महाराष्ट्रातील संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत; राहुल गांधीची ग्वाही

मुंबई, २७ मे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाय योजनांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय.
राज्यात सुरू झालेल्या चर्चांनंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून संवाद साधला. “शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री कायम आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे,” अशी ग्वाही राहुल गांधी यांनी ठाकरे यांना दिली. तर “सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ठेवला जाईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेण्याचीच भूमिका आहे,” असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिलं.
News Summary Title: Congress leader Rahul Gandhi had expressed displeasure over the role of the Congress in the Mahavikas Aghadi government. After that, it has come to light that there was a phone conversation between Chief Minister Uddhav Thackeray and Rahul Gandhi today.
News English Title: Phone conversation between Uddhav Thackeray and Rahul Gandhi News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं