निमित्ताने मनसेच्यावतीने परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये मोफत कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल. यासाठी होणारा सर्व खर्च मनसे करत आहे. मोफत लसीकरण कार्यक्रमासाठी उद्योजक नितीन नायक, निलेशकुमार प्रजापती, उजाला यादव, विजय जैन यांनी मोलाची मदत दिली आहे.
4 वर्षांपूर्वी