शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी मला एकत्रित काम करण्याची ऑफर दिली होती, नारायण राणेंचा गौप्य्स्फोट

मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, माझी शिवसैनिक नारायण राणे यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यातून वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. खुलासे म्हणण्यापेक्षा विवादित खुलासे म्हणायला काही हरकत नाही, त्यास कारण देखील तसेच आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून बराचसा इतिहास उलगडला आहे, हा इतिहास फार कमी लोकांना माहित आहे.
२००६ साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तसेच शिवसेना सोडण्या आगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. दौऱ्याचे कारण म्हणजे आपल्या मागे किती लोकांचे पाठबळ आहे हि त्याची पूर्ण चाचणीच होती. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेस त्यांच्यासोबत शिवसेनेतील काही नामांकित चेहरे देखील राज ठाकरेंसोबत बाहेर पडले आणि त्यांना नवीन पक्ष उभारणीसाठी पाठिंबा दिला. शिवसेनेतील बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, प्रवीण दरेकर असे अनेक चेहरे त्यावेळेस राज ठाकरेंसोबत बाहेर पडले.
२००६ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी नवीन पक्ष स्थापन करून एकत्रित काम करण्याचे निमंत्रण मला दिले होते असा खुलासा नारायण राणेंनी केला आहे. मात्र, मी त्यांना नकार दिला असल्याचा खुलासा नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून मधून करण्यात आला आहे. राज यांनी शिवसेना सोडण्यापूर्वीच राणे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र ‘ केला होता.
शिवसेनामधून आपल्याला का काढण्यात आले याबाबत नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून खुलासा झाला असल्याची बातमी ताजी असतानाच, आता राज यांच्याबद्दल झालेल्या नवीन गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून अजून काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं