ईडी चौकशी: युतीच्या यात्रांची चर्चा संपली; ग्रामीण भागात पवारांची चर्चा आणि भावनिक किनार: सविस्तर

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे आता ‘ईडी’समोरच पेच निर्माण झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसंच खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. ‘विधानसभा निवडणुकांमुळे महिनाभर प्रचारासाठी मुंबईबाहेर असेन. यादरम्यान ‘ईडी’कडून ‘प्रेमसंदेश’ आल्यास त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहता येणार नसल्याने मी स्वत:च शुक्रवारी दुपारी दोन वाजता ‘ईडी’च्या मुंबई कार्यालयात जाणार आहे’, असे पवार यांनी म्हटले होते. मात्र, कोणत्याही प्रकरणात एखाद्या व्यक्तीची किंवा आरोपीची चौकशी करण्याचा निर्णय घेणे हा तपासाधिकाऱ्याचा अधिकार असतो. या प्रकरणात ‘ईडी’ने शरद पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही. जोपर्यंत अधिकृतपणे चौकशीसाठी बोलाविले जात नाही, तोपर्यंत अभ्यागतांच्या चौकशीचे कोणतेही अधिकार ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना नसतात, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. यामुळे या प्रकरणात ‘ईडी’ची पंचाईत झाली आहे.
राज्य शिखर बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ईडीने बँकेच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबतच शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्यामुळे पवारांची देखील ईडी चौकशी होणार हे निश्चिच झालं. मात्र, ‘पुढचा महिनाभर मी राज्यात प्रचार करणार असल्यामुळे २७ सप्टेंबरलाच ईडीच्या कार्यालयात स्वत: हजर राहून त्यांचा ‘पाहुणचार’ मी घेणार आहे’, असं शरद पवारांनी जाहीर केलं. पण आता हा ‘पाहुणचार’ ईडीच्या कठोर चौकशीचा नसून फक्त शिष्टाचाराचा भाग म्हणून केला जाणारा पाहुणचार ठरणार आहे. शरद पवारांची चौकशी दिवाळीनंतरच केली जाणार असून आत्ता फक्त शिष्टाई म्हणून त्यांचा ईडीमध्ये सामान्य पाहुणचार केला जाईल, असं ईडीनं ठरवल्याचं प्रसार माध्यमांच्या हाती वृत्त आहे.
वास्तविक, मागील दोन महिन्यांत पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीच्या यात्रांच्या चर्चेऐवजी विरोधी पक्षाच्या कुठल्या नेत्यांचं नाव इतक्या चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. वयाच्या ८०व्या वर्षी देखील एकहाती राष्ट्रवादीचा वारू फिरवण्यासाठी राज्यभर दौरे, भेटीगाठी करताना शरद पवार दिसत आहेत. पक्षातले अनेक दिग्गज नेते आणि मोठे चेहरे भाजप किंवा शिवसेनेत दाखल होत असताना उरलेल्या नेतेमंडळींमागे तपाससंस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पवारांनी शिवसेना-भाजपला शिंगावर घेण्याची तयारी चालवली होती. त्यातच त्यांचंही नाव ईडीच्या यादीत आल्यामुळे सत्ताधारी गोटात आनंदाचं वातावरण दिसत असतानाच भाकरी फिरली आणि सेना-भाजप युतीच्या जागी सगळीकडे चर्चा सुरू झाली ती शरद पवारांची रंगली असून त्याला भावनिक किनार मिळत असल्याचे दिसते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं