राधाकृष्ण विखेंच्या विविध संस्थांमधील घोटाळ्याप्रकरणी भावाचे उपोषण?

नगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे हे उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, विखे-पाटील कुटुंबियांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांमधील अनेक प्रकरणांच्या चौकशीची मागणी डॉ. अशोक विखे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन पाठवून येत्या २० मे रोजी लोणी प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुतळ्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
डॉ. अशोक विखे यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
- प्रवरानगर, गणेश, राहुरी या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱयांना उसाचे पैसे मिळावेत
- झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करावी
- जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराचा तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई व्हावी
- मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं