पंकजा म्हणाल्या होत्या 'राम कदम तसा नाही' मग धनंजय मुंडे तसे कसे वाटले? चर्चा रंगली- सविस्तर

परळी: पंकजा मुंडे यांनी भाजपाचे आमदार ‘राम कदम तसा नाही’ असे विधान केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना धारेवर धरले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना ‘मग राम कदम कसा आहे’ हे महाराष्ट्राला सांगा असे आव्हान केलं होतं. पंकजा ताई तुम्ही महिला आहात, महिला व बालकल्याण खाते सांभाळता. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून तुम्ही मोठ्या आहात, मी तुमच्या एवढी मोठी नाही. पण मग तुम्ही राबवत असलेली बेटी बचाव मोहीम आहे की बेटी भगाव असा प्रश्न जेव्हा तुम्ही राम कदम यांची बाजू घेता तेव्हा पडतो. मग तुम्ही महिलांच्या मंत्री आहात की राम कदम यांच्या असा खोचक सवाल त्यावेळी सक्षणा सलगर यांनी केला होता.
दरम्यान, आज बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बंधू-भगिनींमध्ये सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. ‘धनंजय मुंडे हे पंकजांना बहिणाबाई बोलल्याचं मी ऐकलंय. त्यात वावगं काहीच नाही. बहिणाबाई हा आदरणीय शब्द आहे. या शब्दात यातना होण्यासारखं येण्यासारखं काय आहे,’ असा टोला पवारांनी हाणला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी अर्वाच्च भाषेत टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. या प्रकरणात आता शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. “मी चौकशी केली मी पंकजांचे एक स्टेमेंट पाहिले. त्यात बहिणाबाई असा माझा उल्लेख केला. हा शब्द काही योग्य नाही. बहिणाबाई असा उल्लेख करणं योग्य नाही. हे वक्तव्य मला अतिशय यातना देणारं आहे वगैरे असं त्या म्हणाल्याचं मी ऐकलं. मला वाटतं बहिणाबाई या शब्दामध्ये एक आदर आहे. महाराष्ट्रामध्ये बहिणाबाईंच्या कविता आम्ही लहानपणापासून घोकल्या आहेत. बहिणाबाईंनी अनेक विचार त्यांच्या कवितांमधून मांडले. त्याचा स्वीकार महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राने अगदी आनंदाने केला. त्यामुळे बहिणाबाई या नावातच आदर आहे. त्यामुळे बहिणाबाई या शब्दामुळे यातना का होतात अन् चक्कर का येते हे मला महिती नाही,” असे मत पवारांनी नोंदवले.
धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेख बहिणाबाई असा केला. या शब्दामध्ये काही चुकीचे नाही, असे सांगत पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडेंच्या या भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर लगेचच याची नोंद घेऊन महिला आयोगाने धनंजय मुंडेंवर कारवाईचे संकेत दिले आहेत. पंकजा-धनंजय वादात राज्य महिला आयोगानं तत्परता दाखवत धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. पवारांनी याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं. महिला आयोगावर सामान्यपणे सत्ताधारी पक्षाचे लोक असतात. पण आपण भाजपचे प्रतिनिधी म्हणून बसतो हे दाखवायलाच पाहिजे असं काही नाही,’ असा चिमटा पवारांनी काढला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं