काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का? प्रकाश आंबेडकर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचं देशभर पानिपत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर हाती आलेल्या आकडेवारीनंतर काँग्रेसच्या अनेक जागा बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे पडलायचं दिसलं आणि काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांसोबत जुळवून घेण्याच्या गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काँग्रेसचं पानिपत झालं आहे म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडी भाजपची ‘बी टीम’ आहे असा आरोप आमच्यावर केला गेला. याचे पुरावे अशोक चव्हाणांसह काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आम्हाला द्यावे, असं प्रकाश आंडेकरांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
वंचितवर केलेल्या आरोपांचे काँग्रेसकडे पुरावे नसतील तर त्यांनी आमच्या ४० लाख दुखावलेल्या मतदारांची माफी मागावी, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, ईव्हीएमवर संशय कायम असून याबाबत निवडणूक आयोगाची येत्या २५ तारखेला भेटण्यासाठी वेळ मागितली असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं