मोदीजींच्या राज्यात शेतकरी चिंतेत आणि उद्योगपती मजेत - राहुल गांधी

औसा: उद्योगपतींचं साडेपाच लाख कोटींचं कर्ज माफ झालं. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शहा मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी औसामधील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्रातील काँग्रेसमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेसची पाळमुळं रुजली आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा यामुळे राहुल गांधी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. पण राहुल गांधी यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य करत औसातील पहिली प्रचारसभा दणकावून सोडली.
मोदींच्या राज्यात शेतकरी चिंतेत आहे. बँकांचं कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्याला सतावत आहे. मात्र मोदींचे मित्र असलेले उद्योगपती मजेत आहेत. कर्ज बुडवलं तरी आपण परदेशात पळून जाऊ शकतो, असा ठाम विश्वास त्यांच्या मनात आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच कलम ३७०चा उल्लेख केला जात असल्याचं देखील ते म्हणाले. लातूरमधील औसामध्ये ते पक्षाच्या प्रचारसभेत बोलत होते.
तुमची कर्जमाफी झाली का? पिकाला चांगला भाव मिळतोय का? अच्छे दिन आले का?, असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले. मोदींनी त्यांच्या उद्योगपती मित्रांचं साडे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. अंबानी, अदानी यांनी घेतलेलं कर्ज माफ करून टाकलं. मोदींनी त्यांच्या मित्रांना दिवाळी गिफ्ट दिलं. पण सर्वसामान्य शेतकऱ्याला काय मिळालं?, असा प्रश्न राहुल यांनी विचारला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं