मला कुणी शिकवण्याची गरज नाही | फडणवीस बोलले तरच उत्तर देईन - संभाजीराजे

अहमदनगर, १२ जून | खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी जर मला सल्ला दिला तर बोलेल. आता बोलणार नाही, अशा शब्दांत संभाजीराजेंनी चंद्रकांतदादांना सुनावलं आहे.
खासदार संभाजी छत्रपती आज कोपर्डीत आले होते. यावेळी त्यांनी पीडिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांना 16 जूनच्या मोर्चाविषयी विचारण्यात आलं. तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवरही विचारण्यात आलं. त्यावर मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. 2007 पासून मी मराठा आंदोलनात आहे. हे केव्हा आले हेच मला कळत नाही. जरा त्यांना विचारा, असं सांगतानाच मला कुणी शिकवण्याची गरज नाही. मला देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतीर तर मी त्यावर बोलेन, असं संभाजीराजे म्हणाले.
आम्ही संभाजीराजेंना भाजपचे मानतो, ते स्वत:ला भाजपचे मानतात की नाही माहीत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना संभाजीराजेच दिसत आहेत. आपण रोज सकाळी उठल्यावर देवाचा मंत्र म्हणतो. ते संभाजीराजेंचा मंत्र म्हणत आहेत. आमच्यात का दुरावा आहे हे त्यांनाच विचारा. मी काही ज्योतिषी नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी ज्योतिषाला कधीही मानलं नाही, असं सांगतनाच मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
News Title: Sambhajiraje Chhtrapati answer to BJP Maharashtra president Chandrakant Patil news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं